ती एकदाच दिसली...
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला
दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला!
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!
शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन्
एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!
केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो
कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला!
टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी
बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला!
ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे
प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला!
केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी
हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला!
—सत्यजित
💬 प्रतिसाद
(14)
प
पद्मावति
Mon, 04/24/2017 - 11:48
नवीन
वाह!!! अतिशय सुंदर. खूप आवडली. मला आवडलेल्या यातल्या ओळी quote करण्याचा मोह होत होता पण अशाने ही पूर्ण कविताच quote करावी लागली असती :)
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 04/24/2017 - 18:03
नवीन
सुंदर!
आवडली रचना.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 04/25/2017 - 05:43
नवीन
"एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!"
...मनात रु॑जी घालत राहिली !
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/25/2017 - 08:01
नवीन
छंदबद्ध कविता आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 04/25/2017 - 08:08
नवीन
अफलातून !
अ फ ला तू न !
मस्तच. वाह क्या बात है!
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 04/25/2017 - 09:31
नवीन
खूपच छान !!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 04/25/2017 - 11:55
नवीन
सुरेख लिहिता अगदी,
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 04/25/2017 - 13:20
नवीन
आवडेश. :-)
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
गुरुवार, 04/27/2017 - 10:16
नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 04/27/2017 - 12:06
नवीन
वा!!
- Log in or register to post comments
P
Pradip kale
Fri, 04/28/2017 - 03:49
नवीन
वाह!!!
- Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया......
Tue, 05/09/2017 - 04:49
नवीन
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!
वा, छा गये
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 05/09/2017 - 08:48
नवीन
मस्त मदहोश गझल !!
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Wed, 05/10/2017 - 05:41
नवीन
एस,Pradip,आगाऊ म्हाद्या,स्नेहांकिता धन्यवाद!
- Log in or register to post comments