Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ग़ज़ल - म्हटलेच होते

व — वेल्लाभट, Tue, 03/21/2017 - 07:50
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं. म्हटलेच होते... होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटते वाट अन खुलतेही एक प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते - अपूर्व ओक २०-३-१७

प्रतिक्रिया द्या
4615 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/21/2017 - 09:37 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/21/2017 - 12:14 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Tue, 03/21/2017 - 12:42 नवीन
धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 03/21/2017 - 13:22 नवीन
//वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते // हे खूपच आवडली कविता.. खरे तर गजलच.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 03/21/2017 - 15:45 नवीन
सगळ्यात शेवटी तुझं नाव येतं कवितेचा भाग बनून ती तुझी सवय ( का नाईलाज ;)) आवडेश ! गजल सुरेख !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 03/22/2017 - 03:00 नवीन
धन्यवाद
तुझी सवय ( का नाईलाज ;)
असं नाही काही. ग़ज़लेत शेवटच्या शेरात 'शायर का तखल्लुस' असण्याचं चलन म्हण, पद्धत म्हण, स्टाईल म्हण पूर्वीपासून आहे. अशा आणि प्रामुख्याने शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात. माझा आपला तसा प्रयत्न असतो इतकंच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
संदीप-लेले Tue, 03/21/2017 - 17:23 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 03/21/2017 - 18:08 नवीन
आवडली गझल!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 03/21/2017 - 18:55 नवीन
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते वाह!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/21/2017 - 19:04 नवीन
वेगळीच आहे गजल. आमचा नजराणा इथे आहे! ;) -रंगा
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 03/22/2017 - 02:48 नवीन
शार्दुल, समाधान, निनाव, पैतै, फुत्कार, सत्यजित, पिरा, चतुरंगभाऊ धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/22/2017 - 05:27 नवीन
गजल विचारपूर्वक पणे लिहिलेली सबब अपूर्व !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/24/2017 - 13:40 नवीन
धन्यवाद चौ.रा.काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
व
विशाल कुलकर्णी Wed, 03/22/2017 - 14:33 नवीन
सुरेख गझल ! राग येणार नसेल तर एक सुचवू? शक्यतो सुट घ्यायचा मोह टाळता येतो का पाहा. मीहि, प्रीति यात हि किंवा ति हे दीर्घ हवेत. फार काही फरक नाही पड़त पण गझलेचा निर्दोषपणा कमी होतो. आगावूपणाबद्दल क्षमस्व _/!\_
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/24/2017 - 13:32 नवीन
बरोबर आहे. पुढील वेळी नक्की हे टाळण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
स
सूड Wed, 03/22/2017 - 15:08 नवीन
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते
अभय सोडून काहीही व्हा वेल्लाकाका.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 03/22/2017 - 16:14 नवीन
अगदी अगदी :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वेल्लाभट Fri, 03/24/2017 - 13:33 नवीन
हाहाहा. नाही रे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा