Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तडा गेलाच आहे तर...

स — सत्यजित..., Mon, 04/17/2017 - 03:19
नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या! नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या! अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या! नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
4300 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ए
एस Mon, 04/17/2017 - 18:28 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 04/17/2017 - 21:02 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मोनाली Tue, 04/18/2017 - 09:37 नवीन
अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!>>>> खूप छान!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 04/18/2017 - 14:16 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 04/18/2017 - 14:31 नवीन
गझल किती नियमात आहे हे न पाहता आशय पाहून म्हणतो... खूप आवडली आहे, सध्या अभ्यास कमी असल्याने नियम इत्यादी चिरफाटे सोडून लिहतो आहे.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 04/18/2017 - 16:36 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अनुप ढेरे गुरुवार, 04/20/2017 - 07:29 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/20/2017 - 13:54 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 04/20/2017 - 16:28 नवीन
आवडली येवू द्या अजून
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/20/2017 - 21:20 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
पैसा गुरुवार, 04/20/2017 - 18:25 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 04/20/2017 - 21:21 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आषाढ_दर्द_गाणे गुरुवार, 04/20/2017 - 21:56 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 04/21/2017 - 00:44 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
व
वेल्लाभट Fri, 04/21/2017 - 07:40 नवीन
सॉलिड आवडलीय ! :) आशय अप्रतिम मांडलायत. वाह वाह! क्या बात है भाऊ क्या बात है!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 05/10/2017 - 05:47 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा