शिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला?
शाळेत शिकवलेला इतिहास फारसा आठवत नव्हता. नुकतेच मी Quora या वेबसाइट वर
What is the actual reason of Chatrapati Shivaji Maharaj's death?या प्रश्नाची उत्तरे वाचली. त्यात वेगवेगळी कारणे वाचली - १. "गूढघी" रोग २. विषमज्वर ३. विषप्रयोग (सोयराबाई कडून) ४. विषप्रयोग (मंत्र्यांकडून ) तिथे सर्वाधिक लोकप्रिय उत्तर चौथ्या क्रमांकाचे कारण सांगते. पण त्यात नीट संदर्भ दिलेले नाहीत. विकिपीडिया वर मला खालील माहिती मिळाली. https://en.wikipedia.org/wiki/Shivaji#Death_and_succession
In late March 1680, Shivaji fell ill with fever and dysentery, dying around 3–5 April 1680 at the age of 52, on the eve of Hanuman Jayanti. Rumours followed Shivaji's death, ..some Marathas whispering that Soyarabai, the youngest of the three wives who survived him,[75] had poisoned him so that his crown might pass to her 10-year-old son Rajaram. After Shivaji's death, Soyarabai made plans with various ministers of the administration to crown her son Rajaram rather than her prodigal stepson Sambhaji. On 21 April 1680, ten-year-old Rajaram was installed on the throne. However, Sambhaji took possession of the Raigad Fort after killing the commander, and on 18 June acquired control of Raigad, and formally ascended the throne on 20 July. Rajaram, his wife Janki Bai, and mother Soyrabai were imprisoned, and Soyrabai executed on charges of conspiracy that Octoberवरील परिच्छेद वाचून माझा असा समाज झाला कि सोयराबाईना शिवाजी महाराजांना विष दिले म्हणून शिक्षा दिली पण सोयराबाईवरचा विकी लेख वाचून असे दिसते कि त्यांना शिक्षा संभाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला म्हणून झाली. https://en.wikipedia.org/wiki/Soyarabai
Soyarabai's henchmen tried to poison Sambhaji in August 1681, but he survived. When he learnt about the plot, he had Soyarabai poisoned to death. Many plotters including Soyarabai's relatives of the Mohite family were also slaughtered or trampled by the elephants.माझे प्रश्न - १. सोयराबाईंनी महाराजांना मारण्याचा कट केला या बद्दल विकिपीडिया वर काही पुस्तके संदर्भ म्हणून दिली आहेत अ. Jadunath Sarkar (1992). Shivaji and his times ब. Jaswant Lal Mehta. Advanced study in the history of modern India 1707-1813 ही पुस्तके ज्यांच्याकडे असतील ते कृपया त्यातलया संबंधित पानांचे स्कॅन इथे टाकू शकतील का? नेमकी कोणती वाक्ये या दोन पुस्तकात वापरली आहेत? २. सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला? त्यासाठी संदर्भ कोणते? ३. महाराजांच्या (ब्राम्हण) मंत्र्यांनी विषप्रयोग केला - हि अफवा / असा समज कधी पासून समाजात आहे? जे लोक असे समजतात त्यासाठी कोणते ऐतिहासिक संदर्भ ते वापरतात?
(संपादित)