Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द. ..

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 05/15/2017 - 17:58
सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात दूर दूर रानात एकटे पळून जातात.. मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं पटकन फांदि न मिळणाय्रा.. प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा. पण ते गेले एकदा,की जातातच. पुन्हा परत भेटेपर्यंत! शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ. हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय असं वाटेपर्यंत... ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात. मी म्हणतो त्यांना "साल्यांनो, या की लवकर माझ्या गळाभेटीला? का असे दुष्टपणे बघता माझ्याकडे.. लांबून.. अगंतूकासारखे? " ते ही मग खट्याळपणे उत्तरतात... "अरे गाढवा!, जीवनापासून पळून जाऊ नकोस लांब लांब.. मग आंम्ही तुझ्या बरोबरच राहू सदैव.. कारण , जीवन हाच आमचा प्राण आहे.. आणी सहजता हा श्वास.. " मी ही समजलो मग... हा उन पावसाचा खेळ आहे... चालायचा असाच! शब्दांना आनंदाने बाय बाय केले.. म्हटलं. .., "हवे तेंव्हा या.. तुम्ही जसे माझे तसा मीही तुमचाच आहे" हसून निघून गेले ते . जाताना मात्र म्हणाले एव्हढेच... "आठवण आली आमची तर हाक मार हं आंम्हाला! लाजू नकोस!" ================== अतृप्त. .

प्रतिक्रिया द्या
4086 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पद्मावति Mon, 05/15/2017 - 18:09 नवीन
:) छान लिहिलंय. आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/15/2017 - 18:15 नवीन
छान लिहिलंत अत्रुप्त. बाकी तुमच्या शब्दांनी तुम्हास पहिल्याइतकीच साथ द्यावी आणि अशाच उत्तमोत्तम कविता तुमच्या लेखणीद्वारे याव्यात.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/15/2017 - 19:14 नवीन
वा. बरेचं दिवसांनी आज?
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 05/15/2017 - 19:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/16/2017 - 02:03 नवीन
साथ, बाइबाइ काढा. "आठवण आली अमची तर हाक मार हं अम्हाला! लाजू नकोस!" असं येऊ द्या.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/16/2017 - 06:09 नवीन
वा, बुवा!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 06:14 नवीन
कविता दवणिय झाली आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/16/2017 - 09:02 नवीन
प्रती साद आ दरणीय जाहला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
श
शार्दुल_हातोळकर Tue, 05/16/2017 - 07:48 नवीन
मस्तच हो गुरुजी.... :-)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/16/2017 - 10:53 नवीन
बुवांच्या मैतराची प्रतिक्रिया येत नाय तोवर मजा नाय. त्याच्या प्रतिसादाशिवाय कविता म्हणजे चीजशिवाय पावभाजी.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/16/2017 - 14:02 नवीन
सर्वांसी धन्यवादम्. :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 05/16/2017 - 15:47 नवीन
थोडक्यात ककाय बुवाची प्रतिभा तुंबली आहे, पाटणकर काढा घ्या अवांतर : कविता अवडली
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 17:42 नवीन
पावभाजीत चीज पडलं हो या कवितेचं सार्थक घडलं हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा