Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

स — सत्यजित..., Sun, 04/09/2017 - 12:31
साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
2992 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 04/09/2017 - 13:33 नवीन
पडली का घशाला कोरड आहे? चखण्याचा तेवढा आधार आहे प्यायली होती विदेशी काल येथे आज देशीही का महाग आहे? एकही बार कसा सापडेना हा कोणता जणू महामार्ग आहे? फूंकतो आहे कधीचा धूर मीही खिशात माझीया गायछाप आहे! सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/09/2017 - 13:42 नवीन
अगागागागागागागा पैजारबुवा रॉक्स अगेन अँड अगेन. . तुस्सी ग्रेट हो म्हाराजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/09/2017 - 14:04 नवीन
@सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)››› Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सत्यजित... Sun, 04/09/2017 - 15:09 नवीन
चांगभलं...! पुढच्या वेळी काफिया इ. सांभाळला तर मजा येईल विडंबनाची! तसा 'या' विषयात जरा तोल गेला ते ठिकै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जव्हेरगंज Sun, 04/09/2017 - 15:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
शार्दुल_हातोळकर Sun, 04/09/2017 - 16:50 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
शार्दुल_हातोळकर Sun, 04/09/2017 - 16:51 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्राची अश्विनी Sun, 04/09/2017 - 14:02 नवीन
गझल आवडली.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sun, 04/09/2017 - 15:12 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा