Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जीवन एक अर्थ!

ज — ज्योति अळवणी, Mon, 05/08/2017 - 06:25
आयुष्य अर्ध संपलं तरी जगण्यातला अर्थ संपला नाही खूप जगले म्हंटल तरी जगण्यातला मोह संपला नाही खूप काही बाकी आहे जगून सारंच घ्यावं ... वाटत एकटं... दुकटं... सर्वांबरोबर... आयुष्य वाटून घ्यावं... वाटत! जवानी मनाची अवस्था आहे तिला पूर्ण भोगावं वाटत! समाज... बंधन... झुगारून देऊन मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!! मात्र स्वप्नातून जाग येताच आयुष्याचं वास्तव पुढे असतं जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं.. विसरून कामाला लागावं लागत!!!

प्रतिक्रिया द्या
1616 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
ज्योति अळवणी Mon, 05/08/2017 - 06:26 नवीन
नमस्कार, गेले दोन महिने थोडी busy होते त्यामुळे मिपा वर येऊ शकले नही. क्षमस्व!पण आता परत वाचक म्हणून आणि जमेल तसं लेखन करण्यासाठी रुजू होते आहे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 05/08/2017 - 06:55 नवीन
वाह.., मस्तच ! फक्त वाटत, लागत यातल्या 'त'वर अनुस्वार द्या. वाटतं, लागतं !
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 05/09/2017 - 06:37 नवीन
धन्यवाद! नक्की लक्षात ठेवेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
पद्मावति Mon, 05/08/2017 - 10:54 नवीन
वाह..आवडले.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Mon, 05/08/2017 - 15:40 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/08/2017 - 19:31 नवीन
योगायोगाने आज बा सी मर्ढेकरांची ही कविता आठवत होती. शिशिरर्तुच्या पुनरागमें, एकेक पान गळावया कां लागता मज येतसे न कळे उगाच रडावया. पानांत जीं निजलीं इथे इवलीं सुकोमल पाखरें, जातील सांग अता कुठे? निष्पर्ण झाडिंत कांपरे !
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 05/09/2017 - 06:22 नवीन
धन्यवाद. ही खूप मोठी कंमेन्ट आहे माझ्या कवितेसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा