पाकिस्तान चे हल्ले
आजच्या लोकसत्ते मध्ये एक विनोदी बातमी आली आहे
जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेची किंमत मोजावी लागेल.. भारताचा पाकिस्तानला सज्जड इशारा
वाचुन खूप हसायला आले ,
पकिस्तान ला ह भारताचा कितवा सज्जड कडक इशारा असेल ?
💬 प्रतिसाद
(74)
म
माहितगार
Fri, 05/05/2017 - 13:13
नवीन
ठिक आहे स्वतःचा जिवपणाला लावणे असे वाचा. सैनिकांच्या हिताची यथा योग्य काळजी घेणे ठिक, त्यासाठी सैन्यदलांतरगत आणि रिटायरमेंट झाल्यानंतर चॅनल्स ऑफ कम्यूनीकेशन उपलब्ध केलेले असतात. सहसा त्यांनी तेच वापरणे अभिप्रेत असते. बाकी त्यांच्या सैनिकी कर्तव्यांबाबत टॉप टू डाऊन या एकाच मार्गाने आदेश जातात वरून आलेल्या आदेशाचे पालन कोणतेही ड्युटी बजावण्यास अनावश्यक प्रश्न न विचारता केले जाणे प्रसंगी जीव घालून देशाचे संरक्षण करणे हे सैनिकाचे कर्तव्य असते. माझ्या माहिती प्रमाणे हि जगातल्या कुठल्याही सैन्यदलाच्या बेसिक डिसीप्लीन असते. डाव्यांचे सोडून द्या आपण दोघे डॉक आणि आपण उजव्या बाजूचे प्रतिनिधीत्व करता तरीही बेसिक डिसीप्लीनचा आग्रह न धरता त्यावर स्वतःच प्रश्नचिन्हे उभी करता आहात याची मला अंमळ गंमत वाटते आहे.
- Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द
Fri, 05/05/2017 - 13:27
नवीन
गेली अनेक वर्षे इस्लाम ने झपाटले आहे , त्या धर्मान्ध , सन्कुचित , पुराण मत वादी , लोकान्ना चर्चा करुन बदलवता येइल ? काश्मिरियत वगैरे सगळे मुद्दे दुय्यम आहेत, कश्मिरियत हा खरा मुद्द असता तर कश्मिर मधून हिन्दु ना पळुन जावे लागले नसते .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/05/2017 - 13:48
नवीन
तसा तुमच्या धाग्याचा विषय वस्तुतः वेगळा म्हणजे पाकीस्तान आहे आणि प्रत्यक्ष चर्चा आपण करतोय काश्मिरवर असो.
काश्मिरचा मुख्य प्रिऑरीटी कायदा आणि सुव्यवस्थेची आहे, लोकांना बदलत बसण्याची नाही . काश्मिरवर ११ व्या शतकाच्या आधीही इतर भारतीय राजांनी राज्य केले असेल त्या नंतर अफगाण आले मोघल आले डोग्रा आले शीख त्यानंतर हिंदू (अप्रत्यक्ष ब्रिटीश) सगळ्या दक्षीण आशियातून काश्मिरवर राज्य करून झाले आहे आणि त्या सगळ्यांना कायदा सुव्यवस्था या ना त्या मार्गाने आणता आलेली आहे. या ना त्या मार्गाने भारत सरकारने कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करावयाची आहे.
ब्रिटीश तसे कट्टर ख्रिश्चन होते पण जगभर इस्लामी देशांवर प्रभाव गाजवला त्यानंतर आमेरीका इस्लामी राज्यांवर प्रभाव गाजवते. सेंट्रल आशीयातली अर्धाडझन इस्लामी राष्ट्रे रशियाचे ऐकतात झुकनेवाले झुकते है झुकानेवाले चाहीए. काश्मिरच्या बाबतीत फक्त बाब एवढीच आहे आपण परकीयांना नाही आपल्याच मार्ग भटकलेल्या नागरीकांना योग्य मार्ग दाखवत कायदा सुव्यवस्था निर्माण करावयाची आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/06/2017 - 11:18
नवीन
ते जे भटकलेले शांतीधर्मी आहेत त्यांची सरकारने समधर्मी देशात रवानगी करावी. त्यांच्या मालमत्तेवर टाच आणावी. विरोध केला तर सरळ गोळ्या घालाव्यात आणि मानवाधिकारवाल्यांना पण तेचं करावं.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/05/2017 - 13:56
नवीन
माईंनी दुअलतांचा मुद्दा त्यांच्या दृष्टीकोणास सोईचा समजून मांडला पण दुलत वरुन किती गोड बोलत असले तरीही गोड बोलण्याच्या ठिकाणी गोड बोलणे चालू ठेवा कारवाईच्या ठिकाणी कारवाई करा असेच दुलतांचे मत दिसते. कारवाईवर हात आखडता घेण्यास कुठेही दुलतांनी सुचवलेले दिसत नाही. चर्चेची गुर्हाळे नियमीत अंतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बर्याचदा देखाव्याचाही भाग असतात त्यात अपेक्षा वाढवणे अथवा परेशान होण्यासारखे काही नसते. सज्जड इशारे वगैरेही डिप्लोमॅटीक र्हेटॉरीकचा भाग असतो. खरे पत्ते खेळणे आणि र्हेटॉरीक मध्ये बराच फरक असतो.
वर ट्रेडमार्क यांच्या प्रतिसादात श्रीलंकन स्टृअॅटेजी बद्दलचा दिलेला दुवा खरेच दखल घेण्या जोगा आहे. स्टृअॅटेजीतील गल्लत कोठे आहे ते त्या लेखातून निदर्शनास येते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/05/2017 - 13:48
नवीन
माहितगार,
किमान शिस्त (बेसिक डिसीप्लीन) म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? आणि तिचा आग्रह धरायची गरजंच काय मुळातून?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/05/2017 - 14:02
नवीन
ऊठ म्हटले की उठायचे लढाईची तयारी कर म्हटले की तयारी करायची, धाव म्हटले की कोणत्या दिशेने धावायचे विचारून त्या दिशेने धावायचे, लढ म्हटले की लढायचे, लढाई थांबव म्हटले की थांबवायची, ज्यांच्याशी लढावयास सांगितले त्यांच्याशीच लढायचे ज्यांच्याशी लढायला सांगिंतलेले नाही त्यांच्याशी लढायचे नाही. दिलेल्या/ मिळालेल्या जेवणात मिळालेल्या झोपेत तृप्तता मानायची झोप अथवा जेवण प्रसंगी मिळाले नाही आणि लढाई चालू असेल तर लढत रहायचे.
सोई सुविधा मागणे तक्रारी केवळ उपलब्ध केलेल्या चॅनल मधून मागायच्या त्याची जाहीर वाच्यता टाळावयाची. मला वाटते बेसिक्स आहेत हो हि सगळी चुभूदेघे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/05/2017 - 14:09
नवीन
उगाच सियाचेन मध्ये सैनिक थंडीने गारठून मरतात वगैरे तक्रारी करु नयेत. अती थंडीत कपडे फाटले तरी लह म्हटलेले असताना लढावे. किंवा थंडीत गारठून मृत्यू आला तरी बिनदिक्कत स्विकारावा. मला सैन्याला सियाचेन मध्ये पाठवलेच कशाला अशा बिनकामाच्या हरकती घेऊ नयेत. युद्धावर कुठे आणि कसे पाठवायचे हे निर्णय राजकीय नेतृत्व घेत असते त्याची अमंलबजावणी वरीष्ठ लष्करी आधीकारी करत असतात. राजकिय आणि वरीष्ठांच्या निर्णयाबद्दल युंच का आणि त्युंच का नाही असे प्रश्न फिल्डवरील सैनिकांनी ड्य्टीवर असताना विचारायचे नसतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 05/07/2017 - 18:09
नवीन
माहितगार साहेब
तुमचे वरील दोन्ही प्रतिसाद वाचले तर लष्करी सैनिक हा नोकरी करत नसून तुम्ही भरलेल्या करातुन फेकलेल्या चार तुकड्यांवर जगणारा गुलाम असला पाहिजे अशीच अपेक्षा दिसत आहे.
सैनिक होणे हि प्रतिष्ठेची नोकरी आहे गुलामी नव्हे. हे प्रथम जाणून घ्या.
वाटेत तो आदेश पाळणे हे सैनिकाच्या आचारसंहितेच्या बसत नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल तो गुलाम तर नाहीच नाही. उद्या त्याच्या कमांडिंग अधिकाऱ्याने एखाद्या दुसऱ्या सैनिकाला गोळी घालण्याचा आदेश दिला तर तो तसा आदेश स्पष्टपणे नाकारू शकतो. केवळ मी डॉक्टर आहे म्हणून एखादा कमांडिंग अधिकरी मला "शल्यक्रिया कर" असा आदेश देऊ शकत नाही आणि तसा त्याने दिला तरी तो पाळणे मला बंधन कारक नाही हे समजून घ्या. उद्या पायलट जवळ हेल्मेट नाही तरी त्याने विमान उडवलेच पाहिजे असा आदेश वायुसेनाप्रमुख त्याला देऊ शकत नाहीत.
कायद्याचा भाषेत सांगायचे तर an order has to be given by a lawful command, it should be executable and has to be within the capacity of the person being ordered.
थंडीत गारठून मृत्यू आला तरी बिनदिक्कत स्विकारावा. मला सैन्याला सियाचेन मध्ये पाठवलेच कशाला अशा बिनकामाच्या हरकती घेऊ नयेत. अशा तर्हेचा शहाणपणा तुम्ही शिकवायची गरज नाही. चार पैसे कर भरला म्हणजे सैनिकाला गुलाम समजून वाटेल ते बोलण्याचा आपल्याला हक्क पोहोचत नाही हे लक्षात ठेवा.
एका नौदलाच्या वेतन कार्यालयात कारकुनाला मी याच शब्दात सुनावले होते कि बाबा रे तू जितका पगार कमावतो आहेस तितका कर माझ्या पगारातून कापला जातो आणि त्याला माझ्या पगाराची स्लिप दाखवली होती.
युद्धावर कुठे आणि कसे पाठवायचे हे निर्णय राजकीय नेतृत्व घेत असते त्याची अमंलबजावणी वरीष्ठ लष्करी अधीकारी करत असतात.
फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी श्रींमत ईंदिरा गांधींना स्पष्टपणे सांगितले होते कि बांगला देशात हल्ला करण्यासाठी मला अमुक इतक्या दिवसांचा वेळ हवा आहे अन्यथा हा माझा राजीनामा.
लष्कर हे नागरी नेतृत्व आणि लोकनियुक्त प्रतिनिधींच्या आदेशावर चालले पाहिजे हा मूलभूत विचार भारतीय लष्करात मुळापासून रुजलेला आहे म्हणून ७० वर्षाच्या इतिहासात भारतात एकदाही लष्करी क्रांती झालेली नाही. हीच परिस्थिती आपल्या शेजारी पाकिस्तान पहा अर्धा काळ प्रत्यक्ष लष्करी सत्ता आणि उरलेल्या अर्ध्या काळात नागरी सरकार लष्कराच्या मर्जीवर चालणारे आहे. कोणत्याही इस्लामी देशात लोकशाही नांदू शकत नाही याचे हेच कारण आहे कारण तेथे लष्करी अधिकाऱ्यांनमध्ये लोकशाही हा विचार रुजू शकत नाही( कारणे काहीही असोत)
तेंव्हा लष्करातील लोकांना आपला हा गुलामीचा विचार देण्याची मुळीच गरज नाही. वर पासून अगदी तळापर्यंत भारतीय लष्करातील अधिकारी हे नागरी आणि लोकनियुक्त सरकार च्या बाजून येताहेत हे मी २३ वर्षाच्या कालावधीत प्रत्यक्ष पाहिलेले आहेत (आणि त्यांच्या शी चर्चा हि केलेली आहे .माझे विक्रांतवरील दोन्ही कमांडिंग अधिकारी उप लष्करप्रमुख झालेले होते)
असो
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Fri, 05/05/2017 - 14:38
नवीन
माहित्या कुठून जमा होतात ?
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Fri, 05/05/2017 - 15:33
नवीन
माहितगार जी,
तुम्हाला लष्कराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? आणि तुमच्या डोक्यावर कोणी बंदूक ठेवून असेल तर साध्या साध्या गोष्टींमध्ये तुमची प्रतिक्रिया काय असेल ?
तुमच्या प्रतिक्रियेमधून असे वाटतेय कि तुम्हाला वाटतंय की सैनिक त्यांचा जीव सांभाळून जेवढे शक्य आहे तेवढे करतायत? माझ्या मते ह्या देशात हे सामान्य माणूस करतो.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Fri, 05/05/2017 - 15:45
नवीन
लष्करावर दगडफेक करणाऱ्यांवर तेच दगड फेकून मारावेत अशी भावना मनात सतत येत आहे. काही डोकी जर सुधारण्यापलीकडेच गेली असतील तर ती फ़ुटलेलीच बरी.बाकी मी हे वाक्य वातानुकूलित खोलीत बसून जीवास काहीही तोशीस न होता लिहीत आहे.
अवांतर : खालील बातमी वाचून अतिशय आनंद झाला.
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/nirbhaya-rapists-to-hang-as-supreme-court-upholds-death-sentence/articleshow/58531445.cms"
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/05/2017 - 17:31
नवीन
माहितगार,
तुमचे वरचे दोन संदेश वाचले.
१.
नेमक्या याच कारणासाठी अमेरिकेस सैनिकांऐवजी यंत्रमानव वापरायचे आहेत.
२.
कामावरचे सैनिक असले प्रश्न विचारतही नाहीत.
असो.
एकंदरीत सैनिकास नोकराप्रमाणे सन्मानाने वागवण्यात यावं अशी तुमची अपेक्षा दिसते आहे. मात्र सैनिक जरी नोकर असला तरी नागरी चाकराचा सन्मान आणि सैनिकाचा सन्मान यांत महदंतर असतं.
जगात कुठेही सैनिकदल मानवी हक्कवाल्यांना जबाबदार नसतं. भारतातच हे लाड का म्हणून? वर सैनिकांनीच उपदेश ऐकून घ्यायचा की ड्यूटीवर कसं वागायचं असतं त्याचा!!
आ.न.,
-गा.पै.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/06/2017 - 07:06
नवीन
मी आधीच्या प्रतिसादांमध्येही म्हटले कि देशाच्या एकसंघतेपेक्षा मानवाधिकारांबद्दल बाऊ करण्याचा आग्रह नाही. पण आपल्या आणि डॉक्टर साहेबांच्या विधानात या विषयावर कुठेतरी टोकाचे सरसक्टीकरण होते आहे असे वाटते.
हा शोध आपण कसा लावला कळेल का ? खरेतर या विषयावर जाणकार म्हणून डॉक्टरसाहेबांनी वस्तुस्थिती अधिक व्यवस्थीतपणे मांडावयास हवी होती, असो. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या दृष्टीकोणातून 'वॉर क्राईम' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसीत होत चाललेला विषय आहे. सर्वच गोष्टींवर आंतरराष्ट्रीय सहमती आहे असे नाही, जसे हेग कन्व्हेंषन भारता आमेरीका रशिया सहीत अनेक देशांनी नाकारले आहे ते अजून विकसीत व्हायचे आहे हे मान्य केले तरीही. युनायटेड नेशन्सचा प्रत्येक सदस्य देश जिनेवा कन्व्हेंषनचा सदस्य आहे. त्या शिवाय संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या स्त्रीया आणि मुले यांच्या बद्दल काही आंतरराष्ट्रीय सहमती बनते आहे.
किमान जिनेवा कन्व्हेंषनचा सदस्य आहे. त्या शिवाय संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या स्त्रीया आणि मुले यांच्या बद्दल सैनिकांनी कसे वागावे आणि कसे वागू नये याचे उपदेश सैनिकांना असणे गरजेचे असावे. आंतरराष्ट्रीय नव्हे किमान भारतीय न्यायालयांना उत्तरदायी असावे तेवढेही शक्य नसेल तर सैन्यदलांतर्गत शीस्त म्हणून काही उत्तरदायीत्व हवे की नको ?
विषय टाळत होतो पण टोकाची मांडणी टळावी म्हणून नैऋत्य भारतातील एका राज्यात मधील एका केसची आठवण देतो (हवे असल्यास ऑनलाईन संदर्भ उपलब्ध करुन देतो) एका सुरक्षादलाने (बहुतेक आसाम रायफल्स चुभूदेघे) एका स्त्रीला घरून अटक केली -कदाचीत दहशतवाच्यांशी संबंधही असेल, नंतर काही तासांनी त्या स्त्रीचा मृतदेह शेतात आढळला स्त्रीच्या गुप्तांगाची बंदुकीच्या गोळ्यांनी छळणी झालेली होती. अता अशा केसेस मध्ये सुरक्षादलाचे जवान खरेच इन्व्हॉल्व होते का दहशतवादीच होते आणि सुरक्षादलांना बदनाम करण्याचा कट केला गेला याची कल्पना येणे कठीण असते. न्यायालयाचे दरवाजे पुन्हा पुन्हा खटखटवले गेले, कायद्यातील संबंधीत विशेष तरतुदींमुळे न्यायालयांनी हस्तक्षेप करण्याचे नाकारले , अशा परुस्थिती आक्षेप असलेल्या जवानांची किमान अंतर्गत चौकशी व्हावयास नको का ?' आमचे जवान नव्हते असे धाडसाने म्हणता यावे अशी किमान स्थिती असू नये का ? अंतर्गत चौकशी करून मोठी शिक्षा देऊ नका पण किमान महिनाभराची अधिक कष्टाची ड्यूटी कोर्टमार्शल करुन देता येत नाही का ?
अशा केसेस मध्ये काहीच चौकशी झाली नाही तर मानवाधिकारवाले काय बोंबाबोंब करतील तो भाग वेगळा संबधीत समुदायात वेगळा संदेश जाऊन प्याद्यांची भरती वाढू शकणार नाही का ?
दहशतवादासाठी दहशतवादी प्यादी टपकवणे वेगळे आणि टाळण्याजोगे अत्याचार पाठीशी घालणे वेगळे. त्यामुळे सैनिकांची बाजू घ्यावी पण आमचे जवान स्त्रीयां लैंगिक अत्याचार करत नाहीत -किंवा खपवून घेतले जात नाहीत- हे अभिमानाने सांगण्याची किमान स्थिती असावी अथवा नको ?
अर्थात आपल्या भूमिकेत टोक दिसले म्हणून उदाहरण दिले, असे अपराध सिव्हीलीअन गुन्हेगार उलट जास्त प्रमाणावर करतात, सैन्यदलातील एखाद्या अपवादात्मक उदाहरणावरून सर्व सैन्याची बदनामी करणारी मानवाधिकारवाल्यांची बोंबाबोंब अनाठायी असते पण सैन्याला छ. शिवाजी महाराजांनी केलेले उपदेश करावयास हरकत असण्याचे काही कारण नसावे असे वाटते. असो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 05/07/2017 - 18:49
नवीन
माहितगार साहेब दुर्दैवाने लष्करातील सैनिक किंवा धिकारी पत्रकारांजवळ जाऊन आमच्या मानवी हक्कांची पायमल्ली झाली म्हणून टाहो फोडू शकत नाहीत म्हणून तुमच्या सारखे लोक केवळ लष्कराकडून होणाऱ्या अत्याचारांबद्दल हिरीरीने चर्चा करताना आढळतात.
१) लष्कराची मुळीच इच्छा नाही कि कोणत्याही अंतर्गत अशांततेत आपण सहभाग घ्यावा. जेंव्हा मुलकी प्रशासन असार्थ असते तेंव्हाच लष्कराला "पाचारण" केले जाते. मुलकी सरकारच्या लिखित विनंतीवरूनच राष्ट्रपती असा निर्णय घेतात आणि लष्कराला आदेश देतात. इत्तर कोणीही( पंतप्रधान सुद्धा) असा आदेश देऊ शकत नाही. कारण राष्ट्रपती हेच सर्वोच्च सेनापती आहेत. ऍडमिरल विष्णू भागवत यांच्या बरखास्तीची आदेशही मा. राष्ट्रपतींनीच ( पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून काढला होता.
२) राजकीय नेतृत्व खंबीर असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाला कुत्रं हि विचारणार नाही. १९९८ साली भारताने अणुस्फोट केले ते कोणत्या आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारून केले? त्यानंतर घातलेली सर्व बंधने सर्व राष्टानी यथावकाश शिथिल केलीच ना? आज तुमची आर्थिक शक्ती इतकी आहे कि तुम्ही ठरवले आणि ३७० कलम घटनादुरुस्तीने रद्द केले आणि काशीर पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात दिले आणि जी येईल ती किंमत देऊ हे स्वीकार केले तर कोणतीही आंतर राष्ट्रीय शक्ती तुम्हाला हात लावू शकणार नाही. कबुतरे उडवण्याच्या आंतरराष्ट्रीय समुदायाला भीक घालायची मुळीच गरज नाही. तुमची जिनिव्हा हेग कन्वेन्शनला चीन मुळीच भीक घालत नाही तरी सर्व युरोपीय देश आणि अमेरिका त्यांच्याशी व्यापार करतातच ना?
३) श्री मोदी साहेबांच्या परवानगीनंतर पाकिस्तानात घुसून लष्कराने सर्गीकल स्ट्राईक केलेच ना? अंतरराष्रीय समुदायाने काहीही केले नाही. तेंव्हा हि सगळी कॉन्व्हेंशन वगैरेची लायकी होळीला बॉम्ब मारण्याच्याहि लायकीची नाही
३) उत्तर कोरिया नखाएवढाही नसताना अमेरिका त्यांना हात लावू धजत नाही. तुम्ही असे काही केले तर चार दिवस कुत्रे भुकतील आणि गप्प बसतील.
राहिला मुद्दा मानवी अधिकाराचा.
लष्करात प्रत्येक सैनिकाला दर महिन्याला एक तास कायद्याबद्दल व्याख्यान दिले जाते. (नौदलात याला articles of war म्हटले जाते.) यात तुम्ही कोणता गुन्हा केला तर काय शिक्षा होईल हे स्पष्टपणे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष अशांत परिसरात परिस्थिती फार वेगळी असते. परवाच झालेल्या शोपीयन गावात दहशतवादी लपले आहेत म्हणून cordon and search म्हणजे वेढा घालून तपास झाला. अशाच एका परिस्थितीत तपास करीत असताना माझ्या मित्राच्या बटालियन मध्ये एक दहशतवादी घरात घुसला आणि आपली ak ४७ त्याने घरातील एका महिलेला दिली आणि तिने ती आपल्या बुरख्यात लपवली. रात्री १० वाजता त्या दहशतवाद्याला पकडले तर त्याने हात वर केले एका सैनिकाने तिला ती बंदूक बुरख्यात लपवताना पहिले होते. आता या महिलेची तपासणी करण्यासाठी महिला पोलीस कुठून आणायचा? तिला बुरख काढायला सांगितलं तर तिच्या नवऱ्याने भरपूर आरडा ओरडा केला. धर्मभ्रष्ट होईल तुम्हाला आम्ही जिने मुश्किल करू इ आरडा ओरडा केला. त्या सैनिकाच्या कंपनी कमांडरला पण शंका येऊ लागली कि सैनिकाचे ऐकून जर आपण तिला बुरखा काढायला लावला आणि बंदूक मिळाली नाही तर आपली खैर नाही. त्याने धीर करून तिला बुरखा काढायला लावला आणि बंदूक जप्त केली.
पण यात मानवी हक्काची पायमल्लीही झाली आणि त्यातून धर्म भ्रष्ट करण्याचे पुण्यही मिळवले. तिथे या मानवीहक्काबद्दल टाहो फोडणाऱ्या महिलांना का पाठवत नाही? जिथे असा प्रसंग येतो तिथे त्या महिलांची तपासणी करायला तरतरी बेरात्री जा
कायदा हा गाढव असतो पण त्याची अंमल बजावणी करणार्याने गाढव असू नये असे आम्हाला शिकवले जात असे. पण तसे होताना दिसत मात्र नाही.
उदा निर्भया केस मध्ये चार जणांना फाशी झाली आणि पाचव्याला केवळ तो १८ वर्षापेक्षा लहान असल्याने सुधारगृहात पाठवले. तेथून तो १८ वर्षे पूर्ण झाल्यावर सूटूनही गेला आणि त्याला आपल्या महान मुख्यमंत्री केजरीवाल साहेबानी एक शिवण यंत्रहि भेट दिले त्याचे पुनर्वसन करण्यासाठी.
बलात्कार करताना आणि निर्भयाच्या गुप्तांगात लोखंडी काम्ब खुपसताना तो अजाण नव्हता पण शिक्षा देताना मात्र तो अजाण होता.
वा रे न्याय
दहशतवाद्याने कसेही काहीही केले तरी चालते पण सैनिकाने मात्र सभ्य गृहस्थासारखे त्याला पूर्ण संधी देऊन कोणताही त्रास ना देता त्याच्या बचावाची पूर्ण संधी देऊनच काम करायचे का तर तो पण एक सन्माननीय नागरिक आहे आणि सैनिक मात्र त्याच्या सारख्या नागरिकांनी दिलेल्या कराच्या तुकड्यांवर पोट भरणारा गुलाम आहे.
बढिया है !
सैनिकांनी केलेल्या प्रत्येक अत्याचाराची चौकशी लष्करात होतेच आणि त्याची त्याला ताबडतोब कोर्ट मार्शल होऊन शिक्षाही दिली जाते. कारण लष्करी अधिकाऱ्यांनाही त्याच्या होणाऱ्या परिणामांची जाणीव असते. लष्करी सैनिक चुका करतातच तेही मानवच आहेत. शक्यतो सैनिकाने आपली सीमारेषा ओलांडू नये अशीच त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांची इच्छा असते. पण युद्धमान परिस्थितीत अशा गोष्टी होतात आणि त्या समर्थनीय नाहीत. त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दोषी असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अशे शिक्षा होताना मी अनेकदा पाहिलेही आहे परंतु त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. कारण भारतात राईचा पर्वत करणाऱ्या मानवाधिकार संघटनांची किंवा इशरत जहाँ च्या नावाने रुग्णवाहिका आणि निर्भया गुन्हेगारांना शिलाई मशीन देणाऱ्या राजकारण्यांची कमतरता नाही.
परंतु ज्या तर्हेने जीपवर दगडफेक करणाऱ्या सैनिकाला बसवल्याबद्दल लष्करावर चिखलफेक झाली ते पाहिल्यावर सगळ्या परदेशातून फंडिंग होणाऱ्या मानवाधिकार संघटनांबद्दल तिडीक मात्र येते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 05/08/2017 - 09:59
नवीन
परदेशातून फंडिंग होणाऱ्या मानवाधिकार संघटनां आणि देशाच्या एकात्मतेची काळजी नसलेले अके ते डावे यांची मलाही तिडीक आहे; मी या चर्चेतील आणि मिसळपाव अथवा इतरत्रही माझी भूमिका संपूर्णतः राष्ट्रीय एकतेच्या बाजूने आहे एवढेच नव्हे काही प्रमाणात मानवाधिकार उल्लंघने होतात शेवटी सुरक्षादले ही माणसांनी बनलेली असतात त्याचा अतीबाउ करत नाही हे वेळोवेली स्प्ष्ट केले असताना व्यक्तिलक्ष्य तर्कदोष असलेल्या अशा धांदांत असत्य विधानावर काय म्हणावे ते समजत नाही. मी मानवाधिकारांची चर्चा हिरहिरीने केली नाही; मानवाधिकार उल्लंघनाचे हिरहिरीने समतोलता सोडून समर्थन झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले हे लक्षात घेतले गेले पाहीजे. प्रश्नचिन्ह उपस्थीत केले म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थीत करणारी प्रत्येक व्यक्ती सुरक्षा दलांवर टिकाकरणारी व्यक्ती होत नाही हे प्रथमतः ध्यानात घेतले पाहीजे.
माझी भूमिका छ. शिवाजी महाराजांसारखी आहे सैनिकांनी होता होईतो जबाबदारीने काम केले पाहीजे अशी आहे. जे देश विरोधी कृत्ये करतात त्यांचा शिवाजी महाराज स्टाईलने चौरंग अथवा कडेलोट केला तरी मला त्याचे मुळीच दुख्ख नाही. त्यामुळे माझ्या भूमिका तुम्हाला वैताग आणणार्या मानवाधिकार संघटनांप्रमाणे नाहीत हे आपण लक्षात घ्यावयास हवे होते. असो
उपरोक्त प्रतिसादातून आपण जिनेवा कन्वेंशनचे अस्तीत्व नकळत मान्य केलेत या बद्दल आभार. जिनेवा कन्वेंशन पाळावे की नाही हा भाग निराळा; गापै आणि बाकी सामान्य जनतेला असे काही असते याची माहितीही नसते ज्यांना जी माहिती आहे त्यांनी ती चर्चेत वस्तुनिष्ठपद्धतीने द्यावयास हवी. त्यात युद्धकालीन मानवाधिकारासंबंधाने नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत हे सांगताना नेमकेपणाची गरज आहे. त्यावर टिका आणि त्यांचे पालन टाळणे कसे समयोचीत आहे हा समर्थनाचा मुद्दा निराळा आहे.
आपल्या प्रतिसादातील ह्या माहितीने आपल्या लेखनासा समतोल प्राप्त होण्यास मदत झाली. आपल्या प्रतिसादातील या माहिती बद्दल आभार.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/06/2017 - 11:17
नवीन
पहिलं म्हणजे काश्मिरी दगडफेक्यांच्या बाजुने लढणार्या मानवी हक्क वाल्यांना गोळ्या घालायला हव्यात.
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Sun, 05/07/2017 - 19:40
नवीन
तूमचा आयडी ह्या़क झालाय का? असले प्रश्न आणी विचार तूमच्या कडून प्रथ्मच पहातो आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 05/06/2017 - 09:04
नवीन
माहितगार,
१.
एकदम सोप्पंय. इथे जा आणि शोधा 'armed forces' कुठे आढळतात का ते : https://en.wikipedia.org/wiki/Human_rights
सापडले तर कळवा.
२.
माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर खरे सेनादलातले असून मानवाधिकारांशी थेट संबंधित नाहीत. अर्थात, तरीही त्यांची मतं ऐकायला आवडतील.
३.
काश्मीर समस्या भारताचा अंतर्गत मामला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दृष्टीकोन इथे लागू पडंत नाही. तसेच काश्मिरात अधिकृतरीत्या युद्ध चालू नाही.
४.
भारताने काश्मिरात टोकदार भूमिका घ्यायलाच हवीये. सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने, पण टोकदार भूमिका घेतल्यानेच पंजाबातला दहशतवाद साफ झाला.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/06/2017 - 09:47
नवीन
हा मुद्दा आपल्या उत्तरातून सुटलेला दिसतोय.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 05/06/2017 - 11:10
नवीन
माहितगार,
सैन्याचा जनतेला उपद्रव होऊ नये हे तत्त्वत: मान्य. पण लोकांचा जर सैन्याला शत्रू समजून प्राणघातक उपद्रव होत असेल तर अशा लोकांना सैन्याचा उपद्रव होणारंच. त्याबद्दल सैन्याकडून मर्यादा पाळण्याची अपेक्षा नको.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
B
bhanudas kadam
Sat, 05/27/2017 - 10:22
नवीन
एक सरधोपट मार्गापेक्षा वेगळा विचार वाचला होता.तो : पाकीस्तान ची अंतरगत व्यव्स्था निकामी आहे लष्कर ,राजकारणी व नागरीक असे ३ गट आहेत ज्यांचयाशी वागायचय.प्रत्येकाचा वेगळा विचार करावा .लष्कराचा कुठेही फायदा होऊ द्यायचा नाही .व आपल्या लष्कराचे अत्याधुनीककीकरण सुरुच ठेवायचे
पाकी राजनेते सध्या लष्कराचे बाहुले आहेत व.लष्कर व राजनेते यांचे मोठमोठे धंदे आहेत .व याच कमजोरी वर घाव घालयचा तोही दीर्घकाळ ..त्यांची निर्यात वीजपुरवठा .गँस
हे सगऴ भारताच्या तुलनेत शुल्लक आहे . सुरुवातीला त्ांचे अवलंबित्व वाढवायचे व नंतर कलटी मारुन तोट्यात घालायचे .नागरीकांचा वेगऴा विचार असा की त्यांच्यातल्या हुशार मुलांना आपल्या सेवेत घेउन महत्वाच्या पोस्टवर ठेवावे म्हऩजे भारतातील संधी व प्रगतीची जाहीरात पाकमध्ये होइल .त्यांच्या नागरीकांना काही अटींसह प्रवेश द्यावा .असे केल्याने काश्मीरच्या अलगाव वाद्यांना व तरुनांना योग्य तो संदेश जाईल . व यासाठी आपल्या अंतरगत काही बदल करावे लागतील .
- Log in or register to post comments
द
दशानन
Sat, 05/27/2017 - 10:36
नवीन
लष्कराचा दणका; ८ दहशतवाद्यांचा खातमा
पाकिस्तानच्या मदतीनं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या 'हिजबुल मुजाहिदीन' या टोळीला भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी आज जोरदार दणका दिला. काश्मीरमधील त्राल येथे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमद ऊर्फ अबू झरार मारला गेला आहे. बुरहान वानीचा साथीदार असलेला सबजार मारला जाणं हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडं, रामपूर सेक्टरमधील घुसखोरीचा डाव उधळून लावत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
सबजार अहमद हा बुरहान वाणी याचा अत्यंत जवळचा साथीदार होता. तो बुरहानसोबतच राहत होता. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते. बुरहान मारला गेल्यानंतर हिजबुलच्या कारवायांची सूत्रं सबजारनं हाती घेतली होती. भटबरोबरच त्याचा आणखी एक साथीदार ठार झाला आहे.
वाह जिओ!!!!
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sat, 05/27/2017 - 18:44
नवीन
+१ उत्तम बातमी.
मानवतावाद्यांना कितीही गळे काढू देत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2