Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंधभारल्या रात्री होत्या...

स — सत्यजित..., गुरुवार, 04/20/2017 - 23:39
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा... फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते! विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना... लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते! मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा... पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
4775 वाचन

💬 प्रतिसाद (16)
म
मोनाली Fri, 04/21/2017 - 10:12 नवीन
किती सुन्दर!
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 04/21/2017 - 10:23 नवीन
शॉरी :D उत्तम रचना होती म्हणून जरा आचरटपणा केला आहे ;)
  • Log in or register to post comments
च
चिनार Fri, 04/21/2017 - 10:34 नवीन
मस्त !!! अजून वाढवता येईल का ???
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 04/21/2017 - 13:11 नवीन
अहा! छान शृंगारिक रचना.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/21/2017 - 16:25 नवीन
(कविता) आवडली
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Fri, 04/21/2017 - 17:00 नवीन
इथुन , दिलापासुन आवडली आहे कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/22/2017 - 04:14 नवीन
राऊतांच्या समाधानात सहभागी. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत
स
सत्यजित... Sat, 04/22/2017 - 20:52 नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Tue, 05/09/2017 - 04:52 नवीन
खूप आवडली
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 05/09/2017 - 07:33 नवीन
मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! बहोत खूब !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 05/10/2017 - 05:43 नवीन
आगाऊ म्हाद्या,संजयजी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 05/10/2017 - 05:46 नवीन
सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 05/10/2017 - 06:10 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 05/10/2017 - 14:20 नवीन
लव्हली
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 05/11/2017 - 00:50 नवीन
सुंदर रचना
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 05/24/2017 - 23:07 नवीन
पैसा,अनुप,वेल्लाभट,पाषाणभेद सर्वांचे खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा