भारतात रेल्वेने प्रवास करताना काय काळजी घ्यावी?
आमचे एक नातेवाईक रेल्वे ने प्रवास करत होते. रात्री ३.३० वाजता कोणीतरी डब्याची चेन खेचली आणि रेल्वे थांबवली. आमच्या नातेवाईक खिडकीजवळ होत्या आणि जवळच त्यांची पर्स होती. एका चोराने बाहेरून पर्स ओढण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत पर्स चा बंद तुटला आणि तो पळाला.
तुमच्या जवळ काही रेल्वेने प्रवास करताना उपयोगी येतील अशा सेफ्टी टिप्स आहेत का? अशा टिप्स ची एक लिस्ट बनवून वॉट्सअप वर फॉरवर्ड केली तर लोकांचा फायदा होईल.
धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(70)
स
सचिन काळे
गुरुवार, 05/25/2017 - 14:49
नवीन
*lol*
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/25/2017 - 19:43
नवीन
हात टाकेपर्यंत प्रॉब्लेम नव्हता?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 05/26/2017 - 04:31
नवीन
ते प्लेटोनिक का काय म्हणतात ना...
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 05/26/2017 - 15:16
नवीन
A play for him and a tonic for her...
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 05/29/2017 - 07:42
नवीन
गोव्यावरून...?
हम्म्म्म..
(ह. घ्या. हो..)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 05/25/2017 - 15:10
नवीन
भारतीय रेल ही जगातील सर्वात स्वस्त प्रवास व्यवस्था आहे याचा अभिमान बाळगणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पण ती निर्णय घेण्यात फार मागे आहे त्यामुळे
अपघात झाला तर पटापट निर्णय व्यवस्था रेल्वेकडे आजतरी नसावी असे वाटण्यास॑ वाव आहे. आपली गाडी इतका वेळ का एकाच जागी उभी आहे यासंबंधी निवेदन
ड्रायव्हर व गार्डने स्पीकर द्वारे करण्याची सोय असलीच पाहिजे. या बद्द्ल आग्रह सर्वानीच धरावा. आपली प्रचंड व अनावश्यक लोकसंख्या म्हण्जे आपले भांडवल ही कल्पना खुळचट आहे तर ती एक मोठी समस्या आहे हे ज्यावेळी आपल्याला सगळ्याना उमगेल तेंव्हा " जितक्या सीटस तितकेच प्रवासी " हे आपले स्वप्न पूर्ण होईल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/25/2017 - 19:45
नवीन
हे आपले नाही...इथे व्यापार करायला येणार्या कंपन्यांसाठी ग्राहक नावाचे भांडवल आहे
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/25/2017 - 19:59
नवीन
ही एव्हढी सोय झाली तर "दादर रत्नागिरी" आणि "दिवा सावंतवाडी" या दोन गाड्यांचे प्रवाशी दुवा देतील.
संपुर्ण भारतीय रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांपैकी या दोन गाड्यांइतकी दुसरी कोणती गाडी सायडींगला ताटकळत नसेल.
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Fri, 05/26/2017 - 09:22
नवीन
राज्यराणीक कसे इसरलात.... दिवा आनी रत्नागीरीच्या पाठोपाठ लूप लायनीर उभ्या रवाचो मान राज्यराणीचो सुधा आसा, पन रात्रीच्या काळोखात इतक्या कळान येना नाय, न्हीजेचो टायम असता ना...
बाकी २३ तारखेच्या तेजस एक्सप्रेस ने कुडाळ ते ठाणे प्रवास केला. ह्यापुर्वी कधी विमानाने प्रवास केला नसल्याने तेजस चा अनुभव खुपच छान होता. असं वाटलं की कोकण रेल्वे कात टाकतेय.... नम्र पेंट्री स्टाफ़, तत्पर हाउसकीपींग, सगळ कस्स छान होतं. एसी ची कुलींग देखील मस्त होती. काही लोक तर शॉल गुंडाळुन बसले होते. माझ्या मते रेल्वे ने आपला रोल बरोबर प्ले केला.
प्रवशानी मात्र जरा सुमार प्रतीसाद दीला. हेडफ़ोन घेउन जाणे, स्क्रीन काढायचा प्रयत्न करणे. वैगरे ...
माझ्या मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाने तर जेवणाच्या प्लेट मध्ये हात धुतले. . त्याचे ओघळ माझ्या सीट खाली आले. त्याला हटकल्यावर म्हणतो कसा "गलास ता .... लवांडला"
ते बघुन माझे डोळे पाणावले.
माझ्या डब्ब्यात अट्टेंडंट ने स्वता हेड्फ़ोन गोळा केले. मला वाटतं की प्रवाशानी थोडे सहकार्य केले पाहीजे.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 05/26/2017 - 14:30
नवीन
छान लिहिलय . "नाहितर हिर नाय मोडत ? " ची आठवण झाली .
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Fri, 05/26/2017 - 16:45
नवीन
मस्त किस्सा !!!
LOL
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 05/26/2017 - 17:44
नवीन
राज्यराणी एक्स्प्रेस आहे तर "दादर रत्नागिरी" आणि "दिवा सावंतवाडी" प्यासेंजर. ;)
तसं रखडने नशिबात असेल तर मांडवी सुद्धा रखडते. :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 05/26/2017 - 18:04
नवीन
शिरां पडो, थोड्या अती शहाण्यांनी एलईडी उचकाटून काढून बॅगांत भरल्यांनी होते खंय. रेल्वे ऑफिसर वेळेवर तिथे पोचले म्हणान ते गावले.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/25/2017 - 19:23
नवीन
झुक झुक झुक झुक अगिन गाडी हे गाणं गाउ नये.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/25/2017 - 20:02
नवीन
गाडीमधले हेडफोन (असल्यास) चोरू नयेत. एलसीडीची (असल्यास) तोडफोड करु नये.
- Log in or register to post comments
अ
अजित खोडके
Sat, 05/27/2017 - 21:00
नवीन
लोहपथयान विरामावस्थेत असताना वातायन बंद करावेत..
- Log in or register to post comments
A
AVINASH PAI
Tue, 05/30/2017 - 04:50
नवीन
किस्सा एकदम छान सांगितलात!
पु. ल. चा `नाहीतर हीर नाही मोडणार`ची आठवण झाली!
- Log in or register to post comments
च
चिकित्सक
Wed, 06/21/2017 - 17:52
नवीन
chinmay.deshpande@db.com
१. गाडीत चढण्या च्या अगोदर किमान २-३ तास आधी पासून तिचा आणि त्या रूट च्या अन्य काही गाड्यांचा स्टेट्स ट्रेक करावा , आजकाल मोबाइल एप मुळे हे सहज शक्य आहे , तुमचा वेळ वाचेल त्याच्या उपयोग तुम्ही अन्य काही कामात करू शकता |
२. लांबचा प्रवास असेल तर सोबत २०००० एमएच चे शक्ति संच (power bank) ठेवा तुमच्या बर्थ च्या ठिकाणी सॉकेट असेलच अस नाही , सोबत थ्रीपीन चे अडॅप्टर आणि किमान ३ यूएसबी स्लॉट असलेल क्वालकॉम मोबाइल चारजर ठेवा, प्रवासात मोबाइल ची बॅटरी लवकर संपते वर चारजर लावण्या वरुन सहप्रवासी भांडण करतात |
३. ट्रेन च्या सॉकेट वर लॅपटॉप चालवू नये |
४. सामान आणि लगेज बांधण्या करिता चेन व लॉक घेऊन चला , झाशी, भुसावळ ,कटनी, मनमाड, बैतूल, ईटारसी , कानपुर दिल्ली आणि वाराणसी सारखे स्थानक चोरी चकारि साठी कुप्रसिद्ध आहेत | सोबत खाण्या- पिण्या च्या सामानाचा स्टॉक पुरेसा ठेवा, रेल्वी स्टेशन वरच्या वस्तूंचा क्वालिटी चा नेम नसतो |
५. सोबत चिल्लर ठेवावी , पाणी किंवा खाद्य पडार्थ विकत घेताना समस्या जाणवात नाहीत |
६. स्पेशल ट्रेन्स् मध्ये प्रवास संपल्या वर कोच अठटेन्डेण्ट ची टिप अपेक्षा असते , २-५ रुपये फार झालेत | साधारण गाड्या आणि स्लिपर कोच मध्ये हिजड्या पासून पिच्छा सोडवण्या करिता चिल्लर उपयोगी पडतात |
७. पेपर मॅगज़ीन स्टेशन वरुनच घ्यावा , गाडीत येणार्या विकरेत्या कडून पेपर - पुस्तके घेऊ नयेत , छापिल किंमत हून अधिक किमतीत ही लोक पेपर विकतात , पुस्तके सुद्धा पाइरेटेड आणि खराब प्रिंटिंग चे असतात|
८. कुणी बर्थ बदलण्यास विचारले तर आधी खात्री करून घ्यावी की त्यांचा बर्थ संडासा जवळ चा , मिडील किंवा साइड वाला नसावा | बर्थ बदलण्याची इच्छा नसेल तर अजिबात त्यांच्या विनवण्याचे दडपण घ्यायचे नाही |
९. जवळ इयरफोन्स हमखास बळगा , तुमच्या फोन वर बोलण्या मुळे किंवा फोनवर गाणी एकल्या आणि वीडियो बघितल्या मुळे अन्य प्रवाशांना असुविधा होऊ शकते |
१०. लहान मुल असल्यास त्यांच्या करिता डाइपर इत्यादी वस्तू आणि त्यांना एन्गेज ठेवण्या साठी खेळणी , पुस्तके जवळ ठेवावित , कंटाळलेली मुले बाळे हैराण करून सोडतात , कित्येक आई- बाप मुलांच्या तब्येती कडे लक्ष देत नाहीत आणि ते कॉरिडर व कामन स्पेस मध्ये ओकतात
११. कॉलेज च्या पोरं बरोबर तसेच अप डाउनर्स बरोबर पन्गे घेऊ नका |
१२. शयनयानातील ब्लॅंकेट अंगावर घेऊ नका , ती क्वचितच धुतल्या जातात व त्यामुळे ते धूलि नि भरलेले असतात , ते बर्थ वर पसरवून त्या वर चादर टाकून मगच वापरावे |
- Log in or register to post comments
प
परिंदा
गुरुवार, 06/22/2017 - 14:28
नवीन
८. कुणी बर्थ बदलण्यास विचारले तर आधी खात्री करून घ्यावी की त्यांचा बर्थ संडासा जवळ चा , मिडील किंवा साइड वाला नसावा | बर्थ बदलण्याची इच्छा नसेल तर अजिबात त्यांच्या विनवण्याचे दडपण घ्यायचे नाही |
>>>
जर का सीट बदलायचीच असेल, त्या प्रवाशांचे तिकीट कुठपर्यंत आहे ते तपासा.
एकदा हैद्राबाद ते मुंबई प्रवास करताना एका कुटुंबाने मला जागा बदलून देण्यासाठी विनवले, त्यांनी सांगितले की त्यांचे तिकीट मुंबईपर्यंत आहे. मी पण त्यांच्या बोलण्यावर भरवसा ठेऊन सीट बदलून दिली. मध्यरात्री गाढ झोपेत असताना, पुण्याला त्या सीटचा खरा मालक चढला आणि मला अर्ध्या झोपेतून उठून सामान घेऊन पुन्हा माझ्या मुळच्या सीट्वर यावे लागले. ज्यांना मी सीट बदलून दिली, त्यांचे आरक्षण फक्त पुण्यापर्यंतच होते, त्यामुळे पुण्याला ती सीट दुसर्या प्रवाशाला दिली गेली.
- Log in or register to post comments
प
परिंदा
गुरुवार, 06/22/2017 - 14:33
नवीन
१) जर घरून जेवण, नाश्त्याचे पदार्थ नेत असाल तर डिस्पोसेबल डिशेस, टिश्यू पेपर सोबत न्या.
२) अनोळखी प्रवाशांकडून कोणताही पदार्थ खायला घेऊ नका.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2