Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाळी घालण्याची परंपरा विजयानगरमध्ये

अ
अजय भागवत
गुरुवार, 03/23/2017 - 03:44
🗣 11 प्रतिसाद
विजयनगर (राजधानी, नवे आंध्रप्रदेश. पुण्यापासुन ९०० किमी) येथे एका मिटींगमध्ये २ प्राध्यापक होते, जे पन्नाशीत असावेत. त्या दोघांनी कानात बाळी घातलेली होती ... अगदी आपल्या पुण्यातील सध्याच्या फॅशनसारखी ! कुतूहल चाळवले व त्यांना नंतर सांगितले की, पुण्यात पेशव्याच्या आभूषणांत अशी बाळी घालण्याची पद्धत होती व सध्या तरुणांत ही फॅशन जोरदार आहे. त्यांनी सांगितले की, "आमचे पुर्वज १०० वर्षांहूनही आधी पुण्यातुनच इकडे आल्याचे आम्हाला सांगितले जाते. आमची नाळ पुणे आणि पेशव्याशीच जोडली गेली आहे व ही बाळी घालणे आमच्याकडे अभिमानाचे व अनिवार्य मानले जाते". साहजिकच ही माहिती अत्यंत रोचक आहे. कुणी अधिक प्रकाश टाकेल का?

प्रतिक्रिया द्या
3393 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पैसा गुरुवार, 03/23/2017 - 13:31 नवीन
त्याना मराठी बोलता येत होते का
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत गुरुवार, 03/23/2017 - 13:46 नवीन
माझे संभाषण इंग्रजीत झाले त्यामुळे पुढीलवेळी विचारेन की, खाजगीतील संभाषणात ते जी तेलुगू वापरतात त्यात मराठी शब्द आहेत का की जे इतर तेलुगूभाषिक वापरत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड गुरुवार, 03/23/2017 - 13:40 नवीन
हापिसातला एक आंध्रातला कलिग पण एकदा बोलून गेला होता त्यांच्याकडे घालतात काही लोक.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत गुरुवार, 03/23/2017 - 13:48 नवीन
त्याला "त्या" लोकांच्या चालीरीती -सणवार -भाषा ह्यात काही वेगळेपण जाणवतं का ते विचारता आले तर पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 03/23/2017 - 14:48 नवीन
ह्या हापिसात नसतो तो आता, आणि लोकांना आपले सणवार माहीत असायची बोंब असते हल्ली; लोकांचे कुठून माहीत असायला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत
अ
अजय भागवत गुरुवार, 03/23/2017 - 15:41 नवीन
ह्म्म ! खरे आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कंजूस गुरुवार, 03/23/2017 - 15:12 नवीन
१) शिवाजीचे कुळ मूळचे राजस्थानातले. तिकडे राजस्थानात बाळी घालतात. २) शिवाजीने शेवटी गोवळकोंड्याशी सलोख्याचे संबंध वाढवले त्यासाठी पिंगुळी नावाच्या वकिलाने पत्रव्यवहार केला आणि नंतर ते आणि त्याचेबरोबर काहीजण तिकडेच राहिले. बाळीची प्रथा अशी पसरली असेल???
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत गुरुवार, 03/23/2017 - 15:39 नवीन
रोचक माहिती आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 03/23/2017 - 16:43 नवीन
शिवाजी महाराज मुळचे रजपुत नव्हते असे संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. मागच्या आठवड्यात पेप्रात बातम्या वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 03/23/2017 - 16:46 नवीन
खरे खोटे संशोधक जाणे ! ही पुस्ती जोडायला विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
माहितगार Fri, 03/24/2017 - 12:01 नवीन
मागच्या आठवड्यात पेप्रात बातम्या वाचल्याचे स्मरते.
मुटके साहेब, छोट्या छोट्यागोष्टीवरुनही भावना दुखावतात. नेमके संदर्भ न देता, असे वरवरचे माहिती देणे टाळलेले अधिक बरे असे सुचवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा