Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज तु आठवलीस...

P — Pradip kale, गुरुवार, 04/13/2017 - 16:18
आज तु आठवलीस आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले खंत यासाठी की, मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी भीती नव्हती बोलण्याची, हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही अन् आनंदाचे यासाठी की, आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस, ताल बिघडले मनाचे, हो तालचं बिघडले मनाचे कारण तु सुरचं घेऊन गेलीस आता आजही शोधत असतो फक्त तुला, कधी मोगर्याच्या गंधात कधी फुलांच्या पाकळ्यात कधी सागराच्या लाटेत कधी चंद्राच्या चांदण्यात तर कधी तार्यांच्या अंगणात अन तु भेटतेसही मला कधी एकांताच्या कोन्यात कधी विरहाच्या तळात कधी मौनाच्या शब्दात कधी सुरांच्या मैफलीत तर कधी या कवितेच्या पानात. आज फक्त तुला आठवतो कारण वेळ माझी केव्हाच गेली पण वाट पाहतो तुझी आजही कारण तुझी वेळ अजुन नाही गेली कधीतरी तुला कळेलही सुर माझा गवसेलही शब्द माझा एेकशीलही मागे वळुन पाहशील ही मी उभा असेन तिथेच जिथे तुला पाहीले अन् शब्द माझ्या कवितेतील जिथे पुर्वी हरवले मी असेन तिथेच वाट पाहत फक्त तुझी. -प्रदिप काळे.(मुक्त कलंदर) माझा ब्लाॅग : मुक्त कलंदर

प्रतिक्रिया द्या
692 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा