Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक कप तिचा....

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 04/15/2017 - 21:14
आयुष्याचा हिशोब साचा एक कप तिचा,एक माझा! दिसायला दोन्ही एकच फ्लेवरंही सारखाच फक्त चाखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा! माझा आधी संपेल, तिचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक कप तिचा,एक माझा! एकत्र असून थोडं वेगळेपण वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! तिचं सावधपण माझं अंधळेपण जगण्यातली वागण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक कप तिचा,एक माझा! गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक कप तिचा.... https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17880488_1319704728115810_172567209834256293_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=4e396b75284cabf020274632bd197fb3&oe=5953B649 ==०==०==०==०==०==०== अत्रुप्त...

प्रतिक्रिया द्या
10369 वाचन

💬 प्रतिसाद (18)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/16/2017 - 03:41 नवीन
वा वा....क्या बात है. रच्याकने एक तांब्या त्याचा असं इडंबन डोक्यात आहे. टाकु काय ;)!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/16/2017 - 04:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/16/2017 - 04:52 नवीन
रच्याकने ते वा वा आईसक्रिम च्या कपाला होतं. कविता लैचं गंडलेली आहे. विडंबन तर होणारचं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Sun, 04/16/2017 - 07:47 नवीन
तांब्या "तिचा"पण असू शकतो की #सेक्सिस्ट चिमण्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मितान Sun, 04/16/2017 - 04:54 नवीन
गुर्जी रमले तर :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/16/2017 - 04:54 नवीन
श्श्श्श्श्श्श्श्श!!! डिस्टर्ब करु नका. गुर्जी गणितं सोडवत आहेत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान Sun, 04/16/2017 - 04:59 नवीन
र्रर्रर्रर्रर्रर्र स्वारी बरं का ! चालू द्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रचेतस Sun, 04/16/2017 - 05:10 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 04/16/2017 - 06:39 नवीन
खूपच गोड लिहिलं आहे. आवडलं. ह्या चिमण्याचं काय ऐकताय!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 04/16/2017 - 07:04 नवीन
मिपाचे शीघ्रकवी...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/16/2017 - 07:18 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/16/2017 - 09:48 नवीन
इतक्या छोट्या छोट्या कपांतही कल्पना अन प्रेम शोधणारा कवि! उटकमंडलम, नैनितालला जाईल तेव्हा मोठे महाकाव्यच लिहिल हा!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 04/16/2017 - 10:49 नवीन
तुम्हाला "तिथे जाउन आल्यावर" असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Sun, 04/16/2017 - 13:17 नवीन
कविमन लागते हो त्याला. नाहीतर सातारा रोडवरचे चणे आणि महाबळेश्वरचे चणे यांत काय फरक असे म्हणाल टकाभाउजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संजय क्षीरसागर Sun, 04/16/2017 - 10:11 नवीन
नेहेमीच्यापेक्षा काही तरी वेगळा विषय `हाताळला' !
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 04/16/2017 - 10:22 नवीन
खत्री दिसत आहे आईस्क्रीम.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 04/16/2017 - 10:44 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/17/2017 - 18:15 नवीन
असो. =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा