Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संमिश्र व्हाटस्याप समूहात पुरुषांची कुचंबणा/फजिती

म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 04/18/2017 - 15:39
🗣 68 प्रतिसाद
मेरे प्यारे भाईयो,आज एक अतिमहत्वाचा विषय आपल्यासमोर मांडतोय......पुरुषांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती केव्हा निर्माण होते ? संमिश्र व्हाटस्याप समूहात आपल्या हातून मोठा प्रमाद घडतो आणि नको ते संदेश समूहात आपल्या नावे झळकू लागतात.... अजाणतेपणी अपराध जरी घडला तरी व्हायचं ते होतंच ! मेसेज रिकॉल पध्दत नसल्याने मार्कच्या आईबहिणीचा उध्दार होतो...मनाला एक अनामिक टोचणी लागते....अन्नपाणी गोड लागत नाही....हजारदा हताश मनाने तोच ग्रूप उघडून त्या मेसेजकडे भकासपणे पाहत राहणे इतकेच हातात उरते.....अडमिन समजूतदार असला तर बरं नाहीतर कारवाईला लगेच सुरुवात होते.....त्यासाठी पुन्हा ग्रूपमधल्या महिलांची परत परत माफी मागावी लागते...एकूणच धरणीमाता पोटात घेईल तर बरं असं वाटतं ! इथे ग्रूपमध्येही चर्वितचर्वण सुरु होतं ..... काही वेळा सगळेच ओळखीचे लोक असतात किंवा नसतात... कोणी हसून सोडून देतं तर कोणी नियमाचा कीस पाडत बसतं .....बहुतांशी पुरुषवर्ग दुर्लक्षच करतो (कारण अशी चूक त्यांनीही कधीतरी केलेली असतेच ! उलट मेसेज आवडल्यास खाजगी संदेश पाठवून अजून स्टॉक मागवला जातो....शेवटी एकाच माळेचे मणी !) ग्रूपमधल्या महिला विनोद/मेसेज तर वाचतात....ते वाचल्याची खूणही सापडते..त्यामुळे नक्की कोणी ते पाहिलंय ते कळतं.....गुन्हेगार पुरुषातला शेरलॉक होम्स अचानक जागा होतो....जमेल त्या पध्दतीने पुढील अप्रिय गोष्टी टाळणं क्रमप्राप्तच असतं.....महिला सोशिक आणि सहनशील असतील तर हे शक्य होतं अन्यथा ग्रूपमध्ये उलटसुलट जाहीर चर्चा होऊन गुन्हेगाराला अडमिनच्या हस्ते नारळ दिला जातो (अडमिनशी घसट अथवा वैयक्तिक ओळख असल्यास बरं असतं...कमीत कमी त्रासात सुटका होते !) ग्रूप ऑफिसचा असेल तर माणसाचं तोंड कायमचं काळं होतं....महिलावर्ग काम असल्याशिवाय जवळ फिरकत नाही...."वाटलं नव्हतं हा असला निघेल" असे भाव चेह-यावर असतात....लंचला माणूस एडस् च्या जाहिरातीतल्या माणसासारखा एकटाच बसतो....त्याला वाळत टाकलं जातं.... घरचा समूह असेल तर आगळीक केल्यावर ताबडतोब अज्ञातवासात निघून जावं लागतं...ग्रूपमधल्या नातेवाईक महिला जिथे जिथे भेटणार असतील ते सगळे इव्हेंटस् ठरवून चुकवावे लागतात....त्यातूनही माणूस अविवाहित असेल तर जरा तरी सहानुभूती मिळते...समूहातल्या महिला घरच्यांकडे "आता उरकून टाका लग्न पोराचं" असा धोशा लावतात.... माणूस विवाहित असेल तर असा घोटाळा केल्यावर पाचच मिनिटात त्याची पाचावर धारण बसते ! आपली अर्धांगिनी त्याच समूहात असेल तर अर्धांगवायूचा झटका येतो...डोळे पांढरे होतात....माणूस ऑफिसात असला तर काम सुचेनासं होतं...सीक लीव्ह टाकून निघून जावंसं वाटतं पण घरी जायची सोय नसतेच ! एकटंच समुद्राकाठी जाऊन बसावसं वाटतं...घरी काय काय सांगायचं याची इत्थंभूत तयारी करावी लागते....काय सांगितलं तर कमीत कमी शिक्षा होईल याचा अंदाज घेतला जातो..... अडमिनला विनंती करुन छोटा असलेला समूह जरी विसर्जित केला तरी त्याने झालेल्या अपराधाच्या खुणा मिटत नाहीत पण मनाची बोचणी कमी होते....आता काय हजेरी घेतली जाईल ते ज्याच्या त्याच्या बायकोच्या खुनशीपणावर अवलंबून असतं..... असो....तर असा सखोल आढावा घेतल्यानंतर आपण यावर करायच्या उपायांकडे वळू :- क्र.१-शक्यतो मेसेज डोकं,मन आणि डोळे ताळ्यावर असतानाच पाठवावेत... क्र.२- काही विशिष्ट मेसेज आणि चित्रं पाहून माणसाच्या शरीरात बरीच संप्रेरकं कार्यरत होतात...त्यांचा प्रभाव कमी झाल्यावर मगच मेसेच फॉरवर्ड करावेत. क्र.३- चुकीचा मेसेज चुकीच्या समूहात पोहचल्यास शक्यतो स्वत:च तिथून माफीनामा टाकून बाहेर पडावे.....आणि अडमिनचे प्राण आणि कष्ट वाचवावेत. क्र.४- आपण पाठवलेला मेसेज कोणालाही दिसण्याआधीच अजून एखादा रटाळ आणि लांबलचक मेसेज त्याच ग्रूपमध्ये टाकावा जेणेकरुन संभाषणाचा रोख बदलेल... क्र.५- फक्त मित्रांचा ग्रूप असेल तर तिथेच धांगडधिंगा घालावा पण मित्रांच्या बायकांबरोबर शक्यतो दुसरा ग्रूप बनवू नये (कितीही ओळख असली तरीही ) क्र.६- कोणत्याही दोन ग्रूपचे नाव सारखे असल्यास अडमिनला सांगून ते लगेच बदलून घ्यावं म्हणजे पुढचा अनर्थ टळेल. क्र.७- अनभिज्ञपणे झालेली चूक मान्य करुन ताठमानेने त्याच ग्रूपमध्ये रहावे (पण शिक्का बसतोच काही दिवस तरी....पर हर जख्म़ का मरहम वक्त़ ही होता है ) क्र.८- अशा प्रकारचे मेसेज असणारे स्वतंत्र ग्रूप जॉईन करुन साध्या ग्रूपमध्ये राहूच नये किंवा राहिल्यास काही बोलू नये. विशेष टिपण्णी - अशा प्रकारचे मेसेज एखाद्या ग्रूपमध्ये गेल्यास आणि त्या ग्रूपमधल्या एखाद्या महिलेने त्यावर आक्षेप घेतल्यास भारतीय दंड संहिता आणि सायबर कायदा यांच्या संयुक्त विद्यमाने पाठवणारा मनुष्य आणि अडमिन यांच्यावर कारवाई होऊ शकते तेव्हा सावधान ! तुमची चूक आणि भूक सांभाळा.....दिवस बायकांचे आहेत !

प्रतिक्रिया द्या
16116 वाचन

💬 प्रतिसाद (68)
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/20/2017 - 15:51 नवीन
सध्या फेमिनाझींचा सुकाळ आहे. त्या समस्त पुरुषजातीलाच ज्यू समजत असल्यामुळे असले प्रसंग उदंड आहेत. षे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मितान गुरुवार, 04/20/2017 - 15:53 नवीन
फेमिनाझी हा शब्द प्रचंड आवडला गेला आहे !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पैसा गुरुवार, 04/20/2017 - 18:27 नवीन
=)) तुला माहीत नव्हता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
क
कवितानागेश Fri, 04/21/2017 - 13:03 नवीन
मुळात "क्या बात है मॅडम ऑफिस मे तो बडी शांत शांत रहेती हो" असा प्रश्न कोणाला तरी विचारण्याचा काय संबंध?-------- मला वाटते कि त्याला असे विचारायचे होते कि तू तर इथे ग्रुपवर पुरशांसारखीच वागतेयस ! मग ऑफिस मध्ये बायकांसारखी कशी काय वागतेस?!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मितान गुरुवार, 04/20/2017 - 15:52 नवीन
तुम्ही म्हणजे अगदी अस्से आहात कॅप्टन ! ऑफिसमध्ये पण अनाहिता !!! थक्क झाले बाई ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 04/20/2017 - 17:48 नवीन
सगळ्या अनाहिता नै ओ. फक्तं कंपुबाजी करणार्‍या अनाहितांबद्दल आक्षेप आहे. किंबहुना आक्षेप अनाहिता असण्याबद्दल नसुन चुकीच्या बाजुने एकत्र टोळधाडी हल्ला करणार्‍या समस्तं मानवजमातीवर आहे. अनाहितांचा उल्लेख फक्तं आणि फक्तं ३०० व्हावेत म्हणुन आहे. ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान गुरुवार, 04/20/2017 - 18:24 नवीन
मग मज्जा येणार ! बसले फांदीवर येऊन :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा गुरुवार, 04/20/2017 - 18:57 नवीन
जरा मला पण जागा ठेव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ट
टवाळ कार्टा Fri, 04/21/2017 - 07:35 नवीन
तिथेपण मानाचे पण असते म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 04/21/2017 - 07:49 नवीन
तू आपला माणूस आहेस. खास जागा देऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 04/21/2017 - 08:20 नवीन
कशाला गैरसमज पसरवत आहात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 04/22/2017 - 07:32 नवीन
सगळं झाड तुमचचं आहे. तुम्ही दुसर्‍यांना जागा द्यायची. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
दशानन Fri, 04/21/2017 - 09:41 नवीन
यह सब क्या हो रहा है भाई! - जाने भी दो यारो!
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Fri, 04/21/2017 - 11:55 नवीन
असं कसं असं कसं असं कसं ५०० पाहीजेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
समाधान राऊत Fri, 04/21/2017 - 12:39 नवीन
स्वााार्री हा मेसेजसुद्धा इथे चुकुन आला सॅारी बरका आयाम एक्स ट्रीमली स्वारी
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 04/22/2017 - 07:30 नवीन
छ्या अजुन शंभरी नै भरली. पुर्वीचं मिपा आणि 'हाणाहिथा'चं राहिल्या नैत राव.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Sat, 04/22/2017 - 09:14 नवीन
दोन मिपा-आधुनिकोत्तर स्लोगन्स म्हणून टाका बरं ही दोन्ही वाक्यं आमच्या अभ्यादादाच्या धाग्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कंजूस Sat, 04/22/2017 - 15:04 नवीन
पुरुषांची कुचंबणा/फजिती होते म्हणजे नक्की काय होत असेल? धरलं तर चावतं सोडलं तरी चावतं?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा