Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निघाला (गजल)

स — संदीप-लेले, Sun, 03/26/2017 - 19:10
ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला नको नेमका तो, मनकवडा निघाला त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला नीती नियम सारे, त्याला जरी पढवले माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला नागास पाहता मी, वार इतके केले घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला देवास नवसून, ज्यास हुलकावले ‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला (दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे. नियमांचा फारसा अभ्यास न करता लिहिली आहे. चुकत माकत शिकायलाच आवडते. बरोबर उतरली आहे की नाही हे कळल्यास आनंद वाटेल.)

प्रतिक्रिया द्या
2679 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
पद्मावति Sun, 03/26/2017 - 21:49 नवीन
गजल आवडली . नियम मलाही काही माहीत नाही पण ही रचना मनाला भावली. सुरेख लयबद्ध आहे. फक्त शेवट मात्र कळला नाही. शक्य झाल्यास समजावुन सान्गा प्लीज.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Mon, 03/27/2017 - 14:49 नवीन
देवाला नवस करून, (देवळातून बाहेर पडले, तर समोर याचक होता - हा गर्भित अर्थ आहे), त्याला टाळले / हुलकावले. म्हणजे आत स्वतः:साठी बरेच काही मागितले आणि बाहेर दुसऱ्याला थोडेही द्यायची तयारी नाही ! तेंव्हा तो याचक म्हणतो तुमचं हे वागणं 'तो' (देव) पाहतो आहे. शेम्बडा हा शब्द याचक कोवळ्या वयाचा आहे असं दर्शवण्यासाठी आहे. म्हणजे लहान मुलाला जे कळते ते मोठ्यांना वळत नाही असे दाखवायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
व
वेल्लाभट Mon, 03/27/2017 - 04:39 नवीन
वा उत्तम भाव. एक दोन शेर तर सुरेखच.
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Mon, 03/27/2017 - 11:16 नवीन
शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Mon, 03/27/2017 - 14:50 नवीन
वेल्लाभट आणि समाधान राऊत, मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
ख
खग्या Mon, 03/27/2017 - 17:51 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/28/2017 - 20:02 नवीन
वाह !! प्रयत्न नक्कीच चांगला आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Wed, 03/29/2017 - 16:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
च
चौकटराजा Wed, 03/29/2017 - 07:45 नवीन
काही ठिकाणी लय गंडलेली आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Wed, 03/29/2017 - 16:15 नवीन
म्हणजे नक्की काय? आणि कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
शार्दुल_हातोळकर Wed, 03/29/2017 - 21:00 नवीन
हे केवळ एक उदाहरण पाहा.... साऱ्या नीतीकथा मी अध्यापिल्या जयास माणूस मानण्याला तो नागडा निघाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
स
संदीप-लेले गुरुवार, 03/30/2017 - 15:12 नवीन
" सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते " बरोबर. मात्रावृत्त / अक्षरगणवृत्त ई. गजलेच्या व्याकरणाची माहिती करायची आहे. ती झाल्यावर लयीचा अंदाज येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 03/30/2017 - 19:43 नवीन
मराठी गझलमधे लय, सुबोधता, सहजता आणि खोल अर्थ इत्यादी गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या. त्या साध्य झाल्यावर वृत्त, मात्रा, व्याकरण यामधे उन्नीस-बीस झाले तरी फारसा फरक पडत नाही. बाकी गझल सर्वसामान्य रसिक वाचकाच्या ह्रदयापर्यंत पोचणे महत्त्वाचे आणि गझलेचा अर्थ रसिकांना समजुन सांगण्याची वेळ गझलकारावर अजिबात येता कामा नये. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला सुचलेली कल्पना/विचार वगैरे कोणत्या वृत्तात म्हणजे थोडक्यात सांगायचे तर किती मात्रा/अक्षरांच्या ओळीमधे व्यवस्थित बसेल हे प्रथम ठरविणे उत्तम. म्हणजे नंतर एखादा चांगला आशय शेरामधे ओढुन ताणुन बसविण्याची वेळ येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 20:02 नवीन
वृत्ते व्यवस्थीत अभ्यासली की मग आपोआप वृत्तबद्ध आणि लयबद्ध लिहीणे सुरू होते. सरावाने सहज जमेल तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा 'वृत्तबद्ध' कविता आणि गझल यात फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 20:04 नवीन
बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे हि रचना 'गझल' या प्रकारात मोडत नाही. आपल्यातल्या चर्चेनुसार काही बदल करता येताहेत का ते पाहा. जमतील तुम्हाला सहज. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Fri, 04/07/2017 - 22:17 नवीन
शार्दुल आणि विशाल, स्वत:च्या लिखाणा विषयी नवीन msg आल्याचे इथे सूचित होत नाही असे दिसते. त्यामुळे तुमचे नवीन msg मी आत्ता पाहिले. सूचनांचे स्वागत. आधी गजलेचे व्याकरण थोडे समजून घेतो - मग दुरुस्ती चे पाहतो. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा