Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

-----

म — मितान, Tue, 03/21/2017 - 12:26
परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा हळूच कुरवाळावी पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी. त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी... जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे.. झेपले तर थोडा दूधभात घालावा म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल... कोण कुठले गरीब बिचारे देवा ! आई गं ! अरेरे ! वगैरे.. मनी साठलेले सुस्काऱ्यांचे घट रिकामे करत जड वाटल्याचे भासवत हलके हलके व्हावे ! परोपकाराची साय दाट झाली की मग मात्र त्या मांजराला विसरून जावे! जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार ! एवढे करून चिरेबंदी वाड्यात परतताना पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !

प्रतिक्रिया द्या
4884 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
पैसा Tue, 03/21/2017 - 12:57 नवीन
हम्म....
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 03/21/2017 - 13:05 नवीन
कच्च्कन काटा रुतावा तशी टोचणारी कविता. प्रचंड प्रभावी.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 03/21/2017 - 14:33 नवीन
कविता दिनाला लिहिलेली सुंदर कविता. एक छोटीशी कळ आली काळजात कविता वाचून.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 03/21/2017 - 15:22 नवीन
हो ना, पुन्हा पुन्हा वाचतेय, प्रत्येक वेळी नवीन काही कळत जाते. खूप सुंदर!!
  • Log in or register to post comments
P
Pradip kale Tue, 03/21/2017 - 15:22 नवीन
छान कविता. संदीप खरेंची "दु:ख येतेच" ही कवीताही वाचण्या सारखी आहे. बहुतेकांनी वाचलीही असेल.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 03/21/2017 - 15:31 नवीन
जनमानसात त्या मानाने रुळलेल्या, सोसेल तेवढेच बेगडी परोपकार करण्याच्या टोचणीचे चित्रण छान केलेय. "मांजर होते म्हणे" या ओळीतून "म्हणतात म्हणे" या चालीवर रेटली जाणारी अनेक उदाहरणे आठवली. शेवट या ओळींनी झाल्याने कविता विशेष आवडली.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 03/21/2017 - 18:14 नवीन
सहज-सोपं करुन लिहिणं म्हणजे अवघड काम! अतिशय मार्मिक !अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/23/2017 - 07:37 नवीन
सहज-सोपं करुन लिहिणं म्हणजे अवघड काम! अतिशय मार्मिक !अभिनंदन!
››› प्लस वन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
च
चांदणे संदीप Tue, 03/21/2017 - 19:03 नवीन
. Sandy
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 03/22/2017 - 03:19 नवीन
व संवेदनशीलता दोन्ही ची मागणी एकाच वेळी करतात. त्यातुन होणारी जीवाची घालमेल किंवा मनाच्या समरस होउ पाहण्याची आस या कवितेची प्रेरणा असावी का ?
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Wed, 03/22/2017 - 03:26 नवीन
कविता दिनाला लिहिलेली सुंदर कविता. एक छोटीशी कळ आली काळजात कविता वाचून. +१
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 03/22/2017 - 06:06 नवीन
सुन्दर !! आत्तापर्यन्त श्रॉडि॑जरच॑ (क्यू.एम. मधल॑) एकच मा॑जर मनात घर करून होत॓. आता हे दुसर॓ बरेच दिवस पाठलाग करणार !
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/22/2017 - 07:45 नवीन
बर्‍याच गोष्टी डोळ्यासमोरुन गेल्या. सुंदर आहेच हेवेसांनल!
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 03/22/2017 - 08:43 नवीन
__/\__ सुन्दर..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/22/2017 - 08:45 नवीन
परोपकाराची साय दाट झाली की मग मात्र त्या मांजराला विसरून जावे! जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार !
जब्बरदस्तच की. . इंटरन्याशनल कवितेचे सबस्टन्स आहेत राव.
  • Log in or register to post comments
व
विभावरी Wed, 03/22/2017 - 09:52 नवीन
छानच !
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 03/22/2017 - 09:56 नवीन
खूप भावली.
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 03/22/2017 - 10:03 नवीन
कविता फार आवडली. ... पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे ! हे तर अगदीच खास!!!!
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 03/22/2017 - 11:37 नवीन
सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार ! शीर्षक काही सुचले नाही या कवितेला :(
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Wed, 03/22/2017 - 12:09 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 03/22/2017 - 15:44 नवीन
निशब्द!!!!!
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा गुरुवार, 03/23/2017 - 07:19 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 03/23/2017 - 17:11 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/13/2017 - 22:52 नवीन
काय गजब लिहिल्या गेलं आहे हे! वाचून-वाचून पाठ झालंय तरी वाचल्यावाचून राहत नाही! शीर्षकाची तशी उणीव अशी भासत नाही काहीच,पण तरी 'दुःख आणि मांजर' असं साधं किंवा 'नाहीतर आपलेही...'असं,सुचवतोय सहज!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/13/2017 - 23:00 नवीन
'दुःखानुभूतीचे मर्म' उलगडणारा 'सफल राजमार्ग' वाटते ही रचना! पुनःश्च अभिनंदन! लिहीत रहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा