Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आय पी एल - दशकपूर्ती

क
किसन शिंदे
Wed, 04/05/2017 - 22:17
🗣 19 प्रतिसाद
नमस्कार, सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =)) अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल. तो इतिहास सर्वश्रृत आहेच त्यामुळे त्याचा वेगळा असा उल्लेख करत नाहीच, तरी त्या सर्व घडामोडींचा या स्पर्धेवर अगदी तसूभरही परिणाम झाला नाही हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. अगदी न चुकता असं म्हणता येणार नाही पण, अजूनही क्रिकेट हा खेळ मनापासून आवडणारा प्रेक्षक, ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर एखादा तरी सामना पाहतोच. सुरूवातीला थोडीशी निरस वाटणारी ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिकच रंगत जाते आणि प्रेक्षकही बहुदा सुरूवातीच्या काही सामन्यानंतरच या स्पर्धेमध्ये रुची दाखवतात असं दिसून येतं. यावेळेला थोडी गडबड झाली खरी. ;) क्रिकेटवर अगदी विस्तृत धागे काढणारे आमचे प्रिय गुरूजी सध्या दुस-या एका धाग्यावर 'व्यस्त' असल्या कारणाने आज या ठिकाणी ही जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही स्वतःच घेतलेला आहे. =)) याबद्दल गुरूजी 'उस्मानाबाद' चर्चेतून वेळात वेळ काढून आमचा हा गुन्हा माफ करतील आणि आज या ठिकाणी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करतो. विषयांचे वैविध्य जपणा-या मिपा बोर्डाला, ईपीएलशी(तीच ती, फूटबाॅलची इंग्लिश प्रिमियर लिग हो!=)) ) नावसाधर्म्य असणा-या आयपीएल नामक स्पर्धेचे वावडे नसावे अशी आशा व्यक्त करतो आणि हा धागा आयपीएलमधल्या घडामोडींवर, त्यातल्या क्रिकेटच्या सामन्यांवर चर्चा करण्यासाठी मायबाप मिपाकरांकडे सुपूर्द करतो. #पहिला सामना# सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राॅयल चॅलेन्जर्स बँगलोर या मोसमातल्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने कोहली, डिव्हिलियर, के.एल. राहुलविना खेळणा-या राॅयल चॅलेन्जर्स बेंगलोर संघावर ३५ धावांनी विजय मिळवला. २०८ धावांचा पाठलाग करताना राॅचॅ बेंगलोर संघाचा तुक्का म्हणवाल्या जाणा-या श्रीयुत गेल नामक राक्षसासही आपला करिश्मा दाखवता आला नाही. 'डेथ ओव्हर'मधला आमचा आवडता बाॅलर नेहरा ;), भु.कुमार आणि राशिद खाने नामे अफगाणिस्तानचा कुणी एक बाॅलर यांनी प्रत्येकी दोन बळी टिपून सनरायझर्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी आमच्या आवडत्या युवीने २७ चेंडूत ६२ धावांची धडाकेबाज खेळी करत सनरायझर्सना २०७ धावांचा टप्पा गाठून दिला.
वर्गीकरण
क्रिकेट
समाज
क्रिकेट क्रीडा ट-२० मर्यादित स्पर्धा

प्रतिक्रिया द्या
4802 वाचन

💬 प्रतिसाद (19)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 04/06/2017 - 03:09 नवीन
अरेच्चा.....आता सुर्यवंशम कुठे बघायचा किसनजी शिंदेजी? =))
  • Log in or register to post comments
च
चिनार गुरुवार, 04/06/2017 - 06:07 नवीन
हो ना...आयपीएल ला नाकं मुरडण्याचं हे आणखी एक कारण.. बाकी कारणं खाली नमूद केली आहेत http://www.misalpav.com/node/30941
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ल
लोनली प्लॅनेट गुरुवार, 04/06/2017 - 06:21 नवीन
स्थानिक खेळाडूंना खेळण्याची आणि उत्पन्न मिळवण्याची संधी- आयपीएल चा हा एकमेव फायदा आहे. एक सच्चा क्रिकेट प्रेमी म्हणून मला या तमाशाची अत्यंत चीड येते हि स्पर्धा म्हणजे क्रिकेट चा अपमान आहे असे मी मानतो. "तू बॉल टाक मी हाणतो सिक्स" असे याचे स्वरूप आहे. पुन्हा त्यात ते बॉलिवूड चे नौटंकी वाले, मी फक्त पहिला सीझन पहिला होता त्यानंतर पुन्हा डुंकुनही पहिले नाही. कुठे कसोटी क्रिकेट आणि कुठे हा धिंगाणा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/06/2017 - 08:55 नवीन
हे सच्चे क्रिकेट काय असते भाऊ? कसे दिसते आणि कसे खेळले जाते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट
च
चिनार गुरुवार, 04/06/2017 - 12:19 नवीन
सच्चे क्रिकेट जाऊद्या तुम्हाला फक्त 'सच्चे' कुठेजरी आढळलं तर कळवा विशुमित भाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पैसा गुरुवार, 04/06/2017 - 06:56 नवीन
झाली का जत्रा सुरू!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/06/2017 - 07:03 नवीन
आधीच दिवे कामाच्या नावाने, आता हे भोकशेपना सुरु. कमावनारे कमावतेत, बाकी बघत बसतेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 04/06/2017 - 10:21 नवीन
एसपीएल ( सोलापूर प्रीमियम लीग) नसते का भौ तुमचेकडे ? ( प्लास्टीक बॉल टूर्नामेंट ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 04/06/2017 - 11:02 नवीन
अर्र लै, एमार लोकाची पण झालि परवा. पत्रकार, इंजिनिअर, डोक्टर कोण पण लीग भरवायलेत. मला बरय, जेव्ढ्या टिमा जास्त तेवढी टिशर्ट आणि युनिफॉर्म ऑर्डर मलाच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
५
५० फक्त गुरुवार, 04/06/2017 - 12:21 नवीन
आम्च्या सोलापुरात चिंधी बॉल स्पर्धा असतेत बे, खाली सिमेटाचं मौसुत गिलावा केलेलं पिच असतंय आणि चिंधी बॉल, स्पेशल टुन्रामेंट जिपिएस समोरचं ग्राउंड पार ५ लाखापर्यंतचे ट्रॉप्या असतेत आणि तुम्ही काय ते प्लॅस्टिक बॉल घेउन बसलाय, चिंधी बॉल थोडा वल्ला करुन हानला ना बक्कदिशी पाठीत दोन चार मणके हालतेत बे सस्ते मे मस्ती, हल्ली बहुधा ३०रु ला ड्झन असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/06/2017 - 11:46 नवीन
काय किसनराव , जिलब्या टाकत बसलाय ? जरा कामं करा,, उन्हाळा आहे तोवर कुरवड्या टाकुन घ्या =))))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/06/2017 - 11:48 नवीन
कसोटी सामने हेच खरे क्रिकेट. कसोटी सामन्यांचा थरार इतर प्रकारात नाही. अर्थात मला ५० षटकांचे एकदिवसीय सामनेही आवडतात. परंतु ट-२० हा प्रकार फारसा आवडत नाही. आयपीएल मधील माझा रस हा फॅन्टसी लीग खेळण्यापुरताच मर्यादीत आहे. क्रिकइन्फोची फँटसी लीग आणि आयपीएलची फँटसी लीग या दोन्ही लीगमध्ये माझा सहभाग आहे. आयपीएलचे सामने अधूनमधून थोडा वेळ बघतो. परंतु त्यात फार रस नाही. हा प्रकार बंद झाला तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 04/06/2017 - 11:52 नवीन
हा प्रकार बंद झाला तर बर्‍याच लोकांचा वर्षातला एकमेव कमाईचा स्त्रोत काढून टाकल्यासारखा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चिनार गुरुवार, 04/06/2017 - 12:01 नवीन
चार लोकं पैसे कमावतात हे मान्य..पण चाळीस लोकं सट्टा लावून श्रीमंत होतात किंवा कंगालही होतात. आयपीएल हे सट्टेबाजांसाठी केलेली एक व्यवस्था आहे ज्यात देशातले बडे बडे धेंड सामील आहेत. अर्थात ज्या देशात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरही सट्टा लागतो तिथे हे काय चुकीचं वाटणार नाही. ज्याला जे पटते त्याने ते करावं..काय चुकीचं काय बरोबर हे ठरवण्याची आमची योग्यता नाही असे म्हणून जागेवर बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
५
५० फक्त गुरुवार, 04/06/2017 - 12:22 नवीन
या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी न होता पैसे मिळ्वायचं काही मार्ग माहित असल्यास मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/06/2017 - 15:10 नवीन
किसन शिंदे, तुम्ही आयप्येलला चक्कं क्रिकेट म्हणता? कुफेहेपा? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Tue, 04/11/2017 - 17:06 नवीन
तुम्ही आयप्येलला चक्कं क्रिकेट म्हणता? कुफेहेपा?
+ १२३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बोका-ए-आझम Sat, 04/08/2017 - 19:10 नवीन
जेवढे जास्त लोक त्याला नाकं मुरडतील तितकं ते जास्त फोफावत जाणारं आहे. कसोटी क्रिकेट हे अभिजात ख्याल, वन डे क्रिकेट हे सुगम संगीत तर टी ट्वेंटी हा झणझणीत तमाशा आहे आणि रसिकांना तिन्ही आवडू शकतात. विनोद सोडा पण आयपीएल यशस्वी झाल्यामुळे इतर खेळांच्या (ज्यात कबड्डीसारख्या अस्सल भारतीय खेळाचाही समावेश आहे) लीग स्पर्धा भरु लागल्या आणि लाखो लोकांपर्यंत पोचल्या. त्यातली सट्टेबाजी आणि स्पाॅट फिक्सिंग इत्यादी गैरप्रकारांवर मात्र कडक नियंत्रण असलं पाहिजे. एकेकाळी वनडे क्रिकेटबद्दलही लोकांच्या अशा टोकाच्या भावना होत्या पण हळूहळू त्याची लोकांना सवय झाली. टी२० ची पहिलीच विश्वचषक स्पर्धा आपण आणि तीही पाकिस्तानला हरवून जिंकल्यामुळे आपल्याकडे हे चालणार हे तर उघड आहे. शिवाय एप्रिल - मेचा सुट्ट्यांचा माहोल असल्यामुळे त्याचा आवाज जास्त आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/10/2017 - 11:26 नवीन
अभिजात ख्याल, सुगम संगीत आणि तमाशा अशी उतरंड का बरं केली असावी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा