लेगिंग्स ,शॉर्ट्स ......महिलांचे हे काय चालू आहे?????????
नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली.
यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते.
तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते.
आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते.
यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच.
हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे.
कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे.
हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.
💬 प्रतिसाद
(121)
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/30/2017 - 19:23
नवीन
धाग्याच्या शीर्षकाची सुरूवात 'ले' या अक्षराने होत आहे. म्हणून श्रीगणेशाला स्मरून 'ले' अक्षराने अंताक्षरीचा सुआरंभ करीत आहे.
लेक लाडकी या घर्ची, होणार सून मी त्या घर्ची
होओणा S S र सून मी त्या घर्ची
'ची' अक्षर आलंय.
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Fri, 03/31/2017 - 07:30
नवीन
चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सून बेखबर, प्यार कर
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 10:41
नवीन
रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई गेला मोहन कुणीकडे | (धृ)
तरुवर भिजले भिजल्या वेली, ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली, दचकुन माझा ऊर उडे
ग बाई गेला मोहन कुणीकडे |
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/31/2017 - 10:47
नवीन
डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवलाऽऽ
चांद उंगवला न चांदन्या बगावं निंगाल्याऽऽऽ!!
य आला.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 03/31/2017 - 11:00
नवीन
या गो दांड्यावरना नवरा कुणाचा येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या ठुमकत नाचत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 11:03
नवीन
यो ग यो ग पावना, सकूSSSचा म्यव्हना,
माज्याकडं बगून हस्तोय ग, कायतरी घ्वोटाळा दिस्तोय ग|
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/31/2017 - 11:15
नवीन
गौरीगनपतीचे सनाला गो बयनी बेगिन संगे चल म्हायेराला
गारी घोर्याची उबी हाय मंगले दाराला
कर बेगिन तय्यारी नेस नवी सारी
बेगिन संगे चल म्हायेराला
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 11:19
नवीन
लाजून हासणे अन हासून ते पहाणे,
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे |
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/31/2017 - 11:24
नवीन
डोस्केदुखी लेखाला गीतमाला भेट द्यायची आयडीया लै भारीय बरका गुर्जी.
थ्यांक्स फॉर आयडीया.
आपल्याकडं लै गाणी बी हायेत अन बजावणारेबी. ;)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 11:29
नवीन
ण (न) अक्षर आलंय. गाणं सांगा.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/31/2017 - 11:42
नवीन
नाचू किती लाजू किती कंबार लचकलीऽऽनाचू किती लाजू किती कंबार लचकलीऽऽ
आहो ठेच लागली जाता जाता जोडवी टचाकली
बाजारपेठही कोल्लापूरची काय मी म्हनू हिला, नखरेल नार ही सोळा जातीची दिसली खरी कला!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 11:50
नवीन
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !
चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 03/31/2017 - 11:47
नवीन
ना गजरा वा हार
ना केशभूषा फार
ना मेकप केला यर
तरीपण कित्ती सुंदर तू गं बाई
कित्ती सुंदर तू
जेगिंग घालत नाय
ती शॉर्ट घालत नाय
नऊवार नेसून बाय
दिसते कित्ती सुंदर तू गं बाई
कित्ती सुंदर तू
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 11:51
नवीन
खि खि खि!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 03/31/2017 - 12:31
नवीन
खोचना क्या जो भी होगा देखा जाएगा
आय अॅम सॉरी
सोचना क्या आहे ना ते... असो. अजून एक विडंबन नको. रियल गाणं घेऊ रियल.
खुली जो आंख तो वो था न वो ज़माना था
दहकती आग थी, तनहाई थी फसाना था
खुली जो आंख तो
त आला
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 03/31/2017 - 16:01
नवीन
त्तेर्रे मेर्रे बीच्चं में
कैसा हय ये बन्दन ,
अन्जा zzzzz आ zzzzz नां ,
मैंने नयी ज्याना , तुने नयी ज्याना .
न आला .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/31/2017 - 16:43
नवीन
नको मेनका, नको उर्वशी, नको अप्सरा कुणी
मदिरेहुनही धुंद अशी ती मला हवी पद्मिनी |
तिचे असावे सुंदर डोळे
केस रेशमी काळे-काळे
हृदयामधले भाव दिसावे नेत्रांच्या दर्पणी |
हवे गुलाबी गाल बोलके
अमृत भरले अधर लाडके
तिच्या सारखी तीच असावी प्रणयधुंद कामिनी |
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/01/2017 - 19:53
नवीन
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे,
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे,
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता,
इमे सादरं त्वां नमामो वयम् |
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं,
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ||
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं,
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् |
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं,
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्
समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्
भारत माता की जय ।।
य आला हो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 04/02/2017 - 06:42
नवीन
यक लाज्रान साज्रान मुक्डा, चंद्रावानी फुल्ला गं
राजा मदन हस्तुया असा, कि जीव माजा भुल्ला गंं
या एकांताचा तुला इशारा कळ्ळा गंं
लाज आडवी येती मला, कि जीव माजा भुल्ला गं
नग रानी नग लाSSजु, लाजन बी नग भिजु
हित्त नको तित्त जाऊऊ, आडोशाला हुब्बSS राऊ
काआSS?
बग्त्यात्
_________________
त् अक्षर आलंय.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/03/2017 - 03:07
नवीन
तिन्ही लोकं आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सुर लावु दे रे
शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या ह्या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे!!!!
र आला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 04/03/2017 - 04:42
नवीन
रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा ॥धृ.॥
राम सज्जनांचा त्राता, हाती धनु पृष्ठी भाता
राम दुर्जनांचा वैरी, राम त्राटिकेसी मारी ॥१॥
रामे धनुष्य मोडिले, नाते सीतेशी जोडिले
राम जानकीचा नाथ, पराक्रमी पुण्यवंत ॥२॥
राम वनवासी झाला, पितृवचनी गुंतला
राम भुलावण केली, शूर्पणखा विटंबिली
राम शूर शिरोमणी, एक पत्नी एक बाणी ॥३॥
रामा राक्षसे भोवली, सीता दशानने नेली
राम लोचने पेटली, रामे निर्दालिळा वाली
राम किष्किंधेसी आला, सखा सुग्रिवाचा झाला ॥४॥
रामे सैन्य मेळविली, चाल लंकेवरी केली
राम आला, राम आला, रामे सागर जिंकीला
रामा आडवितो कोण, जळी स्थिरले पाषाण
मरू घातला रावण, मार्गे चाले 'रामायण' ॥५॥
गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगुळकर
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 03/30/2017 - 19:34
नवीन
ओह ! म्हैलांनी दाणे टाकायचे बंद केले की काय ? केसांचं काय केलं ते सांगा बरे !
- Log in or register to post comments
ए
एका
गुरुवार, 03/30/2017 - 19:41
नवीन
Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare. चा जमाना आलाय.
- Log in or register to post comments
N
Nitin Palkar
Fri, 03/31/2017 - 17:43
नवीन
पूर्णपणे सहमत! वेद काळापासून स्रियांचा पोशाख असाच असे, eye catching. स्त्रियांनादेखील पुरुषांनी त्यांच्याकडे पाहावं, वळून पाहावं, असं वाटत असावं.
बलात्कार आणि स्त्रियांचा पोशाख यांची सांगड घालणे अतिशय अयोग्य आहे.
बलात्कार करणं ही नक्की एक विकृती आहे. नऊ वारी साडी नेसून जाणार्या स्त्री वर बलात्कार होऊच शकणार नाही असे आहे का?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 03/31/2017 - 02:12
नवीन
लेखाची सुरुवात अमुक विमान कंपनीने या ड्रेसवर बंदी आणली आणि नंतर मागे घेतली असा आहे. ते ड्रेस स्वातंत्र्या विमान कंपनीला { हॅाटेल्सही ठरवतात,चपला धोतर घालायचे का नाही वगैरे } असावे का या मुद्यावर चर्चा घडवा प्रथम.
