एक मुक्तक
सकाळी घाईघाईत बुटाच्या लेसा बांधताना,
खण्णकन आवाज करत तो चौकोनी बिल्ला पोराच्या खिशातून लादीवर सांडला तेव्हा...
गजराचं घड्याळ वाजल्या सारखा मी दचाकलो.
पुन्हा एकदा तो लखलखीत तुकडा खिशात ठेवत पोरगा समंजस हसला...
म्हणाला ,
तुमचाच आहे , काल तुमच्या जुन्या शर्टाच्या खिशात सापडला आईला ,
बोहारणीला कपडे देताना.
"फेकून दे "म्हणाली
"अवलक्षणी आकाशाचा तुकडा ",
तोच दाखवून तुम्ही म्हणे तिला भूलवणीला लावलंत वगैरे वगैरे...
आणि तुम्ही तरी कुठे बघता आजकाल उद्याचा दिवस या तुकड्यात ,
सारखे हातावर हात चोळता आणि तळहातावरच्या रेषा वाचता ,
असू दया आता ते माझ्याकडे,
I am old enough ....
वगैरे वगैरे ....
+१