Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

स — सत्यजित..., Wed, 04/05/2017 - 19:50
ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते! ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते! तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते! तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते! केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते! नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
3066 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/06/2017 - 06:51 नवीन
व्वाह! सुंदर..
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 04/06/2017 - 08:43 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 04/06/2017 - 10:53 नवीन
फक्त शेवटच्या ओळीतील "पोकळी आभाळते" हे थोडेसे खटकले. बाकी शेर उत्तम.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/06/2017 - 11:43 नवीन
>>>फक्त शेवटच्या ओळीतील "पोकळी आभाळते" हे थोडेसे खटकले.>>> उलट तोच खरा गझलेचा शेर,आणि त्यातही ते दोन शब्द सार आहेत गझलेचे! असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 04/06/2017 - 15:14 नवीन
पण "आभाळते" म्हणजे नक्की काय? मराठीमधे हा शब्द पहिल्यांदाच पाहिला! हा शब्द तुम्ही स्वतः योजला आहे का? आणि त्याचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
स
सत्यजित... गुरुवार, 04/06/2017 - 23:07 नवीन
सदर शब्द माझ्या वाचनात अनेकवेळा आलेला आहे! बहुतेक भट साहेबांच्या गझलेतही मी हा शब्द वाचलेला आहे!व्यापणे,व्यापून उरणे या अर्थी,तर कधी शब्दशः आभाळच होवून जाणे,अश्या अर्थाने वापरलेला दिसतो! आभाळली/आभाळल्या/आभाळता/आभाळताना ई. शब्द गुगळले तरी सहज हा शब्द वापरल्याची उदाहरणे मिळतील! मला कुणाचातरी एक सुंदर मतला आठवतो वाचलेला... 'का झेप पाखराची सांडी मुजोर वारा आभाळल्या जिवाचा पंखात कोंडमारा!' मी या आधीही हा शब्द वापरलेला आहे,येणेप्रमाणे... 'आहेत जीवघेणे काही सुरे परंतू त्यांच्या उरात माझ्या गंधाळल्यात जखमा! होईल चांदणे का माझे भल्या दुपारी? वाटे जरा भरोसा,आभाळल्यात जखमा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
स
सत्यजित... गुरुवार, 04/06/2017 - 11:44 नवीन
धन्यवाद अत्रुप्त आत्मा,खेडूत
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/06/2017 - 11:48 नवीन
सुंदर कच्चा माल ! एकदम तांबीय बिडंबन पाडता येईल अशी बघ उद्या होईल नक्की रिक्त हा कोठा तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी, कच्ची ताडी हासते ! =))))
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/06/2017 - 12:55 नवीन
माफ करा,पण हे 'तांबीय बिडंबन' म्हणजे? विडंबन म्हणत असाल तर स्वागत! त्यातही गझलेचे विडंबन गझलेत,किंवा फार तर हझलेतच झाले तर अजून मजा येईल वाचायला! बाकी विडंबन ही अद्भूतच कला आहे!कुणाच्या पेल्यात काय?कुणाच्या पेल्यात काय!!अनुभव ज्यचा-त्याचा! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संदीप-लेले गुरुवार, 04/06/2017 - 20:35 नवीन
व्वा, लिखते रहो !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/06/2017 - 23:11 नवीन
>>>लिखते रहो !>>>जरुर! और अाप भी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा