दाही दिशांस जेंव्हा...
दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता
भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता!
पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते
माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता!
ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली?
हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता!
अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू
मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता!
लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन्
एका क्षणात अवघा दर्याच आटला होता!
मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे
माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता!
मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता
पत्रामधून माझा पत्ताच काटला होता!
—सत्यजित
💬 प्रतिसाद
(4)
म
माहितगार
गुरुवार, 04/13/2017 - 08:26
नवीन
सुरेख
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 04/13/2017 - 08:33
नवीन
छान!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/13/2017 - 12:42
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
गुरुवार, 04/13/2017 - 21:27
नवीन
सर्वांचे धन्यवाद!
- Log in or register to post comments