भटकंतीची बकेट लिस्ट
नमस्कार मंडळी,
आपण सगळे भटके लोकं अनेक ठिकाणे फिरत असतो, नवीन नवीन जागी भेट देण्याचे प्लॅन बनवत असतो आणि ती ठिकाणे फिरून झाली की पुन्हा नवीन ठिकाणांच्या शोधात इंटरनेट धुंडाळत असतो
अनेक ठिकाणे आपल्याला मित्रपरिवार आणि परिचितांकडून कळतात. अनेकदा अवचित एखाद्या ब्लॉगवरून नवीन ठिकाणाचा आपल्याला शोध लागतो आणि आपली must visit ठिकाणांची यादी तयार होत जाते.
तर अशी आपली मिपाकरांची भटकंतीची बकेट लिस्ट तयार करूया का?
माझी आत्ता आठवणारी यादी पुढीलप्रमाणे, बाकीचे नंतर सवडीने टंकतो.
१) श्री शैलम - शिवरायांचे मंदिर.
२) भारत आणि सर्व शेजारी देशांच्या सीमा (अटारी आणि फिरोझपूर झाले आहे, चुशुल व पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा यादीवर आहेत)
३) अंदमान आणि सेल्युलर जेल
४) लक्षद्वीप (आणि स्नॉर्केलिंग)
५) प्रत्येक राज्यातील विशिष्ट सण शोधून त्या दरम्यान भेट देणे
६) इंडिया गेट - दिल्ली
७) मला एकदा मुंबई ते गोवा किनारपट्टीने प्रवास करायचा आहे (शक्यतो सायकलने)
८) विवेकानंद स्मारक
अशी तुमची यादी काय आहे?
*************
१) भारताबाहेरील ठिकाणे असली तर प्रतिसादातच भारतातील ठिकाणे आणि बाहेरची ठिकाणे असे वर्गीकरण करा
२) एक दोन वाक्यात तेथे भेट देण्याचे विशेष कारण किंवा त्या जागेचे महात्म्य / वैशिष्ट्य काय हे ही टाका
************
💬 प्रतिसाद
(65)
प
प्रसन्न३००१
Wed, 04/26/2017 - 09:05
नवीन
बरीच ठिकाणं फिरायची आहेत भारतातील आणि बाहेरील, पण त्यातली निवडक काही
भारतात
१) अमृतसर - वाघा बॉर्डर, जालियनवाला, सुवर्ण मंदिर, खटखटकलां (भगतसिंगांचं गाव आणि समाधी)
२) राजस्थान - उदयपूर, जयपूर, चितोड, जैसलमेर
३) गुजरात - कच्छ रणोत्सव
४) कूर्ग
५) नॉर्थ ईस्ट राज्ये
भारताबाहेर
१) भूतान
२) न्यूझीलंड
३) जर्मनी - बर्लिन, म्युनिक, न्युरेम्बर्ग
४) पोलंड - ऑश्विच, वोर्सा, क्रॅकोव
५) नायगारा, न्यूयॉर्क (मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि ९/११ मेमोरियल साठी फक्त)
अजून खूप आहेत, जसं सुचेल तसं टाकतो इथे
- Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi
Wed, 10/28/2020 - 07:18
नवीन
प्रसन्न, खटखटकलां बघायचं असेल तर हुस्सैनीवाला विसरू नका.एकवेळ वाघा बॉर्डर नाही बघितली तर चालेल. पण हुस्सैनीवालाला जरूर जा.
- Log in or register to post comments
स
सुहास बांदल
Wed, 04/26/2017 - 13:09
नवीन
भारतात
सर्व काही
भारताबाहेर
बराचसा युरोप पाहून झाला असला तरी परत बघावासा वाटतो.
१. ट्रान्स सैबेरिअन रेल्वे
२. कंबोडिया - अंगकोरवट मंदिर
३. नॉर्थन लाइट्स
४. Auschwitz concentration camp
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/07/2017 - 19:02
नवीन
२. कंबोडिया - अंगकोरवट मंदिर... अंगकोरवट निश्चितच कंबोडियातिल सर्वात मोठे आणि सर्वात जास्त प्रसिद्ध आकर्षण आहे. पण, तेथे इतर अनेक आकर्षणे आहेत, त्यांच्यासाठीही वेगळा वेळ जरूर काढून जा.
- Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट
Fri, 04/28/2017 - 06:18
नवीन
अमेझॉन चे जंगल
इस्टर आयलंड
सहारा वाळवंट
इजिप्त पिरॅमिड
साऊथ पॅसिफिक
न्यू झीलंड
पाकिस्तान
हे सर्व पाहण्याची इच्छा आहे
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 05/01/2017 - 16:09
नवीन
मक्का!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/07/2017 - 18:59
नवीन
मुस्लिम नसलेल्या व्यक्तींना मक्केच्या सीमेत प्रवेश मिळत नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/07/2017 - 19:07
नवीन
भटकंतीचे वेड डोक्यात असले की अशी यादी 'बकेट लिस्ट' नाही तर 'अनेक-टँकर-लिस्ट' बनते. यादीतील काही ठिकाणे पाहिली म्हणून कमी होतात तोपर्यंत तिच्यात नवी नावे जोडली जातात. केवळ आतापर्यंतची माझी यादी या आयुष्यात पुरी करता आली तरी मी पूर्ण समाधानाने निरोप घेईन :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 05/07/2017 - 19:45
नवीन
अख्खे जग फिरायचेय, खोटे कशाला बोला. फ्रान्समध्ये नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा नेपोलियन किंवा त्याच्या सैनिकाच्या वेषात, रोममध्ये जाऊन रोमन सेंच्युरियन आणि सेनेटरच्या वेषात , ग्रीसमध्ये जाऊन स्पार्टन योद्ध्याच्या वेषात, इजिप्तमध्ये जाऊन फॅरो आणि टकलू हैवान इमहोटेपच्या वेषात व चिनी मंत्र्याच्या वेषात फोटो काढून घ्यायची इच्छाही फार आहे.
- Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी
Mon, 05/15/2017 - 08:13
नवीन
तशी बादलीतील यादी मोठी आहे पण मी ५ वर्षासाठी एक लक्ष्य ठेवतो व पूर्णतेसाठी धडपडतो..
येत्या ५ वर्षातील लक्ष्य-
भारतातील-
हिमाचल, काश्मीर , राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत पुन्हा एकदा दुचाकीवर.
भारत परिक्रमा दुचाकीवर.
हॉर्नबिल उत्सव नागालँड.
अंदमान निकोबार
एकाच दिवशी पूर्व किनारपट्टीवर सुर्योदय पाहून तोच सूर्य अस्ताला जाताना पश्चिम किनारपट्टीवरून पाहायचं. (चेन्नई मंगळूर ६६०किमी द्विचक्रीन्ग)
भारताबाहेरील-
भुतानातील चेलेला पास जो मागच्या वेळी राहिलेला
नेपाळ
मुंबई ते सिंगापूर बाईक वरून 7 राष्टांचा प्रवास.
लंका
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Mon, 05/15/2017 - 10:10
नवीन
सुंदर धागा. देश विदेशातल्या पर्यटन स्थळांची चांगली लिस्ट बनतेय या धाग्यामुळे.
- Log in or register to post comments
उ
उदय
Tue, 08/15/2017 - 03:25
नवीन
मसाई मारा किंवा सेरेंगेटी नॅशनल पार्क, आफ्रिका
माचू पिचू, पेरु
अर्जेंटिना/ब्राझील
मलेशिया
मानस सरोवर किंवा एव्हरेस्ट बेस कँप
इजिप्तचे पिरॅमिड
न्यूझीलंड
ऑस्ट्रिया/जर्मनी
फ्रान्स/स्पेन
पुढील १५ वर्षांचा प्लॅन तयार आहे. :)
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Tue, 08/15/2017 - 07:25
नवीन
चंद्रावर किंवा मंगळावर जाण्याची खूप इच्छा आहे. पण शक्य होईल असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Tue, 08/15/2017 - 18:10
नवीन
क्रूझमधून प्रवास करणे, कॅरिबिअन मधील एकातरी बीचला भेट देणे आणि स्नॉर्केलिंग करणे या तीन गोष्टी एकदम पूर्ण झाल्या.
त्यात भर म्हणून मॅजिक किंगडम आणि केनेडी स्पेस सेंटरलाही भेट देऊन झाली.
भर समुद्रात स्नॉर्केलिंग करणे हा एक सुंदर अनुभव आहे. लहान असताना पोहणं शिकायचं चान्स मिळाला नाही, २ वर्षांपूर्वी अर्धांगिनीकडून मी आणि मुलगी एकदमच शिकलो. फारसं पोहता येत नसतानाही धाडस करून समुद्रात उडी मारली. तोंडात पाणी जायला लागल्याने अड्जस्ट करताना मास्कची नळीच निघून गेल्यावर एकदा बूड बूड घागरी झाल्याने १-२ लिटर खारं पाणी पण पिऊन झालं. पण तरी नवीन मास्क घेऊन परत समुद्रात उडी मारली. आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi
Wed, 10/28/2020 - 07:12
नवीन
लोलब, गुरेझ (काश्मीर)
पूर्व युरोप
पश्चिम युरोप
ऋषीकेश
गंगोत्री
कैलास मानस
अलास्का
स्कॅंडेनेविया
कॅनेडीयन रॉकीज्
रशिया
डलहौसी, चंबा व्हाया पठाणकोट
उत्तराखंड
अंदमान
कूर्ग
लक्षद्वीप
दक्षिण भारतातील मंदीर शिल्पकला
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2