Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

स — सत्यजित..., Wed, 05/10/2017 - 20:40
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
3890 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सत्यजित... Wed, 05/10/2017 - 20:44 नवीन
गझलेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणारांसाठी... गझलेचा प्रत्येक शेर,हा एक स्वतंत्र कविताच असतो! कोणताही शेर वेगळा करुन वाचला तरीही त्यातून पूर्ण अर्थ लागतो! सर्व शेरांत साधारणतः एकच विषय हाताळला जातो,ती 'मुसलसल' गझल,तर प्रत्येक शेरांत वेगळ्या विषयावर भाष्य केले असेल,ती 'गैरमुसलसल' गझल! त्यामुळे गझल वाचत/ऐकत असताना (विशेषतः गैरमुसलसल),रसिकाने पहिल्या शेरांतून स्वतःच्या मनाची सोडवणूक करुन पुढील शेराच्या विचारात नव्याने गुंतणे अपेक्षित असते!
  • Log in or register to post comments
श
शिवोऽहम् गुरुवार, 05/11/2017 - 00:57 नवीन
जिच्या सर्व शेरांत एकच विषय हाताळलेला असतो अशा गझलला 'नज्म' म्हणतात ना? की नज्म म्हणजेच मुसलसल गझल, किंवा इतर प्रकार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
श
शिवोऽहम् गुरुवार, 05/11/2017 - 01:04 नवीन
गोंधळ काहीसा दूर झाला हे वाचून (https://www.quora.com/Poetry-What-is-the-difference-among-Ghazal-Nazm-Sher-Doha-Rekhti-Marsiya-and-Rubai). फैझ़च्या अनेक प्रसिद्ध कविता या नज्म़ आहेत हे रेख्तावर पाहिले (https://rekhta.org/poets/faiz-ahmad-faiz/nazms)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवोऽहम्
व
वेल्लाभट गुरुवार, 05/11/2017 - 08:03 नवीन
काय एक से एक पोतडीतून बाहेर काढताय राव !
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
जबर.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 05/12/2017 - 00:24 नवीन
आपली दाद सतत लेखनास प्रोत्साहीत करते!खूप धन्यवाद अपूर्वजी! मला स्वतःलाही हाच शेर अधिक भावला होता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
च
चिनार गुरुवार, 05/11/2017 - 08:17 नवीन
जबरा!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 05/11/2017 - 09:16 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 05/11/2017 - 16:50 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Fri, 05/12/2017 - 00:43 नवीन
कविता आवडली पण ह्या ओळी अजिबात कळल्या नाहीत -
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 05/24/2017 - 23:20 नवीन
राळ एक सुगंधी द्रव्य आहे,जे जाळले असता सुगंध दरवळतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा