Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हळद

म — माधुरी विनायक, Fri, 05/26/2017 - 08:39
सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद, तिला मात्र जखमी करून जाते... आजही ती कोणाच्या हळदीला जायचं अट्टाहासाने टाळते... जखमेवर हळद भरायची म्हटलं की तिचे डोळे येतात भरून... आजही.. हरितालिका पुजताना, वटपौर्णिमेला मागणं मागताना, कातर होते ती... अंगाला लागलेली हळद कोणाची.. कळेनासं होतं.. वेडावून जाते ती.. त्याने विनोद पाठवला जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते तिचे डोळे भरून आले... हळदीच्या विनोदानेच जखमेवरची खपली काढली... हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....

प्रतिक्रिया द्या
1793 वाचन

💬 प्रतिसाद (5)
च
चांदणे संदीप Fri, 05/26/2017 - 10:15 नवीन
सावन जो अगन लगाये.... वगैरे आठवलं! Sandy
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/26/2017 - 13:47 नवीन
मुंगी वरची कविता आवडली (मुंगळा) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/27/2017 - 08:59 नवीन
पहिल्या चार ओळी आणि नंतरच्या चार ओळी खासच. आवडली कविता. लिखते रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sun, 05/28/2017 - 15:24 नवीन
खूप सुंंदर,खूप आवडली पण why ह्या प्रश्नाचे मिळत नाही, भूतकाळ/ कार्यकारणभाव वगैरेच्या स्पष्टीकरणासाठी, pls अजून एक तरी अंंतरा लिहा.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 05/29/2017 - 08:18 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा