Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(दे कुटाणे सोडुनी...)

ख — खेडूत, Tue, 05/16/2017 - 15:12
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या' मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया ! एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको ***** पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी मैत्रिणी वर्गातल्या त्या झाल्या आताशा काकवा पोरे तयांची येऊनि तुज मामा म्हणाया लागली 'पास झाला' ऐकण्या हे आई तुझी आसुसली 'वायडी' होऊ नये ही प्रार्थना मम ओठांवरी आखरी संधी तुला मी देईन या सेमिस्टरी दे कुटाणे सोडुनी अन लाज आता बाळगी ... सुमडीत

प्रतिक्रिया द्या
5220 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ट
टवाळ कार्टा Tue, 05/16/2017 - 15:45 नवीन
M3 चा उल्लेख नसल्याने फाउल धरण्यात येत आहे बाकी कुटणे झकासच ;)
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 05/17/2017 - 08:04 नवीन
:) या एम-३ मुळेच सात वर्षे रखडलेला वर्गातला एकजण डोळ्यासमोर होता. त्याच्याइतक्या वेळा कुणीही एम-३ ला बसलेले पाहिले नाही (९ वेळा). पण त्याचं काही बिघडलं नाही हे वेगळं! इथे एका कंपनीत हेड्ड असलेला गेली १५ वर्षे तिकडं अमेरिकेत सायबाचं शेपूट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/17/2017 - 08:25 नवीन
७ वर्षे रखडला आणि काही बिघडले नाही कसे म्हणता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ख
खेडूत Wed, 05/17/2017 - 08:48 नवीन
डिप्लोमाच्या आधारावर नोकरी सुरूच होती- (आमची सगळ्यांचीच. ) इथे तो कंपनीचा प्रमुख असला तरी लक्ष्य सगळे अमेरिकेत कधी जातोय याकडे होते, पण बी ई पूर्ण झाल्याशिवाय जाता येत नव्हते! :) शेवटी आमच्यानंतर पाच वर्षांनी झाला एकदाचा. पण नेटवर्किंग मधे बॉस होता...जाताना १० वर्षे अनुभव घेऊन गेला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Tue, 05/16/2017 - 16:07 नवीन
विंजिनिअरानी होतकरू विंजिनिअरांसाठी लिहिलेली कविता! अंमळ करुण रसातही आहे. :D
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/16/2017 - 17:09 नवीन
_/\_ बाकी विंजिनेरांना विंजिनेरिंग सोडून बाकी सगळं येत असतं असं ऑब्झर्व्हेशन आहे. खरं हाय का नाय? ;-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/16/2017 - 18:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Wed, 05/17/2017 - 03:33 नवीन
समस्त विंजीनेर णिशेद करतील बरं तुमचा अश्याने. Lol
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/17/2017 - 03:38 नवीन
वा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/17/2017 - 05:48 नवीन
जब्रा रचना..! आवडली. अता अन्य कवींकडे लक्ष्य द्यावे असे सुचवितो. (उगा या कवींना वाटायचं आपल्याला लक्ष्य करतायत.) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा