Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुठली कार घेऊ?

ख
खग्या
Mon, 03/20/2017 - 16:02
🗣 78 प्रतिसाद
मला माझ्या आई बाबांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ची कार घ्यायची आहे. बाबांचं वय ६० च्या आस पास असल्याने त्यांना मॅन्युअल गिअर बदलण्याचा त्रास नको असं वाटत. शिवाय ते अलीकडेच गाडी शिकले आहेत. त्यांना जवळपास फिरण्यासाठी कार घ्यायची आहे. शहरात किंवा फार फार तर २-३ महिन्यातून एकदा मुंबई - पुणे इतका प्रवास होईल. शिवाय जवळपास ट्रिप वगैरे साठी सुद्धा ते जातील. मुख्य कारण म्हणजे मला टू व्हीलर पेक्षा कार सुरक्षित वाटते. मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे. कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया द्या
29083 वाचन

💬 प्रतिसाद (78)
अ
अभ्या.. Tue, 03/21/2017 - 15:34 नवीन
मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे.
मला फक्त हा महत्त्वाचा मुद्दा वाटला म्हणून मी ओलाचा पर्याय सुचवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
य
यसवायजी Tue, 03/21/2017 - 18:40 नवीन
Grand i10. Rs. 6,05,000 ची. आताच १ वर्ष झालं. Renewal @Rs. 14500/-. Hyundai assured insurance.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 03/21/2017 - 14:46 नवीन
शेवटी अजून एक हिशेब खरं तर हा मी टाकणार नव्हतो नवीन कार घेणाऱ्या माणसाला नाउमेद करायचे नाही म्हणून. पण विषय ऐरणीवर आलाय म्हणून ३०,००० किमी आपण कार चालवता तेंव्हा कारचा वेग ३० किमी ताशी पकडला (रहदारी गृहीत धरून) तर आपण सरासरी १००० तास कार मध्ये बसता. एक हजार तासांसाठी आपण ७ लाख २० हजार रुपये खर्च करतो म्हणजेच तासाला सातशे वीस रुपये खर्च करतो. म्हणजेच २४ तासाला रुपये १७६८०/- (आणि जर ६० किमी वेगाने गेलो तर ५००च तास म्हणजे ताशी रुपये १४४० /- फक्त ) अरे बापरे हा दर तर सप्ततारांकित हॉटेलचा होतो. यात झोपणे गृहीत नाही नाष्टा, जेवण हि नाही. पहा विचार करून. यात कर्जावर घेतलेल्या कारच्या व्याजाचा हिशेब नाही आणि नवीन कार असल्याने त्याच्या देखभालीचा खर्च काहीच येणार नाही हे गृहीत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Tue, 03/21/2017 - 15:09 नवीन
तासाला सातशे वीस रुपये
पण हा खर्च करून मी दिवसाला तीन हजार कमावायला किंवा एखादी दहा लाखाची डील फायनल करायला जात असेन तर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्वामी संकेतानंद Tue, 03/21/2017 - 15:17 नवीन
कारमध्ये कुणी नुसताच बसत नसतो हो! कुठेतरी जात असतो, कुठूनतरी येत असतो, त्यामुळे कारची किंमत तिच्यात बसून घालवलेल्या तासात मोजण्याचा हिशोब कळला नाही. मी अधिक वेगात जातोय तर तुमच्या हिशोबाप्रमाणे मी अधिक तोट्यात आहे! पण मी वेगात जातोय याचा अर्थ कुठेतरी लवकर पोचतोय. मी तो वाचलेला वेळ कुठेतरी जास्त परतावा देणार्‍या कामात वापरू शकतो. जर कारमध्ये जास्त वेळ बसणे म्हणजे कारवर केलेला खर्च कमी करणे असेल तर मी माझी कार नेहमी ताशी पाच किमी वेगानेच चालवायला पाहिजे! मी शंभरच्या सरासरीने पुणे-पनवेल जाऊन एक महत्वाची मिटिंग पूर्ण करून परत येऊन माझ्या मुलांसोबत खेळायलाही वेळ काढू शकतो. पण जर कारचा खर्च काढायला मी तीच कार पाच किमी वेगाने हाकत पनवेलला न्यायचे ठरवले तर??? कार हे घर नाही, हॉटेल नाही, लॉज नाही, दळणवळणाचे साधन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
अ
अभ्या.. Tue, 03/21/2017 - 15:20 नवीन
माझ्या मित्रमंडळात असे तिघे चौघे तरी आहेत की एका फोनवर म्हणेल तिथे फुल्ल डिझेल भरलेली स्वतःची गाडी घेऊन ड्रायव्हरसह्/नसल्यास स्वतः यायला तयार असतात. पैसे दिले तर नाही म्हणत नाहीत पण परतफेडीची अपेक्षा नाही. अर्थात ही व्यक्तीगत बाब झाली,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
सुबोध खरे Tue, 03/21/2017 - 15:33 नवीन
ओला उबरचे मालक आणि चालक तेच करतात हो . गाडी धंद्याला हवी असेल तर गोष्ट अगदीच वेगळी आहे. मग तेथे हिशेब नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
श
शब्दबम्बाळ Tue, 03/21/2017 - 14:47 नवीन
Ignis भारी वाटली मला तरी! कोणी घेतलीये का? लैच आवडली मला, एकदम प्रॅक्टिकल मॉडेल आहे! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/21/2017 - 15:02 नवीन
घेऊन टाका मारुती कार भरवशाच्या असतात / आहेत . कार विकत घेणे हा "हृदयाचा" निर्णय असतो डोक्याने विचार करायला गेलात तर जमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
संदीप डांगे Tue, 03/21/2017 - 15:15 नवीन
मला वाटतं, ना डोक्याचा, ना हृदयाचा, हा 'आराम का मामला' है :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रुस्तम Tue, 03/21/2017 - 17:27 नवीन
क्विड कोणी घेत्तली आहे का?
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 03/23/2017 - 07:10 नवीन
माझ्या मित्राने घेतलीये ती गाडी. बारीक़ अंगकाठी आणि उंचीने जेमतेमच असलेले ४ जण त्यात बसु शकतात. ड्रायवर शेजारी बसलेल्या माणसाचे गुडघे हमखास गियरला टेकतात. खड्ड्यात किंवा स्पीडब्रेकरला गाडी थोडीशी उडाली तरी मागे बसलेल्यांचे डोकी छताला आपटतात बाकी पर्फ़ोमंस अणि सर्विस चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
क
केंट Wed, 03/22/2017 - 06:29 नवीन
क्विड नाही पण DATSUN Redi-Go वापरतोय , सहा महिन्या पुर्वी घेतली. 10,000 Km रंनिंग झालेय, सिटी साठी मस्त आहे. ट्रॅफिक मधे कंट्रोल साठी मस्तच. मला उंच आणि जास्त लेग स्पेस वाली कार हवी होती, 800 सीसी . Alto बेस्ट . पण Nissan च ईंजीन म्हणून आणि स्पेस बघून घेतली. रोज ऑफीस ला वापरतो. 50% कॅश दिली. EMI पण जास्त नाही. हॅपी :) ..
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक Wed, 03/22/2017 - 08:36 नवीन
वयाच्या ७५ ला मी भूगाव ला राहण्यास आलो आहे . पुण्यातल्या चांदणी चौवकापासून ५ किलो मीटर अंतरावर येथे येण्यापूर्वी मेलबोर्नला पाच महिने राहून आलो तेव्हा तेथे चार चाकी गाडी चालवणारे काही जेष्ठ आणि काही अति जेष्ठ चालक पाहून चार चाकी वाहन घेऊन स्वतः चालवावे असा विचार व्यक्त करताच वरील गोष्टीवर चर्चा झाली . आणि ओला उबेर रिक्षा यांचा मुक्त वापर करण्याचे ठरले येऊन चार महिने झाले . फक्त चार वेळा ओला / उबेर भूगाव मधून जाण्यास मिळाली ओळखीचा एक रिक्षावाला एकदा आला [ तो बावधनला राहतो ] बाकी प्रत्येक वेळी ६ आसनी रिक्षा किंवा जीप यांचा उपोयोग करणे भाग पडत आहे पुण्यातून भूगावला येताना मीटर वर येणारे रुपये अधिक २०/ ३० रुपये देताना विचार करणे बंद केले आहे मला ओला उबेर यांचे अँप नीट वापरता येत नाही आठ तास ८० किलोमीटर ला १५०० रुपये अशी एक टॅक्सी मिळते परुंतु ती प्रत्येक वेळी available असत नाही नाटक सिनेमा पाहुणचार या गोष्टी रात्रौ आठ पर्यंत संपत नाहीत आणि आठ नंतर भूगावला येणारे रिक्षावाले सापडत नाहीत सहा आसनी रिक्षा आणि जीप यांचा अत्यंत चांगला गूण म्हणजे ते नाही म्हणत नाहीत . त्यात बसलेले १५/१६ प्रवाश्यापैकी एखादा म्हणतो मला भूगाव ते कोथरूड बस डेपो पर्यंत तरी नेणारा आणि रात्रौ पुण्यातून भूगावला आणणारा रिक्षावाला टॅक्सिवाला मिळवून देण्यास मदत करा
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/22/2017 - 08:42 नवीन
स्वतःची कार घ्या आणि ओलाला/उबेरला लावा. एखादा गरजू पोरगा ड्रायव्हर म्हनून ठेवा. पॉइंट भूगावचाच ठेवायचा. तुमच्यासारखे अजून काही असतीलच ना? तुमच्या गरजेच्या वेळी बाहेरचे कॉल रिजेक्ट करायला पोराला सांगायचे. बिझनेसला बिझनेस. गाडीला गाडी, पैशाला पैसा. अजून काय पाह्यजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक
स
संदीप डांगे Wed, 03/22/2017 - 10:50 नवीन
उत्तम सल्ला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभिजीत अवलिया Wed, 03/22/2017 - 17:43 नवीन
ओला उबर ला जी गाडी भाड्याने लावली जाते त्यांना प्रती ट्रिप पैसे मिळत नाहीत. दिवसाला ठराविक ट्रिप (माझ्या माहितीप्रमाणे किमान १॰) केल्या तरच पैसे मिळतात. एवढ्या ट्रिपा भुगाव परिसरात नाही मिळायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चिनार गुरुवार, 03/23/2017 - 06:34 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे असं नसतं.. दिवसभरातल्या कलेक्शन मधलं १५ टक्के हे ओलाचं कमिशन आहे. त्यासाठी मिनिमम इतक्या इतक्या ट्रिप असं बंधन नाहीये. मी चार -पाच ओला चालकांशी यावर बोललो आहे. दिवसातल्या प्राईम टाइममध्ये (सकाळी ८-१२ आणि रात्री बहुधा पाच-दहा) या वेळात काही ठराविक ट्रिप्स केल्यावर ओलाकडून ५०० ते ८०० रु. पर्यंत रिवॉर्ड मिळतो. हा रिवॉर्ड मिळवण्यासाठी सगळेच धडपड करतात. नाहीतर मिनिमम ट्रिप्स असा काही नियम नाही. मी हे पुण्याविषयी बोलतोय. इतर शहरामध्ये ओलाची पॉलीसि वेगळी असू शकेल. अर्थात फक्त भूगाव हे केंद्रस्थानी ठेऊन ओलाचा व्यवसाय करू नये या मताशी मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 03/23/2017 - 10:22 नवीन
असं माझं मत आहे. पण परवडत नाही म्हणून कॅब कंपनीला गाडी लावणं तितकंस कधीच पटलं नाही. अर्थात, मला याचं लॉजिक वगैरे काही देता येणार नाही किंवा कुणीही काहीही लॉजिक दिलं तरी मला पटणार नाही. इट इज रिअली अ‍ॅबसर्ड, बट कांट हेल्प !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
म
मराठी कथालेखक Fri, 03/24/2017 - 07:31 नवीन
तुमचं म्हणणं बर्‍यापैकी पटलं दुसरे लोक आपल्या गाडीतून फिरले तर गाडीची बॅकसीट खराब /घाण करण्याची शक्यता असते. झालंच तर जंतुसंसर्ग वगैरे पण. म्हणूनच एकवेळ तरुण वयात ठीक आहे पण उतारवयात तर टॅक्सीने फिरु नये असे मी म्हणेन, ड्रायव्हर ठेवला तर तो ही स्वच्छतेच्या काटेकोर सवयी असणारा असावा, गाडी आतून चांगली स्वच्छ असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
वरुण मोहिते Wed, 03/22/2017 - 08:53 नवीन
सरांच्या अनुभवाशी सहमत . माझ्याकडे आता ३ गाड्या झाल्या . मागच्या महिन्यात XUV ५०० पण घेतली . त्या आधी होंडा सिटी नवीन, आय १० ह्या पण गाड्या आहेत . पण आता मुंबईत इतकं बोरं होतं ना चालवताना काही विचारू नका . मुलुंड ते विटी कोण गाडी घेऊन जाईल रोज . कोणाला दाखवायचं .. बस ओला ट्रेन खरंच परवडते पण आणि निवांत पणा मिळतो . बाकी घरी एक गाडी असावी ह्याच्यासाठी सहमत . अवांतर _आय १० ग्रँड ऑटो घ्या . ५ वर्ष तरी चिंता नाही .
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 03/22/2017 - 10:21 नवीन
आम्ही झेस्ट ए एम टी घेतलीय गेल्या गणपतीत.मस्त चालतेय. टाॅप एंड साडेनऊ दहा लाख‍ाला जाते.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१ गुरुवार, 03/23/2017 - 06:22 नवीन
स्विफ्ट डिझायर वापरतोय गेली ७ वर्ष... मस्त गाडी आहे एकदम, उत्तम पिकअप, चांगला मायलेज आणि कमी मेंटेनन्स... सध्या फोर्ड इकोस्पोर्ट घ्यायचा विचार चालू आहे... कोणाकडे असल्यास रिव्ह्यू कसे आहेत ?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/23/2017 - 07:11 नवीन
वरीलपैकी आय१० ग्रँडला मत दिलेल्यांशी सहमत. त्यात एक स्पोर्टस व्हेरियंट आहे. तो आणखी भारी.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 03/23/2017 - 07:46 नवीन
मागच्या आठवड्यातच मारुती इग्निस ची डिलिव्हरी घेतली पेट्रोल ऑटोमॅटिक ... पहिल्या आठवड्याचे रिझल्ट उत्तम. टोटल ऑन रोड ७.५ लाख ... General observations : 1. overall comfort is good 2. Powerful AC 3. Steering wheel is responsive 4. good leg room for back sets as well 5 small turning radius (as compare to Vista with approx same dimensions) 6. as auto gears are AMT, there is standard lag but its quite manageable in city. (this is my first automatic car so feeling the difference) So overall happy to recommend
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१ गुरुवार, 03/23/2017 - 07:57 नवीन
ऑटो डिम रिअर व्ह्यू मिरर - हा फिचर आहे का ? कमी उंची असलेल्या सगळ्या गाड्यांसाठी हा फिचर अत्यावश्यक आहे असं मला वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Fri, 03/24/2017 - 10:17 नवीन
मारुती इग्निस मध्ये ऑटो डिम रिअर व्ह्यू मिरर नाही ... मारुतीच्या कुठल्याच गाडीत हा स्टॅंडर्ड असेसरी नसतो बाहेरून बसवून घ्यावा लागतो
  • Log in or register to post comments
ल
लई भारी गुरुवार, 03/30/2017 - 13:19 नवीन
दिसायला बेश्ट आहे. रिव्यू पण चांगले आहेत. मी २ वर्षांपासून झेस्ट(मॅन्युअल) वापरतोय. ४५,००० किमी एकदम झक्कास चालू आहे. त्यामुळे टाटा ब्रँड विषयी काही शंका ठेवायची गरज नाही आहे असे वाटते. मला हा पर्याय value for money वाटतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा