Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चेटकीण

ओ — ओ, Sat, 04/01/2017 - 08:59
आमच्या लहान पणी म्हणे एक चेटकीण असायची जी मुलं मस्ती करतात त्यांना ती पकडून न्यायची गावाबाहेर नदीच्या पल्याड तिची झोपडी असायची नाही म्हटलं तरी आम्हाला तिची मनापासून भीती वाटायची मोठे लोक म्हणायचे मुकाट्याने जेवा नाही तर ती येईल वेदना असह्य होतील अशा गरम तेलाच्या कढईत ती टाकील हि चेटकीण आम्हाला विविध रूपात भेटायची कधी हडळ बनून तर कधी बुआ बनून यायची मस्तीखोर मुलांना पकडून नेणच जणूं तीच काम होत आमच्या आयुष्यात मात्र तिला बागुलबुवा च स्थान होत आमच्या बालपणाच्या गोष्टीत तिला एक खास जागा होती अगदी आई बाबांच्या लहान पणी सुद्धा ती अशीच म्हातारी होती तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले चांगल्या सवयी लहानपणी लागव्यात म्हणून तिनेच भाग पाडले तिने घातलेल्या भीतीतला प्रेमाचा ओलावा मात्र कळाला नाही तिला त्या वळणावर सोडून कधी मोठे झालो कळलंच नाही आज मागे वळून पाहतो तेव्हा तिची झोपडी काही दिसत नाही भीतीपोटी निर्माण झालेली तिची ओढ काही केल्या जात नाही काय जादू करायची की मुलांना प्राण्यात बदलून टाकायची अल्लड खट्याळ बालपण तिच्या जादूने मंत्रमुग्ध करायची ----© ओंकार जोशी

प्रतिक्रिया द्या
1462 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पद्मावति Sat, 04/01/2017 - 23:32 नवीन
फारच मस्तं.
तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले चांगल्या सवयी लहानपणी लागव्यात म्हणून तिनेच भाग पाडले
हे खासच!
  • Log in or register to post comments
ओ
ओ Sun, 04/02/2017 - 17:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
प
प्राची अश्विनी Sun, 04/02/2017 - 01:56 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ओ
ओ Sun, 04/02/2017 - 17:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
पैसा Mon, 04/03/2017 - 06:07 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ओ
ओ Mon, 04/03/2017 - 09:21 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बरखा Mon, 04/03/2017 - 12:03 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा