मध्यरात्री
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने
मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे
मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता
💬 प्रतिसाद
(16)
प
पद्मावति
Sun, 04/02/2017 - 08:21
नवीन
सुरेख!
वितळते चांदणे, त्याची फेनील प्रभा, ओन्जळीचा चषक ..आहाहा!!! केवळ आणि केवळ अफलातून!
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 04/02/2017 - 08:34
नवीन
'गंध थरथरत्या तृणांचे' ऐवजी 'गुज थरथरत्या तृणांचे' असे केले तर?
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 04/02/2017 - 08:34
नवीन
'गंध थरथरत्या तृणांचे' ऐवजी 'गुज थरथरत्या तृणांचे' असे केले तर?
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 04/03/2017 - 12:13
नवीन
मस्त.. फार आवडली..
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 04/10/2017 - 11:10
नवीन
सौरा, पद्मावती धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
गुरुवार, 04/13/2017 - 23:31
नवीन
मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा फोल मिसरा
अन् पहाटे शेर व्हावा,सत्य-सुंदर खोल-गहिरा!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sun, 04/16/2017 - 14:24
नवीन
ही खरी दाद..!
- Log in or register to post comments
म
मितान
Sun, 04/16/2017 - 19:42
नवीन
सुंदर !!!!
कविता आणि प्रतिसादातील ओळी !!
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Sun, 04/16/2017 - 21:04
नवीन
___/\___
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 04/17/2017 - 07:15
नवीन
अप्रतिम.. जियो..
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Mon, 04/17/2017 - 11:27
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 04/17/2017 - 10:45
नवीन
मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा फोल मिसरा
अन् पहाटे शेर व्हावा,स ह ज-सुंदर खोल-गहिरा!
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Mon, 04/17/2017 - 11:20
नवीन
बदल तसा सहजच आहे,काहीच हरकत नाही!
आयुष्याच्या कवितेला पूर्णता देणाऱ्या अंतिम सत्याशी मी तो शेर जोडू पाहत होतो!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 04/17/2017 - 07:11
नवीन
मितान, सत्यजित धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Fri, 04/21/2017 - 16:13
नवीन
वाह!!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sat, 04/22/2017 - 13:18
नवीन
प्रीत-मोहर, धन्यवाद!
- Log in or register to post comments