Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३

र
रेवती
Sun, 04/02/2017 - 19:33
🗣 177 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अ‍ॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
49093 वाचन

💬 प्रतिसाद (177)
ग
गवि Sun, 04/02/2017 - 19:48 नवीन
माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन. आता इतर काही विचित्र पण अावडणार्या वासांविषयी. मला पेट्रोलियम (गॅसोलीन) टाईपचा पर्फ्यूम कुठे मिळेल का? तसंच गॅरेजमधला धातू, ग्रीस, ऑईल्स वगैरेचा मिश्र वास. लाकूड, सनमायका आणि कार्पेटयुक्त थंडगार एसीयुक्त केबिनमधे येणारा वास. सोसायट्यांमधे फिरत फिरत डासप्रतिबंधक शुक्र धूर सोडणारी स्मोक गन. आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का? यापैकी काही वासांचे पर्फ्यूम्स सापडले पण सर्व फॉरेनवाले किंमती २० ते ३५ हजारपर्यंत. :-(
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 04/03/2017 - 08:59 नवीन
फटाक्यांची माळ फुटल्यावर येणारा वास मला भारी आवडतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 04/03/2017 - 11:43 नवीन
+१.. हा वास फटाके हाताळल्यावर हातांनाही येतो. शिवाय हातात फुलबाजी तडतडत असताना नाकात शिरणारा विशिष्ट तप्त वास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अभ्या.. Mon, 04/03/2017 - 11:06 नवीन
आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?
बुकबायंडिंग केलेला नव्या नव्या पुस्तकाचा वास, फ्लेक्स मशीन चालू असताना सॉल्व्हंटचा उग्र वास, ऑफसेट मशीन क्लीन करताना थिनर आणि इंकचा मिक्स वास' पेपरचे गट्ठे खोलताना येणारा विशेष वास, गाड्या सर्व्हिसिंग करताना वॉश करतात तेंव्हाचा वास, कीवी शू पॉलिशचा वास, स्वेड लेदरचे शूज नवेनवे असताना येणारा वास. . ह्यातले बरेचसे रोजच्या अनुभवातले आहेत पण मला आवडतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आनंदी गोपाळ Tue, 04/04/2017 - 18:30 नवीन
फ्लेक्स मशीन चालू असताना सॉल्व्हंटचा उग्र वास, ऑफसेट मशीन क्लीन करताना थिनर आणि इंकचा मिक्स वास' कीवी शू पॉलिशचा वास,
<< हे सगळे नशा आणणारे आहेत, असे नोंदवितो. यादीतले इतर याचेच डायल्यूटेड वास आहेत. वास म्हणजे दुरून घेतलेली चव, हे माझे जुने निरिक्षण / फॅक्ट यानिमित्ताने इथे नोंदवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पद्मावति गुरुवार, 08/03/2017 - 18:52 नवीन
आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?
नुकतेच गवत कापल्यावरचा वास सकाळी कॅफे मधला कॉफीचा वास ( का कोणास ठाऊक तसा सुगंध घरी कॉफी केली की नाही येत ) माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन. आहा! जसमीनचा एक पर्फ्यूम मागवला होता त्याचा वास मात्र अजीबात आवडला नाही. केयो कार्पिन तेल अंगावर फवारल्यासारखे वाटत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/02/2017 - 20:14 नवीन
JBL C100SI In-Ear Headphones with Mic घेतला एव्हढ्यातच. Image removed. Image removed. कर्णरम्य आवाज आहे.
  • Log in or register to post comments
स
सावत्या Sun, 04/02/2017 - 20:27 नवीन
खरतरं कालच हा धागा काढायचा ठरवलं होतं, पण कंटाळा केला. anyway धागा काढलाच आहे तर.. जुना सॅमसंग S3 वापरून ४ वर्ष झाली, अजून तरी चांगला चालतोय पण जरा स्लोलावलाय.. म्हणून नवीन मोबाईल घ्यायचं ठरवलं. दुबई शॉपिंग फेस्टिवल मध्ये काही विशेष ऑफर्स नव्हत्या. इथं अबूधाबीत GITEX डिजिटल एक्स्पो होतं ४ दिवस. इलेक्ट्रॉनिक्स वर जबरया सेल होता.आयफोन ७ प्लस कि S7 edge ड्युअल सिम मध्ये सॅमसंगने बाजी मारली. बरेच सुपरमार्केट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ऑउटलेट्स धुंडल्यानंतर LULU सुपरमार्केटला मस्त ऑफर मिळाली म्हणून S7 edge घेतला. HP च्या जुन्या लॅपटॉपची तीच गत झालीय म्हणून DELL i7 7th generation 8GB रॅम, 15.6" डिस्प्ले लॅपटॉप घेतला. Bose वर काही ऑफर मिळतंय का बघतोय. होम थिएटर सिस्टिम घ्यायचीय.. बघू कधी शक्य होतंय.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 04/02/2017 - 21:53 नवीन
स्वारी हां, मी नवा धागा काढून ताकल्याबद्दल. आता यापुढील तुम्ही काढा. १०० प्रतिसाद झाले की लगेच! स्लोलावलाय. हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सावत्या
अ
अभिजीत अवलिया Mon, 04/03/2017 - 02:21 नवीन
पुढच्या वर्षी नक्की घेऊ असे म्हणत बरीच वर्षे न घेतलेली हेल्थ ईन्शुरन्स पाॅलिसी घेतली. आदिदासचे क्लाउडफाॅम असलेले शूज घेतले. अतिशय आरामदायक आणी वजनाने हलके.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 08/03/2017 - 06:44 नवीन
क्लाऊड फोम आणि गोगा मॅट टेक्नॉलॉजी सेमच आहे का? स्केचर्स चे हे goga mat शूज पहा https://www.youtube.com/watch?v=VRhGChIo45o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 08/03/2017 - 07:16 नवीन
क्लाऊड फोम आणि गोगा मॅट टेक्नॉलॉजी सेम नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 04/03/2017 - 03:24 नवीन
वडलांसाठी असुस झेनफोन मॅक्स २ घेतला. मस्तं आहे. बहुधा मी माझा फोन बदलेन तेव्हा हाचं घ्यायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१ Mon, 04/03/2017 - 05:36 नवीन
काही खरेदी केलं नाही. आधी जी खरेदी झालेली त्याचे पैसे फेडले... इन शॉर्ट क्रेडिट कार्डाचे बिल भरले :D
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 04/03/2017 - 08:45 नवीन
हा एअर कूलर घेतला.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 04/03/2017 - 09:29 नवीन
मागच्या आठवड्यात आमच्या नवीन ऑफिससाठी सिम्फनी चा Diet कुलर घेतला. आणि जुन्या बायकोसाठी नवीन Redmi 4A (Gold, 16GB, 2GB ) घेतला ५९९८/- ला ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 04/04/2017 - 18:33 नवीन
उद्या रेडमी एमाय नोत४ चा फ्लॅशसेल आहे १२ वाजता. लक्षात ठेवा. चांगला फोन आहे, लय स्वस्तात. मला मिळो अशी सदिच्छा द्या अशी विनंती! (मास्तुरे, तुम्ही देणार नाही हे ठाउकेय :-P)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
क
किसन शिंदे Mon, 04/03/2017 - 10:37 नवीन
उकाडा थोडा सुसह्य व्हावा म्हणून गेल्या आठवड्यात हा एअर कूलर घेतला विजय सेल्समधून नऊ हजार तिनशेला. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 04/03/2017 - 11:20 नवीन
कसा आहे परफॉर्मन्स?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Mon, 04/03/2017 - 11:34 नवीन
चांगला आहे. त्यातही साध्या पाण्यासोबत वरच्या भागात आईस क्युब टाकतो तेव्हा बर्‍यापैकी थंड हवा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Mon, 04/03/2017 - 17:21 नवीन
धन्यवाद. जवळपास असाच दिसणारा सिम्फनीचा घेऊन आलो. ८९००/—
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सोमनाथ खांदवे Sun, 04/09/2017 - 17:54 नवीन
मी फॅन च्या आवाजा मूळे कुलर वापरात नव्हतो , महाराष्ट्र टाइम्स मधील लेख वाचून मी 250 mm चा प्लास्टिक ची पाती असलेला एक्झॉस्ट फॅन ( रु 1150 फक्त ) खिडकी मध्ये उलट्या दिशेने लावला . संध्याकाळी 8 वाजे पर्यंत खिडकी बाहेर ची हवा घरातील हवे पेक्षा थंड झालेली असते पण घरातील गरम हवे मुळे बाहेर ची थंड हवा आत येत नाही पण एक्झॉस्ट फॅन उलट्या दिशेने लावल्या मुळे आत मध्ये मस्त थंड हवा येते , कधी कधी रात्री थंडी वाजल्या मुळे एक्झॉस्ट फॅन बंद करायची वेळ येते . प्रयोग 100 % टक्के सक्सेस झाला आहे , सिलिंग फॅन 25 वॅट ते 75 वॅट व एक्झॉस्ट फॅन 40 वॅट ची वीज वापरणारे असतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
श
श्रीगुरुजी Mon, 04/03/2017 - 10:51 नवीन
उद्याच्या श्रीरामनवमीनिमित्त ३० रूपये देऊन ३ हार घेतले. ५० रूपयाला १ डझन गुलाबाची फुले घेतली. त्याचबरोबर १० रूपयांची ३ केळी, ८० रूपयांची अर्धा किलो डाळिंबे, ८० रूपयांची अर्धा किलो सफरचंदे व ८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड घेतले.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/03/2017 - 11:06 नवीन
८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड घेतले.
त्याला टरबुजे म्हणतात ना गुरूजी? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/03/2017 - 11:25 नवीन
मला वाटंत सर्व प्रकारच्या कलिंगडांना (काळ्या पाठीचे किंवा पट्टेवाले) हिंदीत टरबूज म्हणतात. हिंदीत कलिंगड असा शब्दच नाही. (चूभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
अ
अनुप ढेरे Mon, 04/03/2017 - 11:20 नवीन
एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं खातोय ती सगळी अगदी गोड असतात. कधी फार जास्तं गोड. कंलिगडांमध्येही झोल करतात काय आजकाल? प्रत्येक कलिंगड एकदम लालबुंद आणि गोग्गोड हे कसं शक्यय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुंबा Mon, 04/03/2017 - 11:27 नवीन
साखर घातलेले लाल पाणी इंजेक्ट करतात असं ऐकलं आहे.. खखोदेजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
च
चतुरंग Mon, 04/03/2017 - 15:21 नवीन
कलिंगडातच काय त्या वर्गीय सर्व फळात कृत्रिम रंग आणि स्वीटनर इंजेक्ट करुन ती लालबुंद्/गोड बनवली जातात. अगदी खात्रीच्या विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत ही फळे. सगळ्या नैसर्गिक गोष्टींची वाट कशी लावावी हे माणसाकडूनच शिकावे! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आनंदी गोपाळ Tue, 04/04/2017 - 18:41 नवीन
अगदी चांगलं दिसलं की भेसळ आहे अशी शंका येणे सहाजिक आहे. If its too good to be true, it probably is. कसंय ना, गावातले "भोई" लोक पारंपारिक "डांगरवाड्या" नदीच्या पात्रातल्या वाळूत पेरत असत. उन्हाळा सुरू होतानाच्या यात्रेत ही डांगरं/टरबूजं/खरबुजं/फुटकाकड्या विकायला येत.यापैकी काहीच तितकं गोड नसे, पण तहान भागवणारं फळ असे, थोड मधुरही लागे. आजकालच्या बिटी जमान्यात, (बायोटेक्नॉलॉजी=बीटी) उदा. शुगरबेबी नामक टरबूज, (आपल्या सर्वज्ञ गुरुजींच्या भाषेत तरबूजा/खरबूजा) मस्त गोड लागते, व ते नदीकाठच्या वाळूत पेरावे लागत नाही, नॉर्मल शेतात पेरतात, लवकर उगवतेही. मार्केटात ट्रका भरून येतात ती टरबूजं रस्त्यात पिकतील म्हणून फार कच्ची तोडलेली असतात. अन भारताच्या एका टोकापासून दुसरीकडे जातात. सबब लाल दिसलीत तरी बेचव लागतात. इंजेक्शन मिथ बद्दल : एक ड्रंकन वॉटरमेलन नामक प्रकार असतो. व्होडका टरबूजात इन्फ्यूज करणे. सिरिंज व्होडका अन टरबूज फुकट देतो, त्या टरबूजाच्या प्रत्येक फोडीत व्होडका पोचवणे महा कर्म कठीण. तस्मात सॅक्रीनचे इंजेक्शन हजार टरबूजांना देऊन मग ते ३०-५०-६० रुपये किलोने विकणार्‍याला सलाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sun, 04/09/2017 - 18:01 नवीन
धन्यवाद शंका निरसनाबद्दल! म्हणजे भरपूर खायला काय हरकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ग
गवि Mon, 04/03/2017 - 11:53 नवीन
काही महिन्यांपूर्वी थेट कलोनमधल्या दुकानातून यु डी कलोन (४७११ वरिजनल) आणलं होतं. बेहद्द आवडलं. खिशात छोटी ३ मिलीची काचकुपी बाळगून कधीही वास घ्यावा. मूडमधे अत्यंत सुधारणा होते. आता स्टॉक संपत आला. पण अमेझॉनवर दिसलं हेच वरिजिनल ४७११ नंबरचं.. आणि तेही मी जर्मनीत घेतलं त्याहून कमी किंमतीत. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 04/04/2017 - 11:12 नवीन
व्वा , काय योगयोग. मीही हाच काही दिवसापुर्वी घेतला. पंप फॉल्टी निघाला. वास बाकी मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संजय क्षीरसागर Mon, 04/03/2017 - 12:08 नवीन
या धाग्याचं आरोग्य फिटनेसच्या धाग्यापेक्षा जास्त आहे !
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/03/2017 - 12:39 नवीन
साधारण दीडेक वर्षापूर्वी घेतलेला Puma चा स्विमिंग गॉगल मागल्या आठवड्यात तुटला, त्यामुळे Speedo चा स्विमिंग गॉगल घेण्यात आला. झालंच तर एक Jockey चा पुलोव्हर्/झिपर पण घेतला.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 04/03/2017 - 12:39 नवीन
पुढील दोन गोष्टी खरेदी करण्याअगोदर तुमचा मोलाचा सल्ला हवा आहे... १) पोर्टेबल एअर कंडीशनर - बाजारात Llyod, Croma यांचे पोर्टेबल एअर कंडीशनर मिळतात. मुंबईमध्ये रहात असल्याने कुलरचा उपयोग होत नाही. तुमच्या पैकी कोणी पोर्टेबल एअर कंडीशनर वापरते का ? परफॉर्मन्स कसा आहे? नॉर्मल AC (window or split) लावण्यासाठी खूप खर्च आणि तसेच खूपच infrastructural changes असल्याने portable AC चा विचार करत आहे. २) car seat massager कोणी वापरते का? १६००-२५०० च्या रेंजमध्ये ऑनलाईन मिळत आहे. अनुभव कसा आहे?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/03/2017 - 15:04 नवीन
मला एक ब्लु टुथ स्पिकर हवा आहे. त्यातला ब्लुटुथचाच भाग वापरायचा आहे, स्पिकर दहा वाटचा घरातला जोडणार आहे.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 04/03/2017 - 17:25 नवीन
कंजूस काका असे काही तरी वापरा. हे जुन्या कार मध्ये ब्लूटूथने स्पीकरला जोडायला वापरतात. https://www.amazon.com/iClever-Bluetooth-Hands-Free-Multi-Point-Activation/dp/B00GJFGE0K/ref=zg_bs_1293687011_5?_encoding=UTF8&psc=1&refRID=XXVHCWWGT0806032PHWG
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सानिकास्वप्निल Mon, 04/03/2017 - 16:45 नवीन
आमच्या जुळ्यांनी धुमाकूळ घालायला सुरूवात केल्यामुळे नविन बुकशेल्फ कम लाॅक कॅबिनेट घेतले. अॅपलचे नवे झाड नुकतेच बागेत लावले. बागेत नव्या फेन्स लावल्या काँक्ररीटचे पोस्ट घालून. स्विंगची आॅर्डर दिलिये. मराठी पुस्तकांची खरेदी केली.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 04/03/2017 - 19:07 नवीन
कुत्र्याचं / मांजराचं / पाळीव प्राण्यांचं अन्न आणि एकूण सप्लीमेंट्स अमेझॉनवरुन फार स्वस्त मिळतात असा अनुभव आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 04/04/2017 - 08:19 नवीन
पाळीव प्राण्यांसाठी गिरवीतलं बदक म्हणजे साष्टांग नमनच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
यसवायजी Mon, 04/03/2017 - 19:34 नवीन
या महिन्यातली खरेदी- पॉवरबॅन्क, पोन्चो, ट्रेकींग सॅक, ट्रेकींग शूज, वॉटरप्रूफ ग्लोव्हज, वेस्ट पाऊच, ट्रॅक पॅन्ट, थर्मलवेअर, आणी बरच काही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/04/2017 - 11:20 नवीन
डोक्यावर/हेल्मेटवर लावायचा दिवा हेडलॅम्प ( चार्जिंगवाला) रस्त्यावर चायनिज एक घेतला आहे २५०/- रुपयाला. १००मिटरस फोकस मारतो,एक तास चार्जवर चार तास जेमतेम वापरता येतो. जरा भारी भरोसेमंद लँपचे रेटिंग काय असते ,कितीला मिळतो ते सांगा।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
व
वरुण मोहिते Tue, 04/04/2017 - 08:49 नवीन
मधून रोझ वाईन घेतली बायको बोल्ली असं काहीतरी सात्विक पीत जा रविवारी . बाजूलाच चर्चगेट च्या आर्मी कॅन्टीन मधून अमृत नावाची व्हिस्की घेतली १ लिटर ची रविवार ला . किंवा पाहुणे आले कि . बायकोला अमृत आणि रोझ हि नावं आवडल्याने ती पण खुश मी पण खुश . किंमत ६५०० दोन्हीची मिळून .
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 04/04/2017 - 10:40 नवीन
वमो, ही अम्रुत बाहेर पण मिळते का , का फक्त कँटिनलाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
प
प्रसन्न३००१ Tue, 04/04/2017 - 10:42 नवीन
कोणत्या ब्रँड ची घेतलीत रोझ वाईन .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
सावत्या Tue, 04/04/2017 - 11:17 नवीन
वमो, अमृत.. जबर्या सिंगल माल्ट!!! अमृत कितीला पडलं हो!! सालं मुंबई एअरपोर्ट आणि यूएई च्या कोणत्याही एअरपोर्टवर मिळत नाही. पुढच्या मुंबई वारीत चर्चगेटला फेरी मारायला हवी....
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 04/04/2017 - 11:48 नवीन
अमृत ३-४ च्या आसपास किती वर्ष जुनी आहे त्यावर . पण चांगल्या मोठ्या शॉपलाच मिळतेय सध्या .
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/04/2017 - 12:06 नवीन
अमेरिकेत सॅन होजेसारख्या देशाळलेल्या भागांतल्या कॉस्को, बेव्हमोतही मिळते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
द
देशपांडेमामा Fri, 07/28/2017 - 13:20 नवीन
अमृत इकडे ४०००/- ला आहे देश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
५
५० फक्त Tue, 04/04/2017 - 12:58 नवीन
क्युटिक्युरा टाल्कम पावडर कुठे मिळेल कुणी सांगेल का ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा