चलच्चित्र
भुर्रकन इथे, भुर्रकन तिथे
उडता पक्षी, काढी नक्षी
एक गिरकी, एक फिरकी
घेत हलकी, गळे पान की
सुळूक असा, सुळूक तसा
लवलवता, हलतो मासा
शीतल धुंद, झुळूक मंद
पहाट वारा, गुलाबी शहारा
वेगवेगळी, ऊले पाकळी
पहाट वेळी, खुलते कळी
प्रकाश बिंदू, निशा समय
उडे काजवा, ठाय लय
💬 प्रतिसाद
(1)
स
संदीप-लेले
गुरुवार, 03/23/2017 - 04:06
नवीन
दुसऱ्या कडवे असे वाचावे ...
"एक गिरकी, एक फिरकी
घेत हलकी, गळे पानुली".
प्रकाशित केल्यानंतर लेखनात दुरुस्ती करण्याची काही व्यवस्था आहे का?
- Log in or register to post comments