Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अस्पृश्य

ओ — ओ, गुरुवार, 03/30/2017 - 19:22
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराच्या गरजा भागवण्या साठी वेगवेगळी सोंग नाचवतो,ह्या संसाराच्या शर्यतीत ,आपली लाईफ स्टाईल मेनटेन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो,पण ह्या शर्यतीत पळत असताना आपल्या आत असलेल्या परब्रम्हाला मात्र विसरून जातो,आणि आणि आपला इग्नोरन्स त्या आत्म्याला कायम अस्पृश्य ठेवतो,देहाला नटवताना आणि रंगवताना,अंतरीचा वेगळा रंग पाहायला मात्र आपण कधी कधी विसरतो.....त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ? अंतरीच्या गूढ गर्भात मी अस्पर्शित च राहिलो संसाराच्या शर्यतीत मी दुर्लक्षितच राहिलो पंचकोशांचे लेणे लेऊन मी आत बंधिस्त जाहलो पंचेंद्रियांचे संधान बांधून मीच व्यक्त होऊ पाहतो शरीराच्या पिंजऱ्यात अडकलेला स्वछंदी एक पक्षी मी श्वासा वाटे आत येणारा आवश्यक प्राणवायू मी बंधिस्त असलो पिंजर्यात शरीराच्या तरीही आहे मुक्त मी अनंताचा अंश घेऊन त्यातच जळणारा एक दीप मी शरीराच्या लखलखत्या तेजाचा स्रोत असलेला सूर्य मी खोट्या रंगरंगोटीत देहाच्या अस्पृश्य राहिलेला आत्मा मी ---© ओंकार जोशी

प्रतिक्रिया द्या
1250 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/31/2017 - 08:10 नवीन
@त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ?››› सांगू का? Image removed.
  • Log in or register to post comments
ओ
ओ Fri, 03/31/2017 - 12:30 नवीन
कृपया सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पद्मावति Fri, 03/31/2017 - 08:17 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ओ
ओ Fri, 03/31/2017 - 12:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
संजय क्षीरसागर Fri, 03/31/2017 - 14:26 नवीन
यात दोन गैरसमज आहेत : १) आत्मा म्हणजे प्राणवायू नाही. २) आत्म्याला प्राणवायू लागत नाही.
  • Log in or register to post comments
ओ
ओ Sat, 04/01/2017 - 08:38 नवीन
अगदी बरोबर आहे तुमचं,आपला अभिप्राय लक्षात घेतला आहे,धन्यवाद,पण ही केवळ एक कल्पना आहे,आणि कल्पनेत काहीही अतर्क्य गोष्टी होऊ शकतात ह्या अनुषंगाने हे मला सुचलं असावं….आपण वेळ काढून हे वाचलं आणि अभिप्राय ही दिला त्या बद्दल खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा