लॉन-वरचं लगीन!
नाटकापेक्षा आमच्या धंद्यात,
नेमका उलटा खेळ आहे.
तिथे भेळेला खाणारा आहे.
इथे खाणाय्राला-भेळ "आहे! "
स्टेज लागून तयार आहे.
नेपथ्यंही सज्ज आहे.
वधूपार्टी येऊन गरम,
आणी .. वरंपार्टी थंड आहे.
या रे! जा रे! .. आणा रे! बोलवा रे!
हलकल्लोळ आता उडणार आहे.
जो तो येऊन गप पडल्या,
भटावर आता चिडणार आहे.
दोन तास लेट झाला
आकराची वेळ छापून !
आइस्रकिम जरी "तयार होतं"
वितळण्या आधी कापून! (स्लाइस करून)
केटरिंग आणी भटजिंचीही
अवस्था अशी-एक आहे.
काम ठरताना चालंलेली नोट
आज मात्र "फेक" आहे.
लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट!
लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट!
भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत
कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!
तेव्हढ्यात एक लहान मूल,
आइस् करीम घेऊन येते.
"काका.. आयश्लिम खानार? " म्हणून
थंडावा देऊन जाते.
मग मनात विचार येतो..
इथे लहान होऊनच रहायला हवं.
त्याच्या निरागस नजरेनी,
सगळं चालंलेलं पहायला हवं!
मग सगळे त्रास सु सह्य होऊन,
अॅक्सेप्टन्स वाढेल.
आणी फार तर तिथला 'राग',
तो कवितेतून काढेल!
सोप्पं होऊन जाइल सगळं
त्रास हवेत विरून जाइल!
शब्द उरले नाहित.. तरी,
काव्य तळाशी राहिल!
==============
अत्रुप्त...
💬 प्रतिसाद
(24)
व
विनिता००२
गुरुवार, 04/20/2017 - 10:02
नवीन
वा वा!!
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 04/20/2017 - 10:36
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
D
Dr prajakta joshi
गुरुवार, 04/20/2017 - 13:04
नवीन
छान
- Log in or register to post comments
स
सावत्या
गुरुवार, 04/20/2017 - 13:10
नवीन
छान!!!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 04/20/2017 - 13:58
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/20/2017 - 15:05
नवीन
वा वा....काय सुंदर जमलिये हो कविता. लग्नाचा हंगाम आला की गुर्जींना कविता व्हायलाचं पाहिजे.
रच्याकने त्या आइश्क्लिम वाल्या कार्ट्याला काही दिलतं की नाही ;)!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/20/2017 - 15:15
नवीन
नाहि, त्यांचे यजमान रागावतात.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 04/20/2017 - 15:31
नवीन
गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, खफ पोस्टीत वगैरे हल्ली लहान बाळांचा फार उल्लेख असतो, नै? =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 04/20/2017 - 15:43
नवीन
ते पण बोबड्या बोलणाऱ्या
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/20/2017 - 18:25
नवीन
गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा घुसला उंट!
जाता जाता यशो तैं नी टपली मारून केला स्टं... टं! 
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 04/20/2017 - 20:28
नवीन
वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी फक्त सांगितलं, नजरेस आणून दिलं तर स्टंट काय? हे बरंय! =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/21/2017 - 12:36
नवीन
आं Sssssssssss
दुत्त दुत्त! 
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 04/21/2017 - 12:44
नवीन
कशा गुदगुल्या होतेत एका माणसाला....अं..अं..अं....
कसं खिदळतंय एक माणूस मनातल्या मनात....अं...अं...अं...
.
कसं बसतंय एक मानूस अॅक्टिव्हावर मांडी घालून. अं..
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/21/2017 - 15:40
नवीन
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
गुरुवार, 04/20/2017 - 21:04
नवीन
वा वा गुर्जी !!!
एकदम मस्त
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/20/2017 - 16:08
नवीन
काय अभ्यास काय अभ्यास!
आता गुल्जी लागाव्णाल आनि दूत्त दूत्त बोलणार
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/20/2017 - 18:15
नवीन
आईशक्लीमचा पण असतो. परवाच्या कवितेत पण आईशक्लीम आजच्या कवितेत पण आईशक्लीम. ;)!!!
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/20/2017 - 15:11
नवीन
व्वाव्वा!!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 04/20/2017 - 18:26
नवीन
वाहव्वा वाहव्वा. इनशादेव. माशादेव.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Fri, 04/21/2017 - 06:36
नवीन
<> लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट!
लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट!
भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत
कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!blockquote
छान आहे कविता, जास्त आवडलं. तेवढं क्रीया पद मात्र क्रियापद असायला हवं होतं.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 04/21/2017 - 09:39
नवीन
उत्तम!!!!!!!!!
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 04/21/2017 - 09:49
नवीन
गुर्जी! दर्शन द्या ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/21/2017 - 10:00
नवीन
अवघड आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/21/2017 - 12:40
नवीन
सर्व वाचक ,प्रतिसादकांचे आभार. :)
- Log in or register to post comments