तू येता
तू येता फुलांत गंध रुतला
पाना फुलांत रानवारा नाचू लागला
कंपने उठली अधरांच्या देहावरी
सुखाचा हिंदोळा झुलतो ह्रदयावरी
अधीर रातीचा रंग परि हसला
तवं पंथावर झाले डोळे चांदण्यांचे
चरणी दरवळे आभास स्पर्शांचे
हूरहूर बावरी जाई वेटाळूनी जीवाला
ओंजळीत मी चांदणे घेऊनी
तुझ्या रेशमी केसांत माळूनी
झाडाच्या डोईवर खेळतो चांद आपुला
💬 प्रतिसाद
(3)
प
पैसा
गुरुवार, 04/20/2017 - 18:18
नवीन
छान कल्पना आहेत एकेक!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 04/20/2017 - 18:41
नवीन
+१
खरच छान आहेत.
- Log in or register to post comments
च
चांदणशेला
Sat, 04/22/2017 - 07:07
नवीन
धऩ्यवाद
- Log in or register to post comments