Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वादळ उगा निमाले..

र — राघव, Wed, 05/17/2017 - 18:43
छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा.. कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते! जागून शब्द गेले..लिंपून आस गेली.. ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते.. आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे.. जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते? वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी.. आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..! -- माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे.. पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते?? राघव

प्रतिक्रिया द्या
2166 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/17/2017 - 19:38 नवीन
सुपर्ब!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 05/17/2017 - 19:42 नवीन
चांगली आहे कविता.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 05/18/2017 - 10:16 नवीन
मस्त.... याचे रसग्रहण कोणीतरी करायला पाहिजे....
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/19/2017 - 16:27 नवीन
बाप रे! रसग्रहण!! अहो, शब्द जड आहेत हे मान्य आहे मला! ;-) जोक्स अपार्ट, थोडा मोडका अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतो - कधी-कधी, आपण एखादा निर्णय का घेतो, एखादी गोष्ट का करतो ते कदाचित पूर्ण माहित नसते. आपल्याच निर्णयाचे संदर्भ आपण माहिती करून घेत नाही. त्यामुळे त्यातून काय अपेक्षा असायला हव्यात तेही नीटसे आपल्यालाच उमजत नाही. त्यातून येणारं नैराश्य हे मुळात कारण माहित नसल्यानं येत असतं. अशा नैराश्याचं हे वर्णन आहे; ज्याला खरंतर आपण मुळातच टाळू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पुंबा Fri, 05/19/2017 - 06:45 नवीन
फार सुंदर..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/19/2017 - 19:23 नवीन
सुरेख लिहिलेस. कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 05/20/2017 - 06:47 नवीन
खूप छान! आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 05/20/2017 - 20:15 नवीन
तुम्हा सगळ्यांचे प्रतीसाद वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा