Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काळाचे गीत

च — चांदणे संदीप, Tue, 05/09/2017 - 07:15
तूहि नव्हतीस, मीही नव्हतो बघ काळ कसा बदलतो तारे ते जे सदाच असती आपल्या जागी नभात वरती आज मोजण्या जागे कोणी मनात अन् मोगरे माळूनि फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या चर्चा साऱ्या गावकुसाच्या कशी न कळली तू गेलेली नियती अशी उलटलेली पुन्हा भेटलीस का वळणावर? घेऊन कुंकू परके, भांगावर उभय उरातहि ते काही आधीसारखे हलले नाही         तूहि नव्हतीस मीही नव्हतो         पुरते आपण अनोळखी होतो         तू आहेस अन आज मीही         समोरासमोर अगदी, तरीही         त्याच्या हाती सर्व आहे         बघ काळ बदलला आहे         आता यातून व्हावे काय?         आयुष्य प्रवाही, वाहत जाय               नसशील तू अन् मीही यापुढे               नसेल चिंता अगम्य अन् कोडे               फक्त काळ तो एक नव्याने               घडवील नाट्य कळाकळाने               फुलतील काही, काही तुटतील               त्यातलेच काही हे गुणगुणतील               गीत अधुऱ्या आपुल्या वचनांचे               निष्ठुर नियती अन् काळाचे! - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
2246 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रचेतस गुरुवार, 05/11/2017 - 10:55 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 05/11/2017 - 10:56 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/11/2017 - 11:02 नवीन
मस्त जमलीय सॅन्डीबाबा. आवडले एकदम
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Sun, 05/14/2017 - 16:05 नवीन
कशी न कळली तू गेलेली नियती अशी उलटलेली पुन्हा भेटलीस का वळणावर? घेऊन कुंकू परके, भांगावर उभय उरातहि ते काही आधीसारखे हलले नाही >>>>१९८०:९० स्टोरी टाईप वाटले हे वाचताना प्रेमकाव्य आवडली आहे ....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा