Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोललो नाही कधी पण...

स — सत्यजित..., Wed, 03/29/2017 - 09:20
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले बोललो नाही कधी पण दुःख तर झाले! चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली वार काही काळजाच्या खोलवर झाले! लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले! या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले! तू दिलेली डायरी अन् पीसही जपले डायरी आकाश माझे..पीस पर झाले! व्हायचे असतेच ते होवून जाते पण नेमके कळले कुठे जे आजवर झाले? —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
1530 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
संदीप-लेले Wed, 03/29/2017 - 16:44 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 03/31/2017 - 21:08 नवीन
धन्यवाद संदिपजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/29/2017 - 19:51 नवीन
वाह रे मभाया... !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 03/31/2017 - 21:11 नवीन
माफ करा,पण मभाया म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा