मानवाचेच मुळ अफ्रिकेत का?
आताची श्री शैलेन्द्र यांची सुरु असलेली||कोहम्|| लेख मलिका आणि डॉ सुहास म्हात्रे याची 'पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास' लेख मलीका, या दोन्ही लेख मालिका अत्यंत छान आहेत. या दोन्ही लेख माले मध्ये मनुष्य प्राण्याच्या उगमाची आणि भ्रमणाची कथा/गाथा तर्क आणि शास्त्रीय आधारावर मांडली आहे. या मध्ये वारंवार उल्लेखलेली एक थेरी आहे (जी सर्व मान्य आहे?). ती आशी की डिएनए चाचणी नुसार सर्व मनुष्य प्राण्यांचे उगम स्थांन अफ्रिकेत आहे तेथुनच सर्व मनुष्य अरब,चिन, भारत, अमेरिका, युरोप, ई. ई म्हणजे जगभर पसरले. म्युटेशन मुळे ते वेगळे दिसतात/ आहेत बाकी त्यांचे मुळ डिएनए हे अफ्रिकेतलेच आहे.
याबाबत मुळात माझ्या मनात शंका आहे. मुळातच हा शोध मला जरा संणसणाटी या प्रकरातील वटतो. या शोधा कडे बघितल्यावर एखादा उत्तम गुढ सिनेमा अठवतो. ज्या मध्ये आपल्याला सतत वाटत असते की याने खुन केला असेल त्याने खुन केला असेल पण शेवटी खुनी वेगळाच निघतो. मग आपण डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो अरेच्या!. डिएनए संशोधनाचा निशर्कष ही असाच आहे. आपल्याला वटत उगम युरोपात असेल, अमेरिकेत असेल, भारतात असेल ई. ई. पण नाही अरेच्या! तो तर अफ्रिकेत आहे. आहे की नाही निकाल सिनेमाला साजेसा.
आता मला असे का वाटते त्याविषयी,
१. जर मनुष्य प्राणी हा आफ्रिकेतुन इतरत्र स्थलांतरीत झाला असेल तर, फक्त मनुष्यच का? की हे इतर सर्व प्राण्यांना अपोआप लागु होते. जसे वाघ, सिंह, हत्ती, घोडे, कुत्रा, गाय, ई. ई. सर्व प्राणी आफ्रिकेतुन आले आणि मग म्युटेशन मुळे वेग-वेगळया खंडातील प्राणी हे वेग वेगळे दिसतात, पुर्वी त्यांचे पण आई बाप एकच होते आणि ते ही आफ्रिकेत. जर हे खर असेल तर मग आफ्रिका सोडुन दुसरी कडे कुठेच सजिव प्राणी जन्मला नाही असे समजायचे का? हा विचार पचायला जरा जड वटतोना. म्हणुनच मला वाटते की भुतलावर जेंव्हा मनुष्य प्राण्याला जन्मासाठी अनुकुल वतावरण झाले तेंव्हा ते सर्व खंडात अवतरले. नंतर भलेही भ्रमण झाले असतील. पण एकच उगम स्थान जरा अतिच वटते. झाडांची ही गणना सुध्दा सजिवात होते, मग पहिल झाड सुध्दा आफ्रिकेत उगवलं का?
२. मुळात ज्या आफ्रिकेतुन मनुष्य प्राणी आला आहे तिथे तो अजुन खुप मगास वाटतो. त्या मानाने अरब, चिन, भारत, अमेरिका, युरोप, ई. ई ठिकाणी प्राचिन ईतिहासातही त्याने ठसा उमटवला आहे. या प्रत्येक संस्क्रुतीत जगण्यासाठीच अस एक विज्ञान होत जे सतत प्रगल्भ होत होत, शहर वसवली जात होती त्या मानाने मनुष्य प्राणी ज्या आफ्रिकेतुन इतरत्र स्थलांतरीत झाला तेथे काहीच घडत नव्हत. आजही मुळ आफ्रिकन लोकांच संशोधनात जगाच्या पटलावर कुठेही उल्लेखनिय स्थान नाही, तिथेच मनुष्य मागे का आहेत, उगम स्थान असुनही. मायन, मोहन जोदरो, हडप्पा ई ई या सारख्या रेखिव संस्क्रुती अमेरिका, भारत, चिन, युरोप ई ई देशात सापडतात, अस आफ्रिकेत सापडल्याच आठवत नाही. काहीही न करता हे लोक आफ्रिकेत हजारो वर्ष राहिले आदिवासी सारखे , हे पटत नाही. हजरो वर्षा नंतर सुधा हे लोक पुर्वजांच्या जवळ जास्त वाटतात ईतर मनुष्यां पेक्षा. (क्रुपया यात ईजिप्त धरु नये कारण ते लोक मुळ अफ्रिकन पेक्षा वेगळे आणि युरोप- अरब च्या जवळ चे वाटतात. मी टिपीकल आफ्रिकन लोकांन विषयी बोलत आहे, ज्यांना मानवाचे मुळ पुरुष संबोधित केले आहे.).
आत सांगा तुम्हाला काय वाटतं?
ह्या erectus चा युरोपात असण्याचा कुठलाही पुरावा नाही
. आता जर हा erectus युरोपात गेलाच नाही तर त्याच्यात म्युटेशन होण्याचा प्रश्नच येत नाही http://news.nationalpost.com/news/oldest-ever-human-forerunner-dna-found-in-400000-year-old-pit-of-bones-fossil-poses-new-evolutionary-mysteryसाधारण 50000 वर्षांपूर्वी मात्र असा बिंदू आला, कि या दोन वंशातील जनुकीय नकाशा बदलला आणि संकर अशक्य झाला.
मुळातच स्पेन मध्ये ४ लाख वर्ष जुना जो सांगडा मिळाला(December 5, 2013 ) तो neanderthalensis चा आहे, म्हणजे वेगळा वंश हे अस्तित्व neanderthalensis यांच किमान ४ लाख वर्ष जुना आहे. त्यामुळे साधारण 50000 वर्षांपूर्वी मात्र असा बिंदू आला, कि या दोन वंशातील जनुकीय नकाशा बदलला आणि संकर अशक्य झाला याला काही अर्थ रहात नाही. कारण आपापसात तर ते संकर करु शकत होते. neanderthalensis यांच्या डिएनए चा काही भाग आज ही युरोपीयन लोकान मध्ये सापडतो (सुलभ संदर्भ कोहम भाग २ )