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 03/31/2017 - 07:46
नवीन
मी काय म्हंतो टर्बो भौ..
सगळे अवयव मूळ आकारात दिसतात ते मान्य! पण शेवटी अवयव तेच आहेत ना..कुठल्याही स्त्रीचे अथवा पुरुषाचे ते सारखेच असतात...कश्याला वारंवार वळून बघायचं म्हंतो मी??
तरीही राहवत नसेल तर दिवसात पहिल्यांदा जी स्त्री (शक्यतो स्वतःची पत्नी) दिसते तिला बघून घ्यावं डोळे भरून...येणाऱ्याजाणाऱ्या स्त्रीकडे कशाला बघायचं..
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 03/31/2017 - 08:10
नवीन
हेच म्हणतो. आपल्याला कुत्र्या मांजरांचे पण अवयव दिसतात पण म्हणून आपण काय ...
असो.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 03/31/2017 - 08:13
नवीन
हा युट्युब व्हिडीओ बघावा HER - "LET THE VOICE BE YOURS". WOMEN'S DAY SHORT FILM
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 03/31/2017 - 08:14
नवीन
https://www.youtube.com/watch?v=_BkG2llPJGs
- Log in or register to post comments
M
mayurpankhie
Fri, 03/31/2017 - 09:08
नवीन
छान ...
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Fri, 03/31/2017 - 08:26
नवीन
बरेच पुरुष आणि स्त्री, हे ४ लोकात किंवा सोशल नेटवर्किंग वर स्त्रियांच्या मुक्त वागण्याचे अणि समान अधिकारंचे तावातावाने समर्थन करुण आम्ही किती आधुनिक विचारांचे आहोत हे दाखवयचा आटापिटा करतात
मात्र खाजगीत किंवा ४ भिंतीआड़ मात्र वेगळच मत मांडतात.
फिलोसोफर साहेब, तुम्ही मात्र तुमचे खाजगी मत इथे सार्वजनिक केलेत.
अब भुगतो.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/31/2017 - 08:32
नवीन
मी अगदी सहमत आहे. मी काय म्हणतो, इथे लेख लिहीण्यापेक्षा तुम्ही तुमच्या सातार्यात चळवळ सुरु करा आणि विशीतल्या शकुपासून साठीतल्या काकूपर्यंत सगळ्यांनी नऊवार लुगडी नेसायला हवीत यासाठी प्राणांतिक उपोषण करा.
लोकांनी उपोषणाची दखल घेतली तर पेहरावात बदल होऊन आणि नाही घेतली तर पांडुरंगचरणी विलीन होऊन तुमचा प्रॉब्लेम सुटेल.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 03/31/2017 - 09:19
नवीन
ठो !
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/31/2017 - 09:28
नवीन
ह्या इव्हेंटसाठी मी तीनचार तरी तगडे स्पॉन्सरर द्यायला तयार आहे. फ्लेक्स फुकट.
बघा.... अशी संधी परत येणार नै. ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/31/2017 - 09:31
नवीन
एक स्लोगन पण घ्या माझ्यातर्फे.
"सातारला जाताना सांडली बुगडी
नको त्या लेगीन्स, नेसा फक्त लुगडी"
कशी वाटत्ये???
.
ही आवडली तर अजून पाडतो.. ;)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 03/31/2017 - 10:03
नवीन
शॉर्ट्स लेगिंग्स कचर्यात टाका
नऊवार नेसा अवयव झाका
डोन्ट लेट लूज बाय वेअरिंग टाईट
लेगिंग शॉर्ट एकदम वाईट
सेल्फीत सुद्धा करू नका पाऊट
नऊवारी ईन, लेगिंग आउट
अरे हाय काय नाय काय
झाकून टाका डोकं ते पाय
अभ्या... बघ बाबा जमतंय का यातलं काही !
आवडलं तर सांग मी फ्रीलान्स करायला उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/31/2017 - 10:14
नवीन
हाण तू हाण..........एकसेएक बनलेत
.
आपण यमकहराम्याना असेच इवेंट कामी येणारेत.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 03/31/2017 - 10:22
नवीन
मग तर बासच ना भौ ! फुल दणका.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Fri, 03/31/2017 - 12:01
नवीन
अभ्या आणि वेल्ला
अरे काय चाललंय .. =]]]
येड्या सारखा हसतोय
- Log in or register to post comments
ल
लाडू
Fri, 03/31/2017 - 12:17
नवीन
आई शप्पथ! भारी जमलंय
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 03/31/2017 - 14:13
नवीन
लोल!
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Fri, 03/31/2017 - 12:06
नवीन
लेगिन्स घातले कि टॉफी ला वाटतात सगळे उघडी . .
नऊवारी नेस आणि खेळा रोज फुगडी
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/31/2017 - 12:28
नवीन
अबे अश्लील अश्लील.
लेगीन्स घालून उघड्याने टॉफी कोण वाटतंय बे? की वाटलेल्या टॉफ्या सगळे उघडतेत?
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 04/01/2017 - 07:44
नवीन
आता ते तुझ्या शील - अश्लील त्याच्या थ्रेशहोल्ड वर ठरेल.. =]]]
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 03/31/2017 - 12:32
नवीन
जमलय ब'डी'
- Log in or register to post comments
N
Nitin Palkar
Sun, 04/02/2017 - 09:32
नवीन
तगडे आर्थिक की शारीरिक ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 03/31/2017 - 11:25
नवीन
नऊवारी नीट नेसली नाही तर स्विमिंग सूट इतकीच revealing होते. त्यापेक्षा बुरखे बरे.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 03/31/2017 - 13:40
नवीन
ते झालंच, पण टफिंना बुरख्यांचाही प्रॉब्लेम असला म्हणजे आली का पंचाईत!! त्यांनी उपोषण करावं हे उत्तम. =))
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 03/31/2017 - 08:32
नवीन
व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करणार्या देशाच्या एअरलाईन्स ने असे करावे म्हणजे ....
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/31/2017 - 08:37
नवीन
हा राव टफी, हे लेगीन्स परकरण लैच तापदायक आहे.
आपल्या युनिटात टीशर्ट आणि इतर गारमेंटस बनत. मग आमच्या एका पार्टनरच्या डोस्क्यात लेगीन्स प्रोडक्शनचे खूळ शिरले. काय शिंपल तर असते म्हणला. लायक्रा बेस होजिअरी मटेरिअल वापरुन बेस साईज प्रोड्युस करायला सुरुवात केली. काय सांगू राव, चिल्लर चिल्लर गावातले दुकानदार पण प्रत्येक प्रकारात, प्रत्येक साईजात कमीत कमी ७५ रंगाची रेंज मागतात हो. परत अमुल, एस्सा अशा बनेनवाल्या मोठ्या होजिअरी कंपन्या ह्यात उतरल्यात. बर मोठी रेंज दिली तरी त्यात काप्री बिप्री का काय असल्या स्टाइल्स असतात म्हणे, त्या बनवल्या तर आता फ्लुरोसंट मटेरिअल, ग्लॉसी मटेरिअल मागतात, ते ही दिले की प्रिंटेड फ्लोरल डिझाईनचा फंडा आलाय. सगळं करुन जेगीन्स बिगिन्स पण आहेत का विचारतात. वैतागलाय राव तो.
जेन्टस टीशर्ट बरे म्हनून परत तेच करायलाय. ;)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »