Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निळाई ...

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 03/30/2017 - 07:58
1 . . . नजर पोचते जिथवर तितके निळ्या नभाशी निळेच पाणी पाण्यात सोडूनी पाय बैसली निळावती ती कुणी जलराणी मित्र पांघरे निळीच दुलई निळे व्योम अन निळी धरा सभोवार फाकली निळाई निल नभांगणी निळा झरा मंद निळाई शुभ्र निळाई निळा होय कातळ काळा जळी कोरडे कमळ निळे वात्सल्याचे गोत ही निळे गात्रांत उमलला बहर निळा निळी बासरी सावळ कान्हा हृदयी पाझरे पाझर निळा माय वत्सल निळाच पान्हा विशाल कुलकर्णी .

प्रतिक्रिया द्या
8071 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
पैसा गुरुवार, 03/30/2017 - 12:56 नवीन
कसली सुंदर लिहिली आहेस कविता!! "नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा" आठवला एकदम!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 19:58 नवीन
धन्यवाद संपादक मंडळी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/01/2017 - 05:03 नवीन
धन्यवाद स्वीकारते. पण त्येवढं संपादक मंडळी वगळा. ते वायले. आम्ही वायले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Sun, 04/02/2017 - 11:21 नवीन
माफी द्येवा माय एकवार ... समद्यांस्नी थ्यांकू ! निसत्ये प्रतिसाद दिलेल्यांचच न्हाय तर ज्येनी ज्येनी वाचलं त्या समद्यांचं दिकून थ्यांकू =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मोदक गुरुवार, 03/30/2017 - 13:14 नवीन
नजर पोचते जिथवर तितके निळ्या नभाशी निळेच पाणी पाण्यात सोडूनी पाय बैसली निळावती ती कुणी जलराणी या सोबत एक समुद्रकिनार्‍याचा एक निळा फोटो दे. बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 19:50 नवीन
हा चालेल का? संपादक मंडळी, आपल्यापैकी कुणी हा फोटो वरच्या मुळ पोस्टमध्ये जोडून द्याल काय? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 19:55 नवीन
किंवा हा फोटो... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
अ
अत्रे Fri, 03/31/2017 - 04:45 नवीन
यात HDR इफेक्ट खूप वापरला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Fri, 03/31/2017 - 08:45 नवीन
ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट केलेत काही प्रमाणात. बाकी कुठलाही इफेक्ट नाही वापरलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 03/30/2017 - 19:49 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/30/2017 - 20:04 नवीन
वाह... फोटू तो फोटू... कविता भी कम्माल है!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 03/31/2017 - 04:36 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 03/31/2017 - 08:46 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ब
बरखा Fri, 03/31/2017 - 09:48 नवीन
आवडली कविता. खुप छान लिहीलिये.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 03/31/2017 - 21:14 नवीन
कविता आवडलीच!अभिनंदन,शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 04/02/2017 - 11:22 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 04/02/2017 - 11:59 नवीन
सुंदर कविता ! पाठ्यपुस्तकात शोभावी अशी !
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 04/03/2017 - 09:36 नवीन
मस्त कविता विशाल भाऊ... पण फुटू तेवढा मातीतला पायजे होता हा फुटू आन कविता थोड मिस म्याच वाटत आहे मला (हे आपल माझ मत बर का ) बाकी ईशाल भाऊ वळख हाये का आमची का इसारले आम्हाला ?
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 04/03/2017 - 11:26 नवीन
तुमाले कसं इसरु भाव ? ठ्यांकू बर्का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा