Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - फिरोझपूर (आणि समाप्त..!)

म
मोदक
गुरुवार, 04/20/2017 - 15:20
💬 22
************************ . ************************ भाग १ - तयारी भाग २ - पुणे ते रोहतक भाग ३ - पानिपत भाग ४ - चंदिगड आणि मनाली भाग ५ - रोहतांग आणि केलाँग भाग ६ - केलाँग ते कारू भाग ७ - लेह शहर आणि BRO भाग ८ - पँगाँग लेक भाग ९ - खार्दुंगला पास भाग १० - कारगिल वॉर मेमोरीयल भाग ११ - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग ************************ उगाचच आळस केल्याने हा शेवटचा भाग टाकायचा राहून गेला.. त्याबद्दल क्षमस्व..! पूर्वीच्या भागांमधले फोटोही दिसत नाहीयेत. नंतर सवडीने दुरूस्त करेन. ************************ हरियाणामध्ये जाटांचा संप आणि रास्तारोको सुरू असल्याने आज राजस्थानातून परत जाणे भाग होते. पंजाबातल्या प्रसन्न सकाळी बाजूने पसरलेल्या शेतांच्या सोबतीने प्रवास सुरू झाला. आता बघण्यासारखे फारसे काही शिल्लक नव्हते आणि घरी जाण्याचीही ओढ लागली होती. एका धाब्यावर पेटपुजा उरकली. पराठे, लोणी आणि लस्सी..! . आज पूर्वी ठरवलेल्या रस्त्यांना फाटा दिल्याने रस्ते शोधत शोधतच जात होतो. अनेकदा एखाद्या गावात-खेड्यात थांबून पत्ता विचारला की तो पत्ता सांगणारा माणूस चहा आणि खाण्यापिण्याचा आग्रह करायचा. हे आमच्यासाठी एकदम नवीन होते. "मेहमान लोग हो.. चलो कुछ चाय वाय पीते है" असे पदोपदी ऐकू येत होते. यथावकाश फिरोझपूरला पोहोचलो. . फिरोझपूरहून पुढचा रस्ता कुणालातरी विचारणे भाग होते. अचानक एक हट्टाकट्टा सहा फुटी सरदार पोलीस रस्त्याकडेला दिसला. जवळ गाडी नेली तर खांद्यावरचे तीन तीन स्टारही दिसले. मी त्यांच्याजवळ थांबताच पुढील संवाद झाला. तो माणूस प्रचंड बडबड्या होता. इथे निवडक अंशच दिला आहे. पोलीस अधिकारी : आओ जी आओ.. कहां जा रहे हो..? मी : अंकलजी हनुमानगढ जाना है. पोलीस अधिकारी : जाओगे जी.. वो तो पास है, आपको पहले भगतसिंगसाबकी समाधी पे जाना है..! मी : जी..?? पोलीस अधिकारी : हां.. देखो, इ लोग्गोंने अपनी आज्जादी के लिये जान दी है.. आप वहाँ मत्था टेककेही जाना..! मी : हाँ देखते है. (इथे मला ती समाधी नक्की किती अंतरावर आहे ते माहिती नव्हते.) पोलीस अधिकारी : आप चलो.. हम भी वहींपे जा रहें है.. आप को वहीं पे मिलेंगे. मी : .... पोलीस अधिकारी : चलो चाय नाश्ता करते है. मी : नही नही सर.. जाना है हमे. पोलीस अधिकारी : जाओगे जी.. क्या जल्दी है. असे बराच वेळ संभाषण सुरू राहिले आणि नंतर आंम्ही भगतसिंगसाबच्या समाधीकडे मत्था टेकण्यासाठी कूच केले. तेथे वेगळाच माहोल.. सुरूवातीला सगळ्या हुसैनीवाला बॉर्डरचे अंतर दाखवणार्‍या पाट्या दिसत होत्या आणि नंतर नंतर समाधीच्या पाट्या दिसू लागल्या. . यथावकाश रस्ता चुकत चुकत समाधीपाशी पोहोचलो, हुसैनीवाला बॉर्डर आणि समाधी अगदीच शेजारी शेजारी आहे. समाधीचा रस्ता. . . . तेथे गेल्यावर आणखी एक गोष्ट लक्षात आली, तेथे एकत्रच अनेक वेगवेगळी स्मारके होती. त्यातच भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्मारक होते. पुढील प्रवास फोटोमधून करूया.. . . . . . . . . . . . . . . हुसैनीवाला बॉर्डरला पाकिस्तानने अनेकवेळा उपद्रव दिला आहे. त्यामुळे येथे प्रत्येक युद्धाचे एक असे स्मारक उभे केले होते. . . . . . . . . . . . . . . कैसर ए हिंद टॉवर - हा टॉवर पाडण्याचे प्रयत्न प्रत्येक युद्धात झालेले आहेत आणि वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांना तोंड देऊन आजही हा टॉवर उभा आहे. . . . रणगाड्याच्या तोफगोळ्यांनी पडलेली भगदाडे.. . थोडे जवळून.. . या टॉवरमध्ये त्या वेळचे रेल्वे रूळही जपून ठेवले आहेत. . तेथेच भगतसिंह यांच्या मातोश्रींचीही समाधी होती. . . . . आणखी एक स्मारक.. . . . भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्मारक.. . स्वागत . . . . . . . येथे अचानक यशवंतराव चव्हाणांचे नांव वाचून सुखद धक्का बसला. . . . . तेथेच बटुकेश्वर दत्त यांचीही समाधी होती. . या स्मारकाचे आवार एकदम प्रशस्त होते. पूर्वी आणखी चांगल्या अवस्थेत असावे असे अनेक पुरावे जागोजागी दिसत होते. . . . या तिघांपुढे खरोखरीच डोके टेकवून बाहेर पडलो. हुसैनीवाला बॉर्डर या स्मारकाच्या शेजारीच आहे. . . या कमानीच्या मागे दिसत आहे तो पाकिस्तान.. . तोपर्यंत फिरोझपूरमध्ये भेटलेले पोलीस अधिकारी भेटले. पुन्हा गप्पा झाल्या. नंतर आंम्ही तेथून निघालो. आता लक्ष्य होते हनुमानगढ किंवा जमले तर आणखी पुढे. जेवणाची वेळ झाली होती म्हणून विजय एका पोलीसालाच रस्ता विचारताना.. . (या साहेबांनी एकदम डीट्टेल पत्ता सांगितला. आगे गांव है वहाँपे मंदिरके बाद दो धाबे है.. वहाँपे पहला साफ और दुसरा धाबा गंदासा दिखेगा.. लेकिन वही अच्छा खाना खिलाता है.) त्या धाबेवाल्याने खरोखरीच चांगले जेवण बनवले होते. नंतर राजस्थानातील गरम हवेतून प्रवास सुरू झाला. अगदीच असह्य झाले की एखादा पेट्रोल पंप बघायचा, गार पाणी डोक्यावर ओतून घ्यायचे. जॅकेट, हेल्मेट, ग्लोव्हज अगदी बुट आणि मोजेही गार पाण्याने भिजवायचे आणि प्रवास सुरू ठेवायचा असे सुरू होते. ..आम्ही एका पंपावर असेच भिजून बाहेर पडलो आणि धूळ + मातीच्या वादळात सापडलो. जोडीला नंतर प्रचंड पाऊस. त्यामुळे आजचा मुक्काम हनुमानगडलाच केला. ************************************* दुसर्‍या दिवशी बाहेर पडून पुन्हा प्रवास सुरू केला. राजस्थानातल्या खेड्याखेड्यांमध्ये खूप मजा येत होती, कुठेही थांबल्यावर भर्रकन लोकं गोळा व्हायची, आमच्या जॅकेटच्या आर्मर्सची हात लावून तपासणी होत होती आणि "गरम नहीं होता क्या..?" असा हमखास प्रश्न विचारला जात होता. . राजस्थानातच कुठेतरी.. . या दिवशी हनुमानगढ ते उदयपूर असा ७०० किमीचा पल्ला गाठला. ************************************* आजचा प्रवासाचा शेवटचा दिवस.. आज मुंबई आणि शक्य झाले तर पुणे असा प्लॅन होता. आंम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो. थोड्याच वेळात गुजरातमध्ये प्रवेश केला. वाटेत अचानक हा माईलस्टोन दिसला म्हणून मी आजुबाजूला कोणी नाही याची खात्री केली व धूमधाम हसत गाडी वळवून परत गेलो. . . वडोदरा, सुरत, वापी एका लयीत मागे पडले.. मुंबईच्या ट्रॅफिकमधूनही बाहेर पडलो. सकाळी राजस्थानात सुरूवात केल्यापासूनही आजिबात न लागलेले ट्रॅफिक मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला लागले. तेथे अर्धा पाऊणतास गेला. यथावकाश पुण्याला पोहोचलो..!! . एक स्वप्नवत प्रवास पूर्ण झाला होता. कोठेही न धडपडता सुखरूप घरी पोहोचलो होतो. आत्तापर्यंतचे सर्वाधिक अंतर आज कापले होते. आज न थांबता एका दिवसात ९५० किमी अंतर कापले होते. इतके अंतर सलग कापूनही कोणताही त्रास झाला नाही. गाडीसुद्धा व्यवस्थित होती. :) या प्रवासाने खूप गोष्टी शिकवल्या.. खूप लोकांना भेटलो. खूप भटकलो.. हिमालयाची पहिली भेट 'कधीच विसरली जाणार नाही' अशी झक्कास झाली. भेटू परत.. अशाच एखाद्या प्रवासानंतर..! . (समाप्त) **************** सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे विशेष आभार. व्यनीतून वेळोवेळी चौकशी करणार्‍या आणि प्रोत्साहन देणार्‍या मित्रांचेही आभार्स..!! ****************

Book traversal links for ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - फिरोझपूर (आणि समाप्त..!)

  • ‹ ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग
  • Up

प्रतिक्रिया द्या
11978 वाचन

💬 प्रतिसाद (22)
र
राघवेंद्र गुरुवार, 04/20/2017 - 17:36 नवीन
मोदक भाऊ मस्तच !!! शेवटचा भाग हि मस्त. एकाच भागात पंजाब , राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र ची सफर केली. पुढील ट्रिप ला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 04/20/2017 - 17:41 नवीन
शाब्बास रे गड्या!!!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 04/20/2017 - 17:42 नवीन
अप्रतिम सफर. समारोपही सजेसा.
  • Log in or register to post comments
द
देशपांडेमामा गुरुवार, 04/20/2017 - 18:20 नवीन
सुंदर लिहिले आहे मोदक भाऊ !! लस्सीचा फेसाळलेला ग्लास बघून वारलो आहे ! देश
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/20/2017 - 18:57 नवीन
सर्व शहीदांना _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 04/20/2017 - 19:06 नवीन
सुरेख. पंजाब मधे माझाही असाच अनुभव होता. ५ पैकी फक्त एक दिवस होटेल /ढाब्यात खाल्लं. एक दिवस गुरुद्वारातला लंगर प्रसाद. बाकी वेळेला लोकांनी हात धरधरून घरी नेऊन पोट भरेस्तो खाऊ पिऊचे लाड केलेत. मोठे दिलदार लोक!!
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 04/20/2017 - 20:03 नवीन
तुमचे पंजाब प्रवास वर्णन एके ठिकाणी वाचले आहे.. तेथील अनुभवांवर आणखी लिहा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
क
कबीरा Fri, 04/21/2017 - 03:18 नवीन
शेवटच्या २ दिवसात १७००किमी एवढ अंतर पार केलं..नमन __/\__
  • Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ Fri, 04/21/2017 - 05:57 नवीन
अप्रतिम! पंजाबाबद्दल खूप ऐकले आहे...आता जायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Fri, 04/21/2017 - 06:57 नवीन
१७००किमी दोन दिवसात ..बाब्बो , मोदक राव _/\_
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Fri, 04/21/2017 - 07:50 नवीन
लेखातला सगळ्यात पहिला फोटो आवडला. तुम्ही राजगुरू- सुखदेव- भगतसिंगांच्या स्मारकास भेट दिली हे फार भारी वाटले. आणि ते दोन्ही माईल स्टोन तर कहर म्हणायचे.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 04/21/2017 - 09:57 नवीन
लैच भारी..
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/21/2017 - 12:37 नवीन
धन्य हो प्रदक्षिणा मोदकरायांची. आमुचा त्रिवार मुजरा.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sat, 04/22/2017 - 09:23 नवीन
जबरदस्त अनुभव कथन. भारी फोटो. पण, दोन दिवसात इतके मोठे अंतर पार करने, ह्ये काही पटले नाही बघा. एका दिवसात ३०० किमी खुप झाले. प्रवासाची मजा घेत-घेत प्रवास केला पाहिजे. पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा. बाबा योगिराज.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 04/22/2017 - 10:15 नवीन
मस्त झाली ट्रिप
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 04/22/2017 - 19:53 नवीन
वा खूप छाब
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/25/2017 - 02:47 नवीन
अरे काय माईलस्टोन आहेत!!! नॉर्थ पोल?!! मस्तच रे!!
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Wed, 04/26/2017 - 11:45 नवीन
अप्रतिम लेखमाला मोदकराव _/\_
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 05/06/2017 - 13:09 नवीन
बर्‍याच दिवसांनी मिपावर आलो आणि सरळ हाच भाग वाचला. आता पुर्वीचे सगळे भाग वाचुन काढतो. प्रवास एकदम खासच. परिभ्रमणे कळे कौतुक!!!
  • Log in or register to post comments
ब
बरखा Mon, 05/22/2017 - 11:37 नवीन
लेह लडाख म्हणल की मी लगेच माहीती गोळा करते. एकदा या ठिकाणी भेट द्यायची आहे. तुमची लेखमाला वाचली. खुप छान वर्णन आहे. फक्त फोटो अजिबात दिसले नाहीत. त्या मुळे जरा वाईट वाटल. तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे फोटो दिसतील अशी व्यवस्था करा.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 10/31/2017 - 11:41 नवीन
देवा फोटो नाही दिसत
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 10/31/2017 - 12:49 नवीन
पाटील साहेब, लदाख स्वारी काय आता..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा