Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताणे-बाणे स्थल-कालाचे..

अ — अनन्त्_यात्री, Sun, 05/28/2017 - 12:00
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे(*) क्षणजीवी वर्तमान घडवी स्फटिक अहर्निश अतिताचे (**) उत्पत्ती अन स्थिती,लयाचे रहाट अविरत चालतसे स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे पोहोरे माळुनी फिरत असे ताणे-बाणे स्थल-कालाचे तोलुनी धरिती विश्वाला जटिल,चतुर्मित रूप तयांचे गोचर केवळ गणिताला =============================== (*) अधुनाचे = वर्तमान कालाचे (**) अतिताचे = भूत काळाचे

प्रतिक्रिया द्या
1669 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पुंबा Mon, 05/29/2017 - 10:07 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 05/29/2017 - 18:40 नवीन
उत्कृष्ठ!
स्फटिक अहर्निश अतिताचे
फार आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 05/30/2017 - 06:39 नवीन
सौरा, पद्मावति धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 05/31/2017 - 18:52 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 06/01/2017 - 05:44 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा