Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संध्याराणी

श — शार्दुल_हातोळकर, Sat, 05/06/2017 - 10:56
निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती गतिमान परि काळाची अविरत धावती चाके सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके संध्येची बनली रजनी उधळीत तमाच्या लाटा क्षितिजाला येता किरणे उजळुन निघाल्या वाटा हळुवार पुन्हा वेलीला कलिकांची कोंबे फुटली रुसलेली अवघी सृष्टी जोमात नव्याने नटली मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही ही ऐसी करुण कहाणी कित्येक नशीबी असते रुसवुन मनांना साऱ्या ती नियती पुन्हा हसते - शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
6456 वाचन

💬 प्रतिसाद (24)
अ
अभ्या.. Sat, 05/06/2017 - 11:00 नवीन
शार्दूलपंत, मिपाचे 'बालकवि' असे आपणास म्हणावेसे वाटू लागले आहे. ठोमर्‍यांची प्रतिभा २०१७ मध्येही जिवंत आहे म्हणा की
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Sat, 05/06/2017 - 16:09 नवीन
सहमत. अप्रतिम रचना. मान गाये उस्ताद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शार्दुल_हातोळकर Sat, 05/06/2017 - 19:45 नवीन
अभिजीतदादा, आपण खुप मोठ्या मनाने कौतुक केलेत, खरोखर धन्य वाटले !! बालकवींची उंची गाठणे अगदी अशक्य आहे..... माझा आपला साधासा प्रयत्न.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा Sat, 05/06/2017 - 12:18 नवीन
सुंदर लिहिलीय कविता!
  • Log in or register to post comments
म
मितान Sat, 05/06/2017 - 13:51 नवीन
छान कविता ! ते 'हर्षाचे सजती पताके' थोडं अडकत आहे ! ते दुरुस्त करता आलं तर ब्येष्ट होईल बघा !
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 05/06/2017 - 17:30 नवीन
तरल, भावविभोर ' संध्याराणी ' ! कवीराज तूमच्या काव्यप्रतिभेला मानाचा मूजरा !! कविता खूप काही सांगून जाते अन् शेवटच्या दोन ओळी विचार करायला अक्षरशः भाग पाडतात ...!!!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 05/06/2017 - 19:49 नवीन
धन्यवाद पैसाताई, मितानजी आणि गौरी! मितानजी, आपण सुचवलेली सुधारणा अगदी योग्य आहे..... मलासुद्धा तसेच वाटत होते.... साहित्य संपादकांना एक विनंती.... कृपया "सारुन पुन्हा तिमिराला हर्षाचे सजती पताके" याच्याऐवजी "सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके" असे संपादित करता येईल का?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 05/07/2017 - 02:06 नवीन
अतिशय सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sun, 05/07/2017 - 02:49 नवीन
>>>पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या>>> ग्रेस इफेक्ट?? मला तर तोच जाणवतो आहे नक्की!(वै.म.) वाचता-वाचताच 'पाऊस कधीचा पडतो,झाडांची हलती पाने' आठवलं!आणि ऐकतंच प्रतिसाद लिहितो आहे! कविता पुढेही वाचत गेलो,पण सांज-रात्रीच्या त्या अगम्य-रम्य गूढतेतच जीव गुंतुन पडला आहे!पुढचा प्रकाशाचा शोध म्हणजे उद्विग्न मनाची समजूत फक्त! कविता इथेच थांबली असती तर ती रम्य गूढता कायम ठेवून कमालीच्या ताकदीची आणि कितीतरी 'मोहक' राहिली असती!बरोबर! एखाद्या पडद्याआड थांबलेल्या सुंदरीप्रमाणे!(ये जो चिल्मन है,आठवतंय!) पुढच्या भागासही (जरा कमी-अधिक करुन) अश्याच एखाद्या रम्य कवितेत ढाळणेही आपणांस सहज वाटते! अर्थातच,ही सगळी माझी वैयक्तीक मतं आहेत! (पण केवळ कवितेबद्दल कविता म्हणून नाही!) अभिनंदन!पुलेशु!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/07/2017 - 05:31 नवीन
शार्दूल, अभिनंदन !
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 05/07/2017 - 16:36 नवीन
धन्यवाद पद्मावती, संजयजी, सत्यजीत !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/07/2017 - 19:58 नवीन
@शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही ››› सलाम घ्या हो मालक! @ही ऐसी करुण कहाणी कित्येक नशीबी असते रुसवुन मनांना साऱ्या ती नियती पुन्हा हसते ››› __/\__
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/09/2017 - 09:16 नवीन
फारच सुरेख, अतिशय आवडली कविता. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Tue, 05/09/2017 - 10:30 नवीन
अप्रतिम.. मनाला भिडणारी कविता... प्रसंग अगदी जिवंत उभा केलात.. मी मागे विनंती केल्याप्रमाणे आपली पुढील कविता महाराष्ट्रावर असेल अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 05/09/2017 - 12:18 नवीन
सुंदर लिहीलीये कविता.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 05/09/2017 - 19:59 नवीन
गुरुजी, पैजारबुवा, देशप्रेमी, किसनजी मनापासुन धन्यवाद. @देशप्रेमी - आपण आणि इतरही काही मिपाकर मंडळींनी सुचविल्याप्रमाणे मी नक्कीच महाराष्ट्रावरची कविता लिहुन पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन....
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 05/11/2017 - 15:06 नवीन
किती सुरेख! पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 05/12/2017 - 18:16 नवीन
खूप छान, मस्त जमून आलीये!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 05/13/2017 - 09:45 नवीन
धन्यवाद प्राचीजी आणि प्रसाद !!
  • Log in or register to post comments
अ
अनिंदिता Wed, 05/17/2017 - 11:58 नवीन
खूपच सुरेख !!! २०१७ मध्येहि बालकवींची प्रतिभा जिवंत आहे , सहमत आहे मी या मताशी .
  • Log in or register to post comments
म
मुरारबाजी Fri, 05/19/2017 - 13:57 नवीन
मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही खरच कविता भिडतय थेट मनाला _/\_
  • Log in or register to post comments
म
मुरारबाजी Fri, 05/19/2017 - 13:58 नवीन
मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही खरच कविता भिडतीय थेट मनाला _/\_
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 06/14/2017 - 19:29 नवीन
कविता खूप आवडली! :-)
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 06/15/2017 - 20:17 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद अनिंदिता, मुरारबाजी, राघवजी !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा