Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कसे या मनाला कसे जोजवावे?

स — सत्यजित..., Fri, 05/12/2017 - 00:15
कसे या मनाला कसे जोजवावे? जरा दुःखही शांत व्हावे,निजावे! कुठे भागते आपलेही खरेतर? सुखांनी सुखांना कितीदा गुणावे! किनारा कधी सांगतो का कुणाला? किती सागराने दिले हेलकावे! कधी ओल जाते कधी ऊल जाते कळेना कसे या मनाला चिणावे! तिचे ओठ देतील तपशील नंतर मुक्याने तिने जर तुला बोलवावे! विसरणे तसे फार असतेच अवघड उगां एकमेकां कधी गुणगुणावे! (असे या मनाला,असे जोजवावे!) —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
2210 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
संजय क्षीरसागर Fri, 05/12/2017 - 08:11 नवीन
कधी ऊल जाते म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
J
Jabberwocky Sun, 05/14/2017 - 19:01 नवीन
खूप छान कविता करता तुम्ही.....
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 05/15/2017 - 01:18 नवीन
धन्यवाद संजयजी! ऊल जाणे=भेगाळणे/तडा जाणे jabberwocky धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/15/2017 - 12:49 नवीन
शब्दप्रयोग छाने . थंडीत आपण अंग `उललं' म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा