Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ती पहा पडली गझल...

स — सत्यजित..., Mon, 05/15/2017 - 20:29
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू... जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
6804 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विनिता००२ Tue, 05/16/2017 - 06:45 नवीन
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी >>> लोल भारीये :)
  • Log in or register to post comments
स
सानझरी Tue, 05/16/2017 - 07:39 नवीन
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय लिहीलंय.. वाह्..
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/16/2017 - 08:34 नवीन
..लाच देल्यासारखी
इथे जरा गडबड झालीय. काही शेर आवडले, काही गडबडले.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 05/18/2017 - 06:42 नवीन
सहमत ! शेवटचे दोन्ही शेर आवडले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्पा Tue, 05/16/2017 - 09:28 नवीन
बुवाचे लक्ष गेले कसे नाही अजुन, कडक कच्चा माल आहे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/16/2017 - 10:18 नवीन
माझं लक्ष काय??? हे असलं हवं तुला इकडे यायला.. अं Ssssssss ? हरामखोर पांडू, तूच मार की दांडू! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/16/2017 - 10:21 नवीन
लिहित राहा. आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/16/2017 - 18:14 नवीन
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!
आवडला.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/16/2017 - 18:36 नवीन
तुम्ही गझलेव्यतिरिक्त अजून काही लिहायला पाहिजे असे ही गझल वाचून वाटले.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 05/17/2017 - 23:23 नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद! गझलेची एक व्याख्या अशीही केली जाते की,डोक्यात शिरण्याआधीच काळजात घुसते,ती गझल!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Fri, 06/23/2017 - 14:57 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा