Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/11/2017 - 12:16
🗣 13 प्रतिसाद
डिअर ऑल, मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Embarrassment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझी ग्राफिक डिझायनर मुलगी करेल. ट्रोलिंग, कंपूबाजी करणार्‍यांना घाबरणार्‍यांचे गैरसमज दूर करुन मिपावरील त्यांचा वावर सर्वांग सुंदर करणारे प्रशिक्षण त्यांच्याप्रत पोहोचावे असा उद्देश आहे. यात मिपा धुरीणांनी आतापर्यंत केलेले लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली जबरदस्त उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये प्रतिदिन) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता एखाद्या प्रतिसादाला कसे जोरदार प्रत्त्युत्तर देता येईल ते विचारता येईल (त्यासाठी प्रत्येक वाक्याला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल. साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल. जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन : १) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक) २) जवळजवळ सर्व डेटा सेन्श्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ? ३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ? ४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
वर्गीकरण
विडंबन
विनोद
गंमत

प्रतिक्रिया द्या
5452 वाचन

💬 प्रतिसाद (13)
च
चित्रगुप्त Tue, 04/11/2017 - 12:40 नवीन
तुमच्या या अभिनव सायटीसाठी हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/11/2017 - 12:54 नवीन
सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता एखाद्या प्रतिसादाला कसे जोरदार प्रत्त्युत्तर देता येईल ते विचारता येईल त्यासाठी प्रत्येक वाक्याला शंभर रुपये शुल्क असेल,
आईशप्पथ गुर्जी, ही स्कीम इथं मिपावर राबवली ना तर फक्त तुमच्याकडून आलेल्या शुल्कावर आपण फेसबुक खरेदी करु. ;)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 04/11/2017 - 12:57 नवीन
मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर......इथे मोफत सेवा उपलब्ध आहे !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/11/2017 - 13:10 नवीन
तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, तर तुमच्या प्रश्नांना इतरांनी फुकट उत्तरं का द्यावीत? :P
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/11/2017 - 16:35 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संजय पाटिल Sun, 04/30/2017 - 10:17 नवीन
मी पण ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सतिश गावडे Tue, 04/11/2017 - 18:21 नवीन
>> वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगी करेल. तुमचा ग्राफिक डिझायनर मुलगी कशी काय करेल?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/11/2017 - 18:34 नवीन
त्यांचा डिज़ायनर मुलगीच करणार ना? ती मुलगी अस्ती तर मुलगा केला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/29/2017 - 20:01 नवीन
बडे बडे लोगोंकी ऐसी छोटी छोटी गलतिया होती है.... (किंवा व्हाईस व्हर्सा) ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वरुण मोहिते Tue, 04/11/2017 - 18:36 नवीन
टू एम्बरॅसमेंट....lolllllllll
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या गुरुवार, 04/13/2017 - 06:13 नवीन
साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये प्रतिदिन)
अरे बापरे
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 04/28/2017 - 03:09 नवीन
Step-By-Step to Embarrassment ROFL
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 05/30/2020 - 11:26 नवीन
तुमची तर वेबसाईट तयार झाली का..? का मतपर्तिवर्तनाची लागण तुम्हालाही झाली... :D
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा