विवाह मंडळ
नमस्कार,
आंतरजातीय व आंतरधर्मिय एखादे चांगले विवाह मंडळ असल्यास जाणकारांनी सुचविणे. पत्रिका व विधी यांवर विश्वास नाही. थोडक्यात कोर्ट मॅरेज करण्यास तयार. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत…
💬 प्रतिसाद
(16)
स
संजय क्षीरसागर
Wed, 04/12/2017 - 17:18
नवीन
तुमचा हेतू शुद्ध आहे.
नजर शोधक असली आणि थोडं धाडस असलं की मॅरेज ब्यूरोची गरज नाही.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 04/12/2017 - 17:37
नवीन
धाडस?
सावधान ! असा सल्ला दिला तर चालेल का हो धागा लेखक? :P
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 04/12/2017 - 18:03
नवीन
सावधान ऐकून पळू नका. संकट हारतुरे घेऊन पलीकडे उभे असते. ते टाळल्यास शेजारी.
कुठेतरी गाठेलच. तर आता तुम्ही सुंदर संकटाच्या शोधात आहात.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 04/13/2017 - 09:43
नवीन
ते ठीक आहे हो. पण तरणी पोरे गळ टाकून जरासुद्धा वाट पाहात नाहीत हल्ली.
सकाळी मुलीशी ओळख झाली की संध्याकाळी यांना लगेच लॉजवर जायचे असते.
मग पोपट होतो आणि इथे धागे काढत बसतात.
- Log in or register to post comments
स
सचिन७३८
गुरुवार, 04/13/2017 - 15:19
नवीन
तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय ते कळू शकेल का?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 04/14/2017 - 07:06
नवीन
गमतीने लिहिले आहे हो.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 04/12/2017 - 17:21
नवीन
sunday times of india पाहा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 04/12/2017 - 18:47
नवीन
फेसबुक का कैतरी आहे म्हणे, बघा ब्वा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/13/2017 - 11:26
नवीन
फेसबुक जुनं झालं राजे !
सध्या इन्स्टाग्राम आणि स्नॅपडील ची च्लती आहे !!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/13/2017 - 11:37
नवीन
इन्स्टा समजुस शकतो मार्क्या,
हाऊ स्नॅपडिल?
काय गिफ्टा वगैरे देऊन चॅट करावे लागते काय? का अॅज अ प्रॉडक्ट म्हणून? दुन्या लैच पुढं चालली राव. :(
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 04/14/2017 - 06:47
नवीन
लग्नाचा बाजार स्नॅपडीलवरपण भरतो का?
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 04/12/2017 - 19:24
नवीन
पुण्यात 'साथ-साथ' म्हणून एक छान आणि प्रागतिक विचारमंच आहे. तिथे जाऊ शकता.
www.saathsaath.com
- Log in or register to post comments
अ
अत्रे
गुरुवार, 04/13/2017 - 03:04
नवीन
आजकाल बरेच विवाह मंडळ आंतरजातीय झाले आहेत. फक्त त्यात अपेक्षा वाचून ठरवायचे कॉन्टॅक्ट करायचा कि नाही. प्रोफाइलमधे लिहिले असते जातीची अट आहे की नाही वगैरे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
गुरुवार, 04/13/2017 - 07:29
नवीन
वायूमंडल धाग्याखाली विवाहमंडळ धागा पाहून आधी विडंबन वगैरे आहे कि काय वाटले! :)
मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या आजूबाजूला असणारे काही महत्वाचे थर पार करणे महत्वाचे!
भ्राताम्बर: जसे स्थितांबर अतिनील किरणे शोषून घेऊन त्यांना गायब करते तसाच हा थर मुलीच्या आजूबाजूला असणाऱ्या अति-nill मुलांना बाहेर फेकतो. हे करताना त्याचे तापमान वाढून वातावरण गरम देखील होत राहते.
बाकी मग पितांबर :P
मातांबर असे वेगळे थर आहेतच... पण लैच्च विषयांतर होतंय...
तुम्हाला शुभेच्छा!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/13/2017 - 08:14
नवीन
अनुरुप का कायसं आहे म्हणे, गुगलून बघा.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/13/2017 - 10:41
नवीन
त्यांचा मेळावा होता ९ तारखेला पुण्यात.
- Log in or register to post comments