Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शांत समय अन्...

P — Pradip kale, Sun, 03/19/2017 - 12:52
शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई, माझ्या कविता आणिक गाणी शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती -प्रदिप काळे. माझा ब्लॉग: मुक्त कलंदर

प्रतिक्रिया द्या
2040 वाचन

💬 प्रतिसाद (6)
श
शार्दुल_हातोळकर Sun, 03/19/2017 - 19:00 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/20/2017 - 12:35 नवीन
पांडू मोड ऑन ओके. पांडू मोड ऑफ. ;)
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 03/20/2017 - 19:49 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
P
Pradip kale Tue, 03/21/2017 - 04:29 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 03/21/2017 - 06:16 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 03/21/2017 - 06:17 नवीन
ब्लिस ऑफ सॉलिट्यूड.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा