अशा वेळी तुम्ही नक्की काय करता ... २
घरामध्ये कोणी तरी आजारी आहे. आजारी माणसाची कायम चीड चीड होत असते. तशी ती कोणाचीही होताच असते. आजार मुकाट्याने सहन करा असा सल्ला देणारा मी नाही.
पण जर का आजारपण दीर्घकाळ असेल तर? मग घरात कायमच चीड चीड होत राहते. कधी आजारी माणसाची तर कधी इतरांची. बरं प्रॉब्लेम असा होतो कि या आजारी माणसाशी काय बोलायचे आणि कसे बोलायचे? आपण म्हणावे आज सकाळी छान हवा पडली होती तर सकाळी नेमके त्या माणसाला गरगरत असावे. आपण गेल्या डिसेंबर च्या ट्रिप बद्दल बोलायचे म्हणाले तर त्याला तो माणूस येऊ शकलेला नसायचा. एकंदरीतच एकाच घरात असून पण आपले प्रांत वेग वेगळे होऊ लागलेले असतात. बोलायचे तर असते पण बोलणार काय? आजाराबद्दल बोलून त्या माणसाला दुखवायचे नसते. आणि बाकीच्या गोष्टी त्या माणसाला ऐकायच्या नसतात.
इतर घरातली माणसे तरी किती काळ त्या माणसाची चीड चीड सहन करणार? ती माणसे पण ह्या प्रकाराला वैतागलेली असतात.
मला माहिते आहे कि आपल्यातल्या कित्येक जणांनी हे सगळे पाहिलेले आहे. कित्येक जन त्यातून गेलेले आहेत. आणि ह्याला कोठले एका उत्तर सहज सूट होत नाही. प्रत्येकाला आप आपला रास्ता शोधायचा असतो. पण मला मार्गदर्शनाची गरज आहे.
विदेशी वाचाळ
कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते . जर केव्हा श्वास थांबेल याची निश्चिती नाही तर मग मिळालेला प्रत्येक श्वास कृतार्थ करून जातो. अशी व्यक्ती मृत्यूला अत्यंत ग्रेसफुली सामोरी जाऊ शकते.पेशंटला आपण देहापेक्षा वेगळे आहोत ही एकमेव गोष्ट कळली की तुमचा सगळा प्रश्न सुटला !त्या एकाच डिरेक्शननी सगळा प्रयत्न करा.आत्ताच सध्याचा प्रश्न हा मी काय करू हा असा आहे, आणि मला आजारी माणसाला हे ऐकवणे कठीण जाईल. अथवा आजारी माणूस ऐकणार नाही हि माझी ठाम समजूत आहे.अर्थात, घरच्यांचे व्यूज एकमेकांबद्दल फिक्स झालेले असतात. कुणी कुणाला चटकन मानत नाही आणि अशा परिस्थितीत तर नाहीच. म्हणून तुम्हाला म्हटलं की एकहार्ट शक्य असेल तर बेस्ट आहे. २)पहिल्यांदा मला संजय साहेबांचे म्हणणे अजिबात पटले नव्हते. मी पण थोडासा वैतागलो होतो. पण तथ्य आहे.८ वर्ष हा मोठा कालावधी आहे. इथे लोक माझ्याविषयी काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्यापेक्षा मला चूक ठरवण्यात रस असतो. पेशंटची मानसिकता बदलणं हीच एकमेव प्राथमिक स्टेप आहे आणि त्याबरोबर आपली चित्तदशा प्रसन्न असणं आगत्याचं आहे. वेळ हा पेशंट आणि घरचे दोघांसाठी अमूल्य आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या.कॅन्सर ही एका दृष्टीनं फार उपयोगी व्याधी आहे. म्हणजे मृत्यू तर सगळयांनाच आहे पण नॉर्मल व्यक्तीला त्याचा अंदाज नसतो. कॅन्सरमधे पेशंटला एकएक दिवस कमी होत चालला याची जाणीव होते ( खरं तर तीच आपल्यासाठी पण वस्तुस्थिती आहे तरीही आपण ती आजिबात दुर्लक्षित करत जगतो ). त्यामुळे फक्त दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकतेयाचा अर्थ केवळ मॅच्युरिटी कमी असलेली व्यक्ती, `कॅन्सर इज इक्वल टू डेथ' असा काढू शकते.मृत्यू सगळ्यांनाच आहेहा प्रतिसादाचा फोकस आहे (आणि थोडी फार मॅच्युरिटी असेल तर ती वस्तुस्थिती आहे हे कुणाच्याही लक्षात येईल) . एकेक क्षण कमी होत जाणं ही कॅन्सर असो की नसो,प्रत्येकाचीएकसारखी परिस्थिती आहे. पण अज्ञानाचा अंधःकार इतका गहन आहे की धडधाकट माणसाला त्याची कल्पनाच नसते. टर्मिनल इलनेसची व्यक्ती अशा दृष्टीनं सुदैवी की तिला मात्र त्याची यथार्थ जाणीव होऊ शकते, असा प्रतिसादाचा अर्थ आहे आणि विवांना तरी तो समजला आहे. तुम्हाला आणि इतरांना समजेल किंवा नाही पण विवांना निश्चित समजेल म्हणून एक स्टोरी सांगतो: यक्ष एकदा धर्मराजाला विचारतो की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं ? (आपल्या मंडळीं नी उत्तर दिलं असतं की `अरे तुला माहितीच दिसत नाही. या जगात एकूण सात आश्चर्य आहेत !' आणि नंदन छाप भौगोलिक आश्चर्य सांगितली असती.) पण धर्मराजाचं उत्तर एकदम भन्नाट आहे. तो म्हणाला : ` जीवनात मृत्यू इतकी शाश्वत, निश्चित आणि केव्हाही घडू शकणारी घटना कोणतीही नाही. तरी सुद्धा, जनसामान्य आपल्याला मृत्यू येणार नाही अशा भ्रमात जगतात !' एकदा हे समजल्यावर, पुढचं वाक्य सोप्या मराठीत लिहीलंय ते समजायला अवघड नाही :दृष्टीकोन बदलायचा अवकाश की कॅन्सर झालेली व्यक्ती एकेक क्षण इंटेंसली जगू शकते३)मृत्यू अपरिहार्य जरी असला तरी त्याचा सोहळा नक्कीच होऊ शकत नाही जे त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी.ज्याला जगण्याचा सोहळा करता येत नाही त्याला मृत्यूचा काय करता येणार ? तर हा मुद्दा तुमच्या आकलनापलिकडे आहे. सध्या तो राहू द्या. ४)कोणी तुमचा उल्लेख आभार म्हणून केला तरी तुम्ही लगेच हा बघा पुरावा त्यांना माझे मत मान्य आहे म्हणून ढोल वाजवू लागता, हे तुम्हाला शोभत नाही सर.तुमच्याकडे ना आकलन ना परिस्थितीचं गांभिर्य (तुमचा दुसरा प्रतिसाद आणि त्यावर इथल्या सदस्यानी टाकलेली स्मायली पुरेशी बोलकी आहे). विवांना माझा प्रतिसाद समजला हीच गोष्ट माझ्या दृष्टीनं थोर आहे. पण इथे केवळ टिपी करणं, फालतू विडंबनं टाकणं आणि त्यावर बालीश टाळ्या पिटणं इतपतच मजल असलेले ते जाणू शकत नाहीत, त्याला माझा इलाज नाही. ५)माझ्याकडून हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. मी नेहमी म्हणतो की मोठयांच्या ज्ञान व माहितीचा सतत सदुपयोग होणे गरजेचे, पण हे असले ?एकदम योग्य निर्णय ! तुम्हाला माझे प्रतिसाद समजतच नाहीत म्हटल्यावर तुम्ही उपप्रतिसाद देण्याची किंवा प्रश्न विचारण्याची तसदीच घेऊ नका.