Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...)

च — चतुरंग, गुरुवार, 05/04/2017 - 01:35
सत्यजित भाऊंची उत्तम गजल "ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा" वाचली. एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :) ईर्शाद. अर्थातच आमचा नजराणा.... ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा! मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा? आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा! काय सांगू केवढी असते भयानक भेट ती? ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा! -चतुरंग

प्रतिक्रिया द्या
2678 वाचन

💬 प्रतिसाद (10)
श
शिवोऽहम् गुरुवार, 05/04/2017 - 02:16 नवीन
छानच जमली आहे!
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 05/04/2017 - 04:40 नवीन
स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट केलं रंगाभाऊ ! खतरनाक विडंबन ! :)) पण ते तेरडा आलं तर हिरडा, बेहडा, रोहिडा पण यायलाच पायजेल अशी मागणी नोंदविते =))
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/04/2017 - 07:15 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
व
वेल्लाभट गुरुवार, 05/04/2017 - 06:43 नवीन
नाही रे! नाही !
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या गुरुवार, 05/04/2017 - 07:21 नवीन
आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा!
=))
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 05/04/2017 - 08:20 नवीन
क ह र !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/04/2017 - 14:47 नवीन
@मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा? ››› =)) वारल्या गेलो आहे! =))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 05/04/2017 - 16:12 नवीन
वाह!..Image removed.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 05/04/2017 - 20:00 नवीन
कहर ,लोल
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Fri, 05/05/2017 - 12:46 नवीन
ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... जर जमल तर घर सार नीट आवरा जुळल कि यमक :P
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा