प्रेमाचं गणित
तुझं शंकुसारखं धारदार नाक
शुभ्रवर्णी दंतमाला
अन हसल्यावर उमटणारा
गालावरचा पॅराबोला
इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे
लिमिटबद्ध लांबसडक केस
डोळ्यांमधले कूटप्रश्न अन
देहबोलीचे अॅनालॉग संदेश
तू मॉडमध्ये टाकल्यासारखी
नेहमी पॉझिटिव्ह असायची
अपुर्णांक होतो मी
वजाबाकीच फक्त जमायची
तू आयुष्यात आलीस अन मला
शुन्याचा शोध लागला
जगण्याचा भाव माझा
दसपटींनी वाढला
माझ्या खिशातल्या पाकिटाचं
व्हॉल्यूम तू कधी पाहिलं नाहीस
तुझ्या नातेवाईकांच्या स्वभावाचं
घनफळ मी मोजलं नाही
माझे प्रश्नचिन्ह तू वाचलेस
तुझे स्वल्पविराम मी वेचत गेलो
वेगवेगळी समिकरणं होतो आधी
एकत्र आलो अन सुटत गेलो
------------------------------------------
💬 प्रतिसाद
(5)
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/11/2017 - 09:03
नवीन
भारी
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/11/2017 - 09:12
नवीन
एकदम wow कविता!!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 05/11/2017 - 09:15
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे
Fri, 05/12/2017 - 00:26
नवीन
कविता छान!
हे कुठल्या संगणकीय भाषेसंदर्भात आहे का?
:)
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Tue, 05/16/2017 - 05:38
नवीन
तू आयुष्यात आलीस अन मला
शुन्याचा शोध लागला
जगण्याचा भाव माझा
दसपटींनी वाढला
मस्त आवडलं खूप हे कडवं
- Log in or register to post comments