Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नको तेवढे सत्य..... सत्यानाश !

अ — अरुण मनोहर, Mon, 04/10/2017 - 06:21
लहानपणी शिकविले होते, बोलावे नेहमी खरे मनात एक ओठात दुसरे, हे वागणे नाही बरे ..... आता वाटते, असे सांगणे होते कां खरेच चांगले? मनातले खरे ऐकून झालेय कधी कोणाचे भले? ..... कालच असे झाले, नवीन साडी होती नेसली पदर आखूड वाटला, सैलसर वेढे होते खाली ..... कंटाळा आला ठीक करायचा, म्हटले ह्याना विचारू अहो, चांगली दिसतेय, की पुन्हा नेसून सुधारू? .... हे तरी अस्से नां, एरवी पुस्तकात डोके खुपसून आज मात्र नेमके ह्यांनी पाहिले नीट लक्ष देऊन .... “शी शी अग काय हे कशी नेसलीय भोंगळ म्हणतील तुला मैत्रिणी किती ही अजागळ .... तुझी ती सरिता बघ, कशी साडी नेसते चोपून बघणारे सुद्धा बघतात सारखे सारखे मागे वळून .... भोंगळ साडी नेसलेय इतपत सांगणे ठीक होते, कारण मनात कोठेतरी, मलाही ते माहीत होते .... पूर्ण सत्य बोलायची ह्यांना होती काही गरज? सरिताचे कौतुक करून ओढवला नां गहजब? .... “अग जरा नीट नेस” असे नुसते म्हणायचे कशाला कुणाविषयीचे मनातले खरे सांगायचे? .... मी मग धुसपूस करून, ओरडले खूप ह्यांच्यावर स्वयंपाक तुम्हीच करा, मी जातेय सरिता बरोबर .... आता सांगा, ह्यांचे सत्य सांगणे होते कां चांगले? मनातले खरे सांगून झालेय कधी कोणाचे भले? -अरुण मनोहर

प्रतिक्रिया द्या
1282 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पैसा Mon, 04/10/2017 - 14:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 04/13/2017 - 08:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